वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्हासात साजरा
स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्हासात साजरा हरिभाऊ लाखे नाशिक : स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा इंदिरानगर नाशिक येथे २७ डिसेंबरला वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे प्राचार्य विलासकुमार देशमुख यांच्यासह माजी विद्यार्थिनी बागेश्री मानसी मनोज पारनेरकर, वृंदा जोशी, प्ररेणा कुलकर्णी, जयसिंह पवार, माधुरी देशपांडे, रत्नाकर वेळीस, राम बडोदे, दिपाली साळवे, आशा नागरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्हासात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहूण्याची आपले मनोगत व्यक्त केले, व तसेच प्रमुख पाहूण्याचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाला शासनदार व रंगतदार करण्यासाठी शिक्षक, शिक्षकांनी फार परिश्रम घेतले होते. अंगणवाडी ते १०वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात यशस्वीरित्या भाग घेतले…
