Category: महाराष्ट्र

Maharashtra News

सरन्यायाधीश चंद्रचुड सुप्रीम कोर्टातून निवृत्त

नवी दिल्ली :  सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आज सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. ८ नोव्हेंबर २०२४ हा दिवस  चंद्रचूड यांचा  सर्वोच्च न्यायालयातील  शेवटचा कामकाजाचा दिवस होता. त्यामुळे त्यांना आज निरोप देण्यात आला. महाराष्ट्र सत्तासंघर्ष आणि पक्ष व चिन्ह प्रकरण ही सर्व प्रकरणे धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी होती. मात्र, राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाही…

फडणवीस जिंकणारच नाहीत, मग मुख्यमंत्री कसे होणार? – पटोले

लातूर : देवेंद्र फडणवीस हे निवडूनच येणार नाहीत, त्यांच्या पक्षाचे आमदारही निवडून येणार नाहीत मग ते मुख्यमंत्री कसे होतील हा प्रश्न आहे असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. अमित शाहांनी त्यांच्या भाषणात देवेंद्र फडणवीस हे…

शिवरायांचा भगवा दरोडेखोरांच्या हाती शोभून दिसत नाही – उद्धव ठाकरे

बुलढाणा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठावान मावळे तयार केले. शिवरायांनी त्यांच्या हाती निष्ठेचा भगवा झेंडा दिला, भगवा हा निष्ठेचा प्रतिक आहे,तो मावळ्यांच्या हातात शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या हातात नाही. चाळीस जणांची टोळी आली अन् आपल्या पक्षावर…

देशानं काँग्रेसला नाकारलंय- मोदी

नाशिक : काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही, ती परजीवी आहे. इतर पक्षांच्या पायघड्यांवरच ती जिवंत आहे.  बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच…

महाराष्ट्रवादी घोषणापत्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे घोषणापत्र येत्या तीन दिवसात जाहीर केले जाईल – आनंद परांजपे अनिल ठाणेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ या जाहिरनाम्याचे प्रकाशन व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. लाडकी बहीण योजनेची रक्कम रुपये २१०० पर्यंत वाढवणार, शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी रुपये २५ हजार प्रति हेक्टर बोनस, २.५ दशलक्ष नोकर्‍या, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करणार असून मतदारसंघनिहाय जाहिरनामा आणि राज्यव्यापी आश्वासने ही जाहीरनाम्याची वैशिष्टे असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यानी दिली. यावेळी माध्यमांसमोर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले की, येत्या दोन ते तीन दिवसात १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघासाठीचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. यावेळी महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला हे उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने निवडणूक लढवीत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघासाठी आपला जाहिरनामा जाहीर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबईत तर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते गोंदियात जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम सध्याच्या रुपये १५०० वरुन प्रति महिना रुपये २१०० पर्यंत वाढवणार असल्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे मासिक डीबीटी हस्तांतरण असेल जे २.३ कोटी महिलांना प्रतिवर्षी रुपये २५ हजाराचा लाभ देईल. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात ११ नवीन आश्वासने आहेत. ज्यात वृद्धापकाळ निवृत्ती वेतन रुपये १५०० वरुन रुपये २१०० प्रति महिना वाढविण्यात येणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्थनासह शेतकरी सन्मान निधी प्रति वर्ष रुपये १२ हजारावरुन रुपये १५ हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे.शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी रुपये २५ हजार प्रति हेक्टर बोनस, एमएसपी अंतर्गत विकल्या गेलेल्या सर्ध पिकांसाठी २० टक्के अतिरिक्त अनुदान, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करणार असून ग्रामीण कृषी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ही सर्वात मोठी योजना आहे. २.५ दशलक्ष नोकर्‍या, प्रशिक्षणाद्वारे १ दशलक्ष विद्यार्थ्यांना रुपये १० हजार मासिक स्टायफंड प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे. अंगणवाडी व आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांना रुपये १५ मासिक वेतन, सौर आणि अक्षय उर्जेला प्राधान्य देताना वीज बिल ३० टक्के कमी करण्याचे वचन. सरकार स्थापनेच्या १०० दिवसात नवीन महाराष्ट्र व्हिजन सादर करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर अंकुश ठेवण्यात येईल, असे वचन महाराष्ट्रवादी घोषणापत्रात देण्यात आले आहे. ०००००

मराठ्यांचा लढा वाया जाऊ देणार नाही- जरांगे

जालना : आम्ही अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठिंबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. एका जातीवर निवडणूक लढणे आणि…

लाडक्या बहिणींना वंचित ३५०० देणार !

मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लाडक्या बहीण योजनेत उडी घेत आता ३५०० रुपये महीना देण्याची घोषणा करीत आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल,  बोगस आदिवासी दाखले रद्द…

मनसेचे सरकार कुणालाच काही फुकट देणार नाही- राज ठाकरे

लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल यवतमाळ : लाडक्या बहीणींना फुकटात कीती जास्तीत जास्त पैसे द्यायचे यावरून सर्वच पक्षात चढाओढ सुरु असताना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मात्र मनसेचे सरकार आल्यास या…

उद्धव ठाकरेंनीही कोल्हापुरातून विधानसभेचे रणशिंग फुंकलं

ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशीच आहे,  गद्दारांना गाडणार म्हणजे गाडणारचं राधानगरी : एकीकडे महायुतीने आज कोल्हापूरातून प्रचाराचा नारळ फोडला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपल्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातूनच फोडला. ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख…

प्रचाराचा नारळ फुटला !

लाडक्या बहि‍णींना महिना २१००, वृध्दांना महिना २१००, शेतकऱ्यांना वर्षाला १५००० – एकनाथ शिंदेंच्या बंपर घोषणा कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथून आई अंबाबाईच्या आशीर्वादाने…