Category: महाराष्ट्र

Maharashtra News

घोडबंदरवासींच्या माथी टँकरपोटी लाखोंचा बोजा !

तत्काळ २५ एमएलडी पाणी द्या – आमदार संजय केळकर अनिल ठाणेकर नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीने अतिरिक्त २५ एमएलडी पाणी देण्याची मागणी केली. घोडबंदर भागात रहिवाशांना टँकरपोटी नाहक दरमहिना लाखो रुपये मोजावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. लाखो रुपयांची कर्जे घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता, पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंतही केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली. एकीकडे पाणी टंचाईने रहिवासी होरपळत असताना आणि टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुले मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहेत. या संकुलामध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास येणार आहेत. आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही श्री.केळकर यांनी उपस्थित केला आहे. ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला मी पत्र दिले असून पाठपुरावाही करत आहे. शहराला ५० एमएलडी ज्यादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे, पण त्यापैकी २५ एमएलडी पाणी तातडीने दिल्यास घोडबंदर परिसर टँकरमुक्त होईल, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.

 रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात मोहीम

 मेनरोड, शालिमार भागात कारवाई   नाशिक : शहराची मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, शालिमार आणि सराफ बाजार परिसरात सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. यामुळे व्यावसायिकांसह परिसरात आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली. सायंकाळी उशीरापर्यंत ही मोहीम सुरू होती. गर्दीच्या वेळी काही काळ का होईना रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अशीच परिस्थिती कायम ठेवावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शालिमार परिसरात लहान व्यावसायिकांनी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांसह वाहनचालकांनाही कसरत करावी लागते. शालिमार परिसरात सध्या हिवाळा असल्याने लहान मुलांच्या उबदार कपड्यांपासून सर्व वयोगटाच्या लोकांसाठी स्वेटर, कानटोपी, मोजे, विविध प्रकारचे स्कार्फ, महिला वर्गासाठी आभुषणे, पर्स, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख, पादत्राणे, चादर, ब्लँकेट आदींची विक्री रस्त्यावर करण्यात येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक थेट रस्त्यावर उतरत असल्याने वाहतूक कोंडीला मदत होत आहे. त्यातच हातगाड्यावाल्यांची भर पडते. शालिमार परिसरात संदर्भ सेवा रुग्णालय तसेच नाशिकरोड, इंदिरानगर, देवळालीकडे जाण्यासाठी वाहन व्यवस्था आहे. शहर बससेवेचा थांबाही आहे. अडथळ्यांची ही शर्यत पार करत वाहनचालक किंवा पादचाऱ्यांना बाहेर पडावे लागते. व्यावसायिकांनी या सर्व जागेवर अतिक्रमण करुन ग्राहकांची लुटमार सुरू केली आहे. हे विक्रेते पोलिसांनाही जुमानत नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. मागील आठवड्यात एका विक्रेत्याने महिला आणि बरोबर असलेल्या पोलिसाला मारहाण केली होती. अशीच परिस्थिती मेनरोड तसेच सराफ बाजारात आहे. लहान विक्रेत्यांची गर्दी तर असतेच. शिवाय, मोठ्या दुकानदारांकडून सेलच्या नावाखाली काही सामान बाहेर विकण्यासाठी काढले जाते. भाजी विक्रेते, फुल विक्रेते यांची त्यात भर पडते. गर्दीमुळे बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. कधी कधी हे प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. या पार्श्वभूमीवर कोंडलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, ही या परिसरात येणाऱ्या ग्राहकांची अपेक्षा असते. संबंधित परिसराला पडलेला अतिक्रमणाचा विळखा पाहता, सुस्तावतेल्या नाशिक महापालिकेला अखेर सोमवारी जाग आली. सोमवारी सायंकाळी शालिमार, मेनरोड, सराफ बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या कारवाईची पूर्वसूचना नसल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. मोहिमेतून माल वाचावा, यासाठी विक्रेत्यांची पळापळ सुरू झाली. काहींनी पुढे जात अन्य लोकांना मोहिमेची पूर्वकल्पना दिली. या धावपळीत बांबुवरील कपडे किंवा अन्य सामान काढताना बांबु रस्त्यात पडले, सामान रस्त्यावरच पडल्याने ग्राहकांना रस्त्याने मार्ग काढणे कठीण झाले. कारवाईत सातत्याचा अभाव शहरातील शालिमार, मेनरोड या परिसरात महापालिकेकडून अधूनमधून अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली जाते. परंतु, पथकाची गाडी पुढे गेली की लगेचच मागे परिस्थिती पूर्ववत होते. महापालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत नसल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावते. शालिमार परिसरात फळविक्रेते, कपडे विक्रेते यांच्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असतानाही पोलिसांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येते. 0000

ना’राज’

‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’ – छगन भुजबळ मी बाळासाहेबांचा शिवसैनिक- तानाजी सावंत आज प्रमोद महाजनांची आठवण येते- सुधीर मुनगंटीवार मुंबई : महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर महायुतीत आनंदाची लाट उसळायच्याएवेजी नाराजीची…

‘महिला आयोग आपल्या दारी’

सिंधुदुर्गात १९ डिसेंबरला जनसुनावणी…! सिंधुदुर्गनगरी : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ‘महिला आयोग आपल्या दारी हा एक अत्यावश्यक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारीबाबतची जनसुनावणी येत्या१९ डिसेंबरला जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे या तक्रारी ऐकून सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यातील या जन सुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या तक्रारी मांडल्यानंतर त्यांच्या तक्रारीचे लगेचच निवारण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठकही घेण्यात येणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रारी करणे,सुनावणीच्या तारखेला प्रत्यक्ष उपस्थित रहाणे बरंचदा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊनच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रत्नागिरीत १८ डिसेंबरला आयोगाच्या वतीने अशाच प्रकारचा उपक्रम बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी हाती घेण्यात आला आहे.

नाशिक महापालिका खरेदी करणार १२८ अमृत कलश

हरिभाऊ लाखे नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गोदापात्रावरील पुल, मंदिर, घाट परिसरात अमृत कलश ठेवले जाणार असून, या माध्यमातून नदीपात्रात निर्माल्य टाकण्यापासून रोख‌ले जाणार आहे. पर्यावरण विभागाने १२८ अमृत कलश खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी १७.८० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक शहर हे धार्मिक आणि पौराणिक म्हणून ओळखले जाते. यामुळे या ठिकाणी देशभरातूनच नव्हे, तर परदेशातील अनेक पर्यटक, भाविक भेटी देत असतात. यामुळे नाशिक शहराला पर्यटनस्थळाचा दर्जा देखील प्राप्त होऊ लागला आहे. नाशिक शहरातून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीमुळे शहराला अनन्यसाधारण महत्व देखील आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या नदीला प्रदुषणाचा विळखा बसलेला असून, उपनद्या असलेल्या नंदिनी, वाघाडी यांना देखील प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे. नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या वतीने २०१२ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, या समितीकडून प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला जातो. गोदावरी व उपनद्यांवर शहर परिसरात अनेक ठिकाणी पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून नदीपात्रात निर्माल्य तसेच अनेकदा केरकचरा व प्लास्टिक सुध्दा टाकले जाते. रामकुंड परिसरात तसेच विविध घाटांवर देखील भाविक व पर्यटकांकडून नदीपात्रात निर्माल्य टाकले जाते. यामुळे हे निर्माल्य नदीपात्रात पडण्याऐवजी ते अमृत कलशमध्ये टाकले जावे या उद्देशाने मनपाच्या गोदावरी संवर्धन व पर्यावरण विभागामार्फत १२८ अमृतकलश खरेदी केले जाणार आहेत. निर्माल्यासाठी स्वतंत्र घंटागाड्यांची मागणी गोदाघाटावर ठेवण्यात येणाऱ्या अमृत कलशात निर्माल्यादी कचरा टाकला जाणार आहे. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी दोन ते तीन स्वतंत्र घंटागाड्याची व्यवस्था करण्याची मागणी पर्यावरण विभागातर्फे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली जाणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत यांनी दिली.

अश्लील आणि विकृत सामग्रीचा मुद्दा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत मांडला

 सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असलेल्या नवी दिल्ली : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी “सोशल मीडिया आणि ओटीटीवरील अश्लील आणि विकृत सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे” यासंदर्भात संसदेत नियम 377 अन्वये प्रस्ताव दाखल केला. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून म्हस्के यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खासदार नरेश म्हस्के यांनी आपला मुद्दा मांडताना म्हटले की,  सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या अश्लील सामुग्रीमुळे आपल्या कुटुंबव्यवस्थेचे पावित्र्य बिघडवण्याबरोबरच समाजात असुरक्षित वातावरण निर्माण होत आहे. सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या अश्लील आणि आक्षेपार्ह साहित्यापासून मुलांना दूर ठेवण्याची पालकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु कठोर कायदेशीर तरतुदी नसताना, ते चालवणाऱ्या कंपन्या भारतात प्रचंड नफा कमावत आहेत. अशी विकृत सामग्री देशाच्या सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांवरही खोलवर आघात करत आहे. त्याचा प्रसार गुन्हेगारी आणि तरुणांमध्ये दिशाभूल करण्यास प्रोत्साहन देत आहे. पैसे कमावण्याच्या व्यवस्थेने ही एक घातक परिसंस्था बनवली आहे, ज्याला तोडण्यासाठी सरकारकडून कठोर कारवाईची गरज आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण नसल्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. देशात घडणाऱ्या काही घटना, आंध्र प्रदेशातील ८ वर्षांच्या मुलीची शोकांतिका, डुंगरपूर आणि छत्तीसगडमधील घटना ही या विकृतीची उदाहरणे आहेत. हा मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचा देश आहे, जिथे विनयशीलता आणि नैतिकतेला विशेष महत्त्व आहे. अश्लील साहित्याचा नागरिकांच्या मनावर, शरीरावर आणि आत्म्यावर खोलवर आणि घातक परिणाम होतो. एकीकडे सोशल मीडियावर मुबलक कंटेंट असताना दुसरीकडे अधिक व्ह्यूज आणि संपत्ती मिळवण्यासाठी अश्लील कंटेंटची संख्याही वाढत असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. केंद्र सरकारकडे बीएनएस कायदा, महिलांचे अशोभनीय प्रतिनिधीत्व कायदा, आयटी कायदा यांसारख्या सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करून कठोर तरतुदी जोडण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के केली. संसदीय स्थायी समितीने अशा संवेदनशील विषयावर विचार करून एकमत घडवून आणावे, जेणेकरून अशा साहित्याचा प्रसार रोखता येईल असे खासदार नरेश म्हस्के यांनी मत व्यक्त केले. 000

जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात – रुपाली चाकणकर

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी बुधवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे होणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणी महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर १८ डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व विधी यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे. 0000

राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

नवी दिल्ली : राज्यसभेच्या इतिहासात न घडलेली घटना यंदा घडली आहे. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात राज्यसभेच्या…

अदानींच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी गौतम अदानी यांच्या मुद्दयावरुन प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी या आज संसदेत ‘मोदी अदानी भाई-भाई’ असा मजकूर लिहलेली बॅग घेऊन आल्या होत्या. यावरुन भाजपचे नेते…

नाशिक विभागात एसटी बसच्या अपघात वाढ नऊ महिन्यांत १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत बसचे एकूण १२० अपघात होऊन त्यामध्ये २२ जणांचा मृत्यू तर, १९६ जण जायबंदी झाले. महत्वाची…