धाराशिव, सोलापूर, सांगली दोन्ही गटात उपांत्य फेरीत
सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा : पुणे व ठाणेही उपांत्य फेरीत लढतील धाराशिव : सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो…
Maharashtra News
सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा : पुणे व ठाणेही उपांत्य फेरीत लढतील धाराशिव : सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो…
हरिभाऊ लाखे नाशिक : दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिनींसाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय कन्या आश्रमशाळा चालविल्या जातात. अनेकदा आश्रमशाळांबाबत तक्रारी येत असल्याने आश्रमशाळांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी…
देवगड : खोल समुद्रात मासेमारी करिता गेलेल्या नौकेवरील खलाशाने आपसात झालेल्या वादातून नौकेवरील तांडेल नाटेकरचा खून करून नौका पेटवल्याची घटना कुणकेश्वर पासून खोल समुद्रात १५ वाव अंतरात दुपारी २.४५ वाचण्याच्या…
अर्ज भरल्यानंतर बारामतीकरांना भावनिक साद पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असाच सामना होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, बारामतीमधील निवडणुकीत चांगलीच चूरस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये पवार कुटुंबातच लढत झाली होती. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत महाराष्ट्राने पाहिली, त्यामध्ये सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार, काका-पुतण्याच्या लढाईत काका जिंकणार की पुतण्या, अशी चर्चा मतदारसंघात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बारामतीकरांना उद्देशून भाषण केलं. यावेळी, अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलने फटकेबाजी केली, तसेच ते भावूक झाल्याचंही दिसून आलं. लोकसभेला माझं चुकलं, सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हतं द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या लोकांनी सुप्रियाला मतदान केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला.. दादा म्हणजे हा दादा नाहीतर लोकांना वाटेल तो दादा. शिरुरला उभा राहा म्हणून सांगितले, बारामतीच्या लोकांनी त्यादिवशी जास्त आग्रह केला म्हणून आज मी उमेदवारी अर्ज भरल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. प्रत्येकाने आपापल्या गावात जा, दुसऱ्याच्या गावात जाऊ नका. आपापले घर सांभाळा मी तुम्हाला हे का सांगतोय कारण माझंच घर नीट नाही. म्हणून मला भीती वाटते बोलताना, तुम्ही तिकडे गेल्यावर मला त्रास आईला जसा दादा तसा युगेंद्रही नातू आहे, आई तसं म्हणली असेल असं वाटत नाही, श्रीनिवास पवार यांनी अजितदादांचा दावा फेटाळला पुणे : शरद…
कुडाळ : कोणताही गाजावाजा न करता महायुतीचे उमेदवार डॉ.निलेश राणे यांनी शिवसेना(शिंदे गट) पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे दाखल केला. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते…
सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा – नंदुरबारच्या रोहिणी गावितची नाबाद नऊ मिनिटे खेळी धाराशिव : सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात नंदुरबारने छत्रपती संभाजीनगरचा ६-१ असा पाच गुणांनी पराभव केला. महाराष्ट्र खो-खो hअसोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत रोहिणी गावित हिने सलामीचा सायंकाळचा दिवस गाजविला. तिने पहिल्या डावात ८.४० व दुसऱ्या डावात नाबाद नऊ मिनिटे संरक्षण केले. छत्रपती संभाजी नगरच्या दिशा इंगळे हिनेही २.४० व ७.१० मि. पळती करीत लढत दिली. अन्य एका सामन्यात रायगडने लातूरला १६-१४ असे २ गुणांनी नमविले. मध्यंतराची सहा पाच ही एका गुणाची आघाडीच रायगडला विजय मिळवून दिली. संजीवनी जगदाळे हिने २. ३० मिनिटे नाबाद पळती करीत आक्रमणात सहा गडी बाद केले. लातूरच्या पायल माने हिची लढत अपुरी पडली. तिने आपल्या धारदार आक्रमणात सात गडी बाद करीत १.१० मिनिटे संरक्षण केले. अन्य सर्व सामने एकतर्फी झाले. मुलांमध्ये धुळ्याने छत्रपती संभाजीनगरला नमविले मुलांच्या गटात धुळ्याने छत्रपती संभाजीनगरला २१-१८ असे तीन गुणांनी नमविले. मध्यंतराची ११-९ ही ३ गुणांची आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. त्यांच्या कुणाल शेटे याने दोन, एक व एक मिनिटे नाबाद पळती करत दोन गडी बाद केले. अभिषेक गावित याने १.५०, १.२० मिनिटे संरक्षण करीत तीन गडी बाद केले. अन्य एका सामन्यात रायगडने सिंधुदुर्ग १७-१३ अशी चार गुणांनी मात केली. भावेश गोवलीकर त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पाच गडी बाद करीत एक व १.२० मिनिटे पळती केली. सिंधुदुर्गच्या अथर्व शिंदे (१.