Category: होम

शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर FIR करु – फडणवीस

मुंबई : शेतकऱ्यांना सीबीलची अट लागू करु नये. तसेच सीबीलचे कारण दाखवून त्यांना बँकांनी जर कर्ज नाकारले तर ते खपवून घेतलं जाणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सीबीलचे कारण सांगून बँकांनी…

कोकणसह प. महाराष्ट्रात ऑरेंज अलर्टचा इशारा

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं…

पुण्यातील ‘ड्रग्जवीर’ सापडले

 एक आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर पुणे : पुण्यातील L3 लॉऊन्ज पबमध्ये ड्रग्जची पार्टी करणाऱ्या दोन्ही तरुणांची ओळख पटली असून त्यापैकी एक तरुण मुंबईकर आहे तर दुसऱा पुण्यातील मुंढवा येथे रहाणारा आहे. त्यापैकी एक…

अमोल मिटकरींचा स्वबळाचा नारा

अकोला: महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी १०० जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला स्वबळावर निवडणूक लढवावी असा स्वबळाचा नारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय.वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात वही…

पुणे अपघातातील आरोपी मुलाला हायकोर्टाकडून जामीन

पुणे: कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने मोठा  दिलासा आहे.    जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर  असून  बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.  मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली…

गरिबीला प्रतिष्ठा देणारी राजकीय व्यवस्था चुकीची-विनय हर्डीकर

पुणे : लोकांना महत्त्वाकांक्षी न बनविता त्यांना मोफतच्या गोष्टी अधिकाधिक देऊन गरीब बनविले जात आहे. गरिबी हटविण्यापेक्षा गरिबी जोपासण्याचे काम सरकार करत आहे. गरिबीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी ही राजकीय व्यवस्था चुकीची…

पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या शिक्षकाला सहा दिवसांची पोलीस कोठडी

लातूर : युजीसी नेट आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठीच्या नीट परीक्षांच्या पेपर फुटीप्रकरणी अटक केलेल्या संजय जाधव यास न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संजय जाधवला ६ दिवसांसाठी पोलिसांच्या…

बेट्या, तुझा टांगा पलटवणार-जरांगे

जालना : राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतचा अवधी दिला असून त्यानंतर आपण सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही. विशेषता मराठ्यांनी छगन भुजबळ यांचं दंगली घडवण्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. छगन भाऊ तुझा असा इंगा जिरवतो, बेट्या, तुझा टांगा…

आज मतदान

शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी चुरस मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा निवडणूकीसाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघासाठी आज बुधवार दिनांक २६ जुलैला मतदान होत आहे. मुंबई आणि कोकण…

स्वच्छता कार्यात महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी सक्रिय होण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई : ‘स्वच्छ शहर’ ही आपल्या नवी मुंबईची ओळख असून ती कायम राखण्यासाठी तसेच स्वच्छतेची गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जोडीने महानगरपालिकेच्या सर्वच विभागांनी सक्रिय व्हावे तसेच आपल्या शहराचा नावलौकिक उंचावण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देश दिले. विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ च्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक विभागाने करावयाची कामे तसेच राबवावयाचे उपक्रम याविषयीच्या अपेक्षा तपशीलवार सांगत त्या अनुषंगाने गतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. स्वच्छता कार्यामध्ये नागरिकांचा सहभाग सर्वात महत्वाचा असून नागरिकांनी दररोज आपापल्या घरातूनच    कच-याचे वर्गीकरण करणे व वर्गीकृत कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत वेगवेगळा देण्याची सवय अंगिकारावी याकरिता त्यांच्यापर्यंत सातत्याने हा संदेश पोहचविण्याची गरज आयुक्तांनी विशद केली. तसेच सर्व विभागांमध्ये स्वच्छतेच्या मोहीमा राबवून त्यामध्येही लोकसहभागावर विशेष भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याचप्रकारे एपीएमसी मार्केटमध्येही कचरा वर्गीकरण व कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यावर लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. मोठ्या सोसायट्यांमध्ये ओला कचरा विल्हेवाट लावणारे प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने विभाग कार्यालय पातळीवर अधिक कृतीशील व्हावे असे निर्देशित करण्यात आले. शालेय व महाविदयालयीन विदयार्थी हे या शहराचे भविष्य असून त्यांच्या मनावर आत्तापासूनच स्वच्छतेचा संस्कार व्हावा या भूमिकेतून शालेय व महाविदयालयीन पातळीवर स्वच्छता विषयक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे तसेच स्वच्छता शपथ हा उपक्रम शालेय पातळीवर व्यापक स्वरुपात राबविण्यात यावा असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. विदयार्थ्यांना आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर पुढे काय प्रक्रिया होते याची प्रत्यक्ष माहिती होण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शाळांच्या अभ्यास भेटी आयोजित करण्याची कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आले. महानगरपालिका क्षेत्रातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती मोहिमा राबवाव्यात त्याचप्रमाणे दैनंदिन बाजारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांना पूर्णपणे प्रतिबंध करुन त्या ठिकाणी कापडी पिशव्या सहजपणे उपलब्ध होण्यासाठी वेन्डींग मशिन बसवाव्यात अशाही सूचना देण्यात आल्या. याकामी महिला बचत गटांचे सहकार्य घ्यावे असे सूचित करण्यात आले. बेलापूर ते वाशी पर्यंत शहरातून जाणारा सायन पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून त्यावरून इतर शहरांतील हजारो नागरिक दररोज प्रवास करीत असून त्याच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ज्याप्रमाणे शनिवारी यशस्वीरित्या स्वच्छता मोहीम राबविण्यात आली ती ठराविक कालावधीनंतर नियमीतपणे राबविण्यात यावी व त्यासोबत शहरातील इतरही मुख्य मार्गांवर स्वच्छता मोहिमा लोकसहभाग घेऊन राबवाव्यात अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. सफाईमित्रांसाठी राबवावयाच्या कल्याणकारी योजनांची कार्यवाही तत्परतेने करावी यामधील विमाविषयक बाबींकरिता पोस्ट ऑफिसचे सहकार्य घेण्यात यावे त्याचप्रमाणे समाजविकास विभागामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनेची 10 टक्के अंमलबजावणी 15 ऑगस्टपर्यंत व्हावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. स्वच्छता विषयक कामांचा दैनंदिन आढावा घेता यावा याकरिता स्वतंत्र डॅशबोर्ड असावा अशा सूचना देतानाच स्वच्छता‍विषयक जनजागृतीची व्याप्ती विविध माध्यमांतून वाढविण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्ये एनएमएमटीच्या बसेसमध्ये फलक प्रदर्शन, उद्घोषणा याव्दारे स्वच्छता संदेश प्रसारित करण्याचे सूचित करण्यात आले. शहरातील मुख्य चौक, कॉर्नर, उदयाने याठिकाणच्या शिल्पाकृती व्यवस्थित करुन घ्याव्यात व त्याची स्थलनिहाय छायाचित्रे सादर करावीत अशा सूचना देण्यात आल्या. विविध उदयाने, पार्क याठिकाणी स्वच्छतागृहांची तसेच स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जलद कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. उदयानांमधील एका कोपऱ्यात नर्सरी निर्माण करणेबाबत कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी सूचित केले. याशिवाय पार्किंग पॉलिसी लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जलद पावले उचलावीत असेही निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.