Category: महाराष्ट्र

Maharashtra News

AB फॉर्मसाठी शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवलं;

आता पक्षानं वाऱ्यावर सोडलं; उमेदवाराला जबर धक्का हरिभाऊ लाखे नाशिक: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघ्या काही तासांचा कालावधी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईहून दोन एबी फॉर्म पाठवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांविरोधात शिंदेंनी दोघांना तिकीट देत बंडखोरीला हवा दिली. देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे रिंगणात असताना शिंदेंनी राजश्री अहिरराव यांना तिकीट दिलं. त्यांची उमेदवारी कायम असताना आता शिंदेंनी सरोज अहिरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राजश्री अहिरराव यांना शिंदेसेनेनं वाऱ्यावर सोडल्याची चर्चा आहे. महायुतीत सीटिंग गेटिंगचा फॉर्म्युला ठरलेला असल्यानं देवळालीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. पक्षानं विद्यमान खासदार सरोज अहिरे यांना तिकीट दिलं. पण या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून राजश्री अहिररावदेखील…

बाळासाहेब ठाकरे हेच खणखणीत नाणे !

श्रध्दांजली योगेश ित्रवेदी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात पार पडत आहेत. या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना…

ज्याला पाडायचे त्याला पाडा

भुजबळांच्या येवल्यात जरांगेचा एल्गार येवला : निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय मागे घेताना मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, मराठा बांधवांनी ज्याला पाडायचं आहे त्याला पाडावे, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणावे. फक्त कोणताही…

भाजपचे संकटमोचकच यंदा संकटात

– गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे यांच्यात रंगणार सामना हरिभाऊ लाखे जामनेर : मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांनाच आपल्याकडे खेचत राष्ट्रवादी शरद पवार गटाने संकटमोचक गिरीश महाजन…

कोकणातील खुद्दार हे गद्दारांना पाडल्याशिवाय राहणार नाहीत…सुषमा अंधारे

– महाविकास आघाडीचा विजय निश्चित कणकवली :विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. गद्दारी विरुद्ध खुद्दारी असा सामना असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता गद्दारांना जागा दाखवतील आणि महाविकास आघाडीचे…

पावसात सभा घेतली की जागा जिंकून येतेच – देवेंद्र फडणवीस

सातारा : २०१९ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तत्कालीन शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेमुळे मोदी लाट असतानाही उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला  होता. त्या सभेची आजही राज्यात चवीने चर्चा केली जाते. दरम्यान, आज शरद…

 बिग फाइट, तिथेच वातावरण टाइट!

मंत्री महाजन, भुसे, भुजबळ, पाटील अडकले मतदारसंघात हरिभाऊ लाखे नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीच्या लढती रंगत असून, महायुती सरकारमधील सहा मंत्र्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. या मंत्र्यांवर ३५ जागांची जबाबदारी असतानाच यंदाच्या निवडणुकीत बदलत्या राजकीय वातावरणामुळे बड्या नेत्यांच्या मतदारसंघांत महाविकास आघाडीकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे ‘बिग फाइट’ रंगणाऱ्या या नेत्यांच्या मतदारसंघांतील वातावरण ‘टाइट’ झाले आहे. लोकसभेला उत्तर महाराष्ट्रातील वातावरण ‘मविआ’च्या बाजूने फिरल्याने हे नेते स्वतःच्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांना स्वतःच्या जागा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उत्तर महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचा गड राहिला आहे. गेल्या वेळेस विधानसभेतील ३५ पैकी २८ जागा महायुतीकडे होत्या. परंतु, लोकसभा निवडणुकीत येथील सहापैकी चार जागांवर महायुतीचा पराभव झाला. राज्यातील बदललेल्या राजकारणाचा, तसेच घटनाबदलाच्या मुद्याने महायुतीची दाणादाण झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुती सरकारमधील सहा मंत्री असून, त्यात नाशिकमधून छगन भुजबळ, दादा भुसे, नंदुरबारमधून डॉ. विजयकुमार गावित, तर जळगावमधून गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील यांचा समावेश आहे. या सहा मंत्र्यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागली आहे. परंतु, हे सर्व मंत्री सध्या आपापल्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार, तसेच बंडखोर रिंगणात आल्याने सत्ताधारीविरोधात नकारात्मक वातावरण तयार होण्याची भीती लक्षात घेऊन सर्वजण कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीचे मातब्बर नेते असलेले अक्राणीचे माजी मंत्री के. सी. पाडवी, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासमोरही यंदा मतदारसंघात कडवे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे या आजी-माजी मंत्र्यांना आपल्या जागा टिकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. नंदुरबारमध्ये अटीतटी भाजपचे नेते तथा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित १९९४ पासून सलग सहा वेळा नंदुरबार मतदारसंघातून निवडून येत आहेत. आता सातव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले, तरी त्यांना यंदा प्रथमच काँग्रेसच्या किरण तडवींकडून कडवे आव्हान मिळाले आहे. लोकसभेत कन्येचा पराभव झाल्यानंतर, तसेच चारही मतदारसंघांत गावित कुटुंबातील व्यक्ती उभ्या असल्यामुळे त्यांच् विरोधात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. काँग्रेसला शिवसेना शिंदे गटानेही बळ पुरविल्याने नंदुरबारची लढाई आता अटीतटीची बनली आहे. ०००००

महाराष्ट्रातून एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही – राहुल गांधी

नंदुरबार : महायुतीने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठविले, पण महाविकास आघाडी सरकार आले तर महाराषट्रातूनही एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही असा शब्द राहुल गांधी यांनी दिला. काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी…

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार- अमित शाहा

जिंतूर : महाराष्ट्रातील सर्व विभागात जाऊन आलो.  येत्या २३ तारखेला महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा महायुतीचे सरकार बनणार आहे”, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते परभणीत भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते. अमित…

कोकण अदानीला आंदण देणार नाही- उद्धव ठाकरे

कणकवली : महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं इथला दिवटा म्हणाला. यांना जोडे नाही मारायचे तर काय करायचं? महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यातून काही चांगलं होईल म्हणतोस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही. केसरकर…