५०,१.०० मि. व ४ गुण) याची खेळी अपुरी पडली. अन्य सर्व सामने डावाने झाले. जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी केले उद्घाटन या स्पर्धेचे उद्घाटन धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी केले. अध्यक्षस्थानी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे होते. सुरुवातीस ध्वजारोहण आणि त्यानंतर क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. ती ज्योत प्रमुख पाहुण्यांनी प्रज्वलित केली. त्यानंतर राणी लक्ष्मी आणि जानकी पुरस्कार प्राप्त आश्विनी शिंदे हिने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी द्वापेट कॉलेजचे प्राचार्य डॉ. दयानंद जटमुरे, शि. प्र. मंडळ प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, अर्जुन पुरस्कार विजेते सारिका काळे, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे खजिनदार ऍड. गोविंद शर्मा, उपाध्यक्ष अश्विनी पाटील, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जे. पी. शेळके, सुजाता शानमे, रोहिणी आवारे, सुप्रिया गाढवे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष वाघ, शिवतेज प्रतिष्ठान रेहमान काझी आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचे स्वागत उस्मानाबाद खो खो असोसिएशनचे सचिव प्रवीण बागल, अभय इंगळे, प्रदीप होले, प्रभाकर काले, शोभना वाकुरे, विवेक कापसे, वर्षा जचव, निकिता पवार, गौरी शिंदे, संपदा मोरे,आकाश लोखंडे, अभिजित पाटील, रितेश जाधव, सुजित साळुंखे यांनी केले. असोसिएशनच्या स्पर्धा समितीचे अध्यक्ष संदीप तावडे यांनी आभार मानले. उप उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेले संघ व त्यांचे होणारे सामने कुमार : सोलापूर- बीड, धुळे-अहमदनगर, नाशिक-रत्नागिरी, रायगड-सांगली, धाराशिव- सातारा, नंदुरबार-मुंबई, ठाणे-मुंबई उपनगर, जालना-पुणे. मुली : धाराशिव-नंदुरबार, अहमदनगर- रत्नागिरी, मुंबई उपनगर-पालघर, धुळे-ठाणे, सांगली-जालना, रायगड-पुणे, सोलापूर-मुंबई सातारा-नाशिक. 00000
भाईंदर : नरेंद्र मेहता यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी विश्वास प्रकट केला की भाजपाची उमेदवारी त्यांनाच मिळेल. हाच विश्वास दाखवत मा गीता जैन यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज…
वाहतूक विस्कळीत हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू राहिली. पक्षीय उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली. दिवाळीच्या खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेल्या अनेक जण वाहतूक कोंडीत अडकले. कोंडी दूर करताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी नाशिक मध्य, निफाड मतदारसंघात महायुतीकडून तर, चांदवड मतदारसंघात मविआकडून उमेदवार उशिरा जाहीर करण्यात आले. शहरातील उमेदवारांनी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले. नाशिक मध्य मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी अशोक स्तंभ ते महात्मा गांधी रोड अशी फेरी काढली. फेरीतील सुशोभित वाहनावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी खासदार हेमंत गोडसे यांसह इतरही पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी अपक्ष आणि एक पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) वसंत गिते, हनिफ बशीर यांनीही अर्ज दाखल केले. नाशिक पश्चिममधून भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरे, शशिकांत जाधव यांनी अपक्ष, मनसेचे दिनकर पाटील, माकपचे डॉ. डी. एल. कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. देवळालीतून राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदार सरोज अहिरे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता अशोकस्तंभ ते सीबीएस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या बहुसंख्य नागरिकांना उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाची पूर्वकल्पना नसल्याने शालिमार, मेनरोड, वकीलवाडी, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, गंगापूर रोडसह अन्य रस्त्यांवर ते वाहतूक कोंडीत अडकले. कोंडीमुळे पादचाऱ्यांनाही गर्दीतून वाट काढण्यासाठी वेळ लागत होता. दुचाकी धारकांना अर्धा तास एकाच ठिकाणी थांबावे लागत होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इतर ठिकाणाहूनही अधिक कुमक मागविण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी अडथळे उभे केले होते. कोट विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी सोमवारचा दिवस निवडला. त्यातच दिवाळीतील खरेदीसाठी नाशिककरांनी गर्दी केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यामुळे काही अंशी नियोजन कोलमडले. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली -चंद्रकांत खांडवी (पोलीस उपायुक्त- वाहतूक)
चर्चांना उधाण, शिवसैनिक भूमिका बदलणार का याकडे लक्ष बदलापूर: मुरबाड विधानसभा मतदारसंघात बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असतानाच सोमवारी किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक शिवसैनिकांचा निर्णय बदलण्यासाठी ही भेट होती का अशीही चर्चा रंगली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे ते निवडणुकीपूर्वीच विद्यमान आमदार किसन कथोरे यांना मोठे आव्हान निर्माण करण्यात आले आहे. यात स्वपक्षीय भाजपासह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बदलापूर शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकवले. तसेच आपण अपक्ष उमेदवारी दाखल करू असेही संकेत दिले. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तेच आमदार किसन कथोरे यांनी म्हात्रे यांचे निकटवर्तीय असलेले आणि बदलापूर शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख तेजस म्हसकर यांचा भाजपात प्रवेश घडवून आणला. यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमदार किसन कथोरे यांनी भाजपातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करतेवेळी शिवसेनेचे प्रमुख माजी नगरसेवक अनुपस्थित दिसले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना शिवसैनिकांची अस्वस्थता बोलून दाखवली. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आम्हाला उत्तर द्यावेच लागेल, अशी प्रतिक्रिया वामन म्हात्रे यांनी दिली होती. एकीकडे महायुतीतील शिवसेना हा महत्त्वाचा घटक पक्ष किसन कथोरे यांच्या विरुद्ध उभा राहतो की काय असा प्रश्न आहे. त्यातच शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला कथोरे यांनी भाजपात प्रवेश दिला. या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेत कथोरे यांचा प्रचार करायचा की नाही याबाबत एक वाक्यता नाही. स्थानिक पातळीवर महायुतीत अशी विरोधाभासी परिस्थिती असताना सोमवारी आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथे निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार कथोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकलेला नाही. मात्र स्वतः किसन कथोरे यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून या भेटीची माहिती आणि फोटो पोस्ट केला. स्थानिक पातळीवर शिवसैनिकांना महायुतीचा धर्म पाळत प्रचारात सहभागी होण्यासाठी समज देण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आता या भेटीनंतर शिवसेना शहर शाखेचे स्थानिक पदाधिकारी आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून दाखल केला अर्ज…! सिंधुदुर्ग :सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी बंडखोरी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून कल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून भाजपाचे ते इच्छुक उमेदवार होते.मात्र हा मतदार संघ शिंदे गटाच्या वाट्याला आल्याने विद्यमान आमदार,राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उमेदवारी शिंदे सेनेने जाहीर केली.महायुतीचे उमेदवार म्हणून आता केसरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.भाजपामधील आणखी एक इच्छुक असलेले माजी आमदार आणि केसरकर यांचे कट्टर विरोधक राजन तेली यांनी अचानकपणे भाजपा मधून बाहेर पडून ऊबाठा सेनेत प्रवेश केला आणि सेनेची उमेदवारीही मिळवली.या मतदार संघात आता केसरकर विरुद्ध तेली ( सेना विरुद्ध सेना) असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पवार गटाच्या अर्चना घारे – परब या सुद्धा इच्छुक होत्या.ही जागा राष्ट्रवादी पवार गटाला मिळावी यासाठी त्यांचा व त्यांचा समर्थकांनी जोरदार प्रयत्न चालवले होते मात्र तेलींची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज झालेल्या अर्चना घारे – परब यांनी बंडाचे निशाण हाती घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज परवा दाखल केला.तेव्हा दोघा बंडखोर अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्यास या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. दरम्यान आज विशाल परब यांनी सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यानापासून मिरवणुकीने जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ‘आपण लढणार आणि जिंकणारही’ असा विश्वास व्यक्त केला.त्यांच्या समर्थनार्थ दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यातून त्यांचे समर्थक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते.