Category: महाराष्ट्र

Maharashtra News

भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार

हरिभाऊ लाखे नाशिक : भाजपने तिकीट वाटपात डावलल्याने बंडाचे निशाण फडकविणारे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना मनसेने नाशिक पश्चिम मतदार संघातून मैदानात उतरविले आहे. पाटील यांच्या उमेदवारीने ही लढत रंगतदार होणार आहे. मध्यंतरी नाशिक दौऱ्यात राज ठाकरे यांनी कोणत्या भागात कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे, याचा अभ्यास करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली होती. त्या आधारे मराठा समाजातील नाराज पाटलांना पक्षात प्रवेश देतानाच लागलीच उमेदवारी बहाल करण्याची चाल मनसेने खेळली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. स्थानिक आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला संबंधितांनी जाहीर विरोध केला होता. तथापि, पक्षाने त्यास न जुमानता पहिल्याच यादीत हिरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले. माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मनसेत पक्ष प्रवेश होऊन उमेदवारी निश्चित झाली. मनसेने पहिल्या यादीत राज्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले होते. मात्र, त्यामध्ये नाशिकचा समावेश नव्हता. पाटील यांच्या प्रवेशानंतर तिसऱ्या यादीत नाशिक पश्चिमचा समावेश झाला आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात गंगापूर, सातपूर, अंबड, चुंचाळे, मोरवाडी, कामटवाडे अशा आठ ते १० गावांचा समावेश आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या या गावांमध्ये मराठा समाजाचे प्राबल्य आहे. मतदारसंघाचा बराचसा भाग कामगारबहुल असून कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) भागातून स्थायिक झालेल्यांची संख्या मोठी आहे. या सर्व बाबी मनसेनेही विचारात घेतल्याचे दिसून येते. मतांची टक्केवारी कशी ? नाशिक पश्चिम मतदारसंघात नितीन भोसले यांच्या माध्