Category: महाराष्ट्र

Maharashtra News

जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात – रुपाली चाकणकर

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी बुधवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे होणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणी महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर १८ डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व विधी यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे. 0000

राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

नवी दिल्ली : राज्यसभेच्या इतिहासात न घडलेली घटना यंदा घडली आहे. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात राज्यसभेच्या…

अदानींच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी गौतम अदानी यांच्या मुद्दयावरुन प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी या आज संसदेत ‘मोदी अदानी भाई-भाई’ असा मजकूर लिहलेली बॅग घेऊन आल्या होत्या. यावरुन भाजपचे नेते…

नाशिक विभागात एसटी बसच्या अपघात वाढ नऊ महिन्यांत १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत बसचे एकूण १२० अपघात होऊन त्यामध्ये २२ जणांचा मृत्यू तर, १९६ जण जायबंदी झाले. महत्वाची…

1500 लाडक्या बहिणींची, महिलांची तुळजाभवानी चरणी प्रार्थना: तानाजीराव सावंत यांना मंत्रिमंडळात पुन्हा एकदा आरोग्यमंत्रिपद मिळावे यासाठी महाआरती…

तुळजापूर: महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात महिलांसाठी आणि भाविकांसाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी नवरात्र उत्सवादरम्यान लाखो भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली आणि अनेक…

थंडीचे पुनरागमन

 पारा ९.४ अंशावर हरिभाऊ लाखे नाशिक : ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस यामुळे काही दिवस अंतर्धान पावलेल्या थंडीचे जिल्ह्यात दमदार पुनरागमन झाले आहे. २१.९ अंशावर गेलेल्या तापमानात काही दिवसांत १२.५ अंशांची…

भाजपाचे राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष

  मुंबई  : विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे  आमदार राहुल नार्वेकर यांची निवड होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.…

गद्दार सरवणकरांचा मागचा हिशोब चुकता केला!- आमदार महेश सावंत

सिंधुदुर्ग :स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासला,३० वर्षे सर्व पदे भोगली त्या सदा सरवणकर यांचा गर्व उतरवून मागचा हिशोब आपण चुकता केला अशा शब्दात माहीम मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि मातोंड…

पुरुष गटात चिन्मय सोमय्या तनीषा कोटेचा सलग चौथ्यांदा विजेती;

राअजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा कुशल चोपडाची विजेतेपदाची हॅट्ट्रिकज्य  पुणे : पुरुष गटात चिन्मय सोमय्या (टीएसटी मुंबई) याने तर महिलांमध्ये सेनहोरा डीसूझा (मुंबई शहर) यांनी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत प्रथमच…

‘ईव्हीएम’ विरोधात सिंधुदुर्ग काँग्रेसची २० डिसेंबरपर्यंत स्वाक्षरी मोहीम. …!

सिंधुदुर्ग :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘ईव्हीएम ‘ मशीन ऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करावा या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात येत्या २०,डिसेंबर पर्यंत स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय…