Category: महाराष्ट्र

Maharashtra News

ह्युमॅनिटी ग्लोबल फाऊंडेशनतर्फे आश्रमातील मुले व व वृद्धांना कपडे व मिठाई वाटप

राजेंद्र साळसकर संगमनेर : ह्युमॅनिटी ग्लोबल फाऊंडेशन घाटकोपर, मुंबई यांच्यावतीने दिवाळीनिमित्त स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था, रायतवाडी फाटा, संगमनेर येथील आश्रमातील सर्व मुले व वयोवृद्ध तसेच नवजीवन वीट भट्टी उद्योगातील वंचित मुलांना नवीन कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वयंप्रेरित संस्थेच्या आश्रमातील मुले व वीटभट्टी वरील मुले अशा एकूण १०० मुलांना कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.  ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशनने आपली दिवाळी सर्व मुलांसमवेत साजरी करून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. याप्रसंगी ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशन चे सदस्य श्री दिपक पवार, राजेन्द्र पुजारी, अनंत खडतरे,जितेंद्र पवार,प्रभाकर कुटे, उदय पुजारी, अनिल माशिट्टे तसेच नवजीवन विटभट्टी उद्योगाचे मालक दिलीप शेठ जोर्वेकर स्वयंप्रेरीत संस्थेचे नामदेव राहणे, संतोष पवार, नवजीवन उद्योगातील परिवार इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती

१५ मतदारसंघात १९६ उमेदवार हरिभाऊ लाखे नाशिक : माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमधील चित्र स्पष्ट झाले असून एकूण १९६ उमेदवार रिंगणात आहेत. मालेगाव बाह्य, बागलाण व इगतपुरीत सर्वाधिक प्रत्येकी १७ तर, कळवणमध्ये सर्वात कमी सात उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार असून काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिल्याने महायुती, महाविकास आघाडीसमोर त्यांचे आव्हान राहणार आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघातून सोमवारी १४१ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या १९६ वर आली आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी प्रयत्न करूनही चांदवडमधून नाराज केदा आहेर यांनी माघार घेतली नाही. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात त्यांचे बंधू केदा आहेर आणि महाविकास आघाडीचे शिरीष कोतवाल हे प्रमुख उमेदवार आहेत. तशीच स्थिती नांदगावमध्ये आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे. महाविकास आघाडीचे गणेश धात्रक यांच्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघात सर्वाधिक १७ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे भुसे विरुध्द महाविकास आघाडीचे अद्वय हिरे यांच्या लढाईत बंडूकाका बच्छाव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे. नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीचे वसंत गिते आणि महायुतीच्या देवयानी फरांदे यांच्यात मुख्य लढत आहे. नाशिक पश्चिममध्ये महायुतीच्या सीमा हिरे, महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर, मनसेचे दिनकर पाटील यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. देवळालीत महायुतीत वेगळाच तिढा निर्माण झाला. पक्षाने उमेदवारी मागे घेण्याबाबत सादर केलेले पत्र तांत्रिक कारणास्तव ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) उमेदवार राजश्री अहिरराव यांची उमेदवारी कायम राहिली. या ठिकाणी महायुतीतीलच अहिरराव आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) सरोज अहिरे परस्परांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. महाविकास आघाडीतर्फे योगेश घोलप आणि वंचितचे अविनाश शिंदे हेही रिंगणात आहेत. येवल्यात महायुतीचे छगन भुजबळ, महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे यांच्यासह १३ जण रिंगणात आहेत. निफाडमध्ये दिलीप बनकर आणि अनिल कदम या आजी-माजी आमदारांमध्ये पारंपरिक लढत होणार आहे. कळवणमध्ये महायुतीचे नितीन पवार, महाविकास आघाडीचे जे. पी. गावित यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. बागलाणमध्ये महाविकास आघाडीच्या दीपिका चव्हाण आणि महायुतीचे दिलीप बोरसे यांच्यासह १७ उमेदवार आहेत. इगतपुरीत महायुतीचे हिरामण खोसकर, महाविकास आघाडीचे लकी जाधव, मनसेचे काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार निर्मला गावित (अपक्ष) यांच्यासह १७ जण मैदानात आहेत. सिन्नरमध्ये महायुतीचे माणिक कोकाटे, महाविकास आघाडीचे उदय सांगळे यांच्यासह १२ उमेदवार आहेत. अनेक जागांवर बंडखोर, अपक्षांची लक्षणीय संख्या असल्याने तिरंगी वा चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. कळवणमध्ये सात उमेदवार विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य, इगतपुरी व बागलाण या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी २१ तर, कळवण या राखीव मतदारसंघात सर्वात कमी सात उमेदवार रिंगणात आहेत. नांदगावमध्ये (१४), मालेगाव मध्य (१३), बागलाण (१७), चांदवड (१४), येवला (१३), सिन्नर (१२), निफाड (नऊ), दिंडोरी (१३), नाशिक मध्य (१०), नाशिक पूर्व (१३), नाशिक पश्चिम (१५), देवळाली (१२) आणि इगतपुरी (१७) असे जिल्ह्यात एकूण १५ मतदारसंघात १९६ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

 पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी नाशिकमध्ये सभा

 ग्रामीण भागासाठीही पदाधिकारी प्रयत्नशील हरिभाऊ लाखे नाशिक: विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला जोर येत असून, राज्यातील निवडणूक प्रतिष्ठेची लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. सभा पंचवटीतील तपोवनात असलेल्या मोदी ग्राऊंडवर होणार आहे. सदरची सभा ठक्कर डोम येथे घेण्यासंदर्भातही प्रस्ताव होता. मात्र ती जागा सुयोग्य नसल्याने हा प्रस्ताव मागे पडला. त्यामुळे पंचवटीतील तपोवन येथील नेहमीची जागा निवडण्यात आली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जागेची पाहणी केली. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ६ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये येणार आहे. सत्ताकारणात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे संबंध असल्याने राज्यातील जागावाटपासह इतर सर्व घटनांमध्ये गृहमंत्री अमित शाह यांचा हस्तक्षेप राहिला आहे. त्यामुळे राज्यातील जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्षांचे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी महायुतीतर्फे या दोन्ही नेत्यांच्या सभा संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार असून, जिल्ह्यातही त्यांच्या दोन सभा व्हाव्यात, यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी नाशिकमध्ये मोदी मैदानावर ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू असून, तपोवनातील मोदी मैदानातच ही सभा होणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातही एखादी मोठी सभा घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ह्युमॅनिटी ग्लोबल फाऊंडेशनतर्फे आश्रमातील मुले व व वृद्धांना कपडे व मिठाई वाटप

राजेंद्र साळसकर संगमनेर : ह्युमॅनिटी ग्लोबल फाऊंडेशन घाटकोपर, मुंबई यांच्यावतीने दिवाळीनिमित्त स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था, रायतवाडी फाटा, संगमनेर येथील आश्रमातील सर्व मुले व वयोवृद्ध तसेच नवजीवन वीट भट्टी उद्योगातील वंचित मुलांना नवीन कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वयंप्रेरित संस्थेच्या आश्रमातील मुले व वीटभट्टी वरील मुले अशा एकूण १०० मुलांना कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.  ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशनने आपली दिवाळी सर्व मुलांसमवेत साजरी करून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. याप्रसंगी ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशन चे सदस्य श्री दिपक पवार, राजेन्द्र पुजारी, अनंत खडतरे,जितेंद्र पवार,प्रभाकर कुटे, उदय पुजारी, अनिल माशिट्टे तसेच नवजीवन विटभट्टी उद्योगाचे मालक दिलीप शेठ जोर्वेकर स्वयंप्रेरीत संस्थेचे नामदेव राहणे, संतोष पवार, नवजीवन उद्योगातील परिवार इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

काका-पुतणे आमनेसामने;

येवला, दिंडोरी आण्िा सिन्नरमध्ये रंगणार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत लढत   नाशिक : जिल्ह्यात शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांची तीन विधानसभा मतदारसंघांत आमनेसामने लढत रंगणार आहे. दोन मतदारसंघांमध्ये काकांचा…

बिनदिक्कतपणे केलेल्या अतिक्रमणाचा वन समिती कडून बिमोड !

माथेरान : कस्तुरबा रोडवरील हॉटेल मेघदूत शेजारील वनखात्याच्या रिक्त प्लॉटवर जवळपास वीस गुंठे जागेवर अतिक्रमण करून जागा  बळकावण्याचा प्रयत्न वनखात्याच्या कार्यतत्पर अधिकारी वर्गाने हाणून पाडला आहे. माथेरान मध्ये नगरपरिषदेच्या सभागृहात…

पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव

एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य   नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील हायव्होल्टेज सामना आज म्हणजे १ नोव्हेंबरला खेळवण्यात आला. हाँगकाँग सुपर 6 मध्ये दोन्ही संघांमध्ये शानदार सामना झाला.…

मराठा, मुस्लिम, दलितांच्या युतीमुळे परिवर्तन होणारच – मनोज जरांगे

जालना : मी कट्टर हिंदू आहे. आज मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले असल्याने आम्ही सत्ता परिवर्तन करणारच असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्ही उमेदवारीवर भांडणार नाही. आम्ही सगळ्यांना मोकळे सोडणार…

प्रकाश आंबेडकरांवर आज ॲन्जिओप्लास्टी

छातीत दुखत असल्याने तातडीने केले हॉस्पिटलमध्ये दाखल मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर  यांना आज सकाळी अचानक  छातीत दुखत असल्याने तातडीने  हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आल्यामुळे वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र,…

दादांची आईसोबत दिवाळी…

माझ्या आणि आईच्या वतीने महाराष्ट्रातील मायमाऊली, शेतकरी, कष्टकरी, युवक – युवती आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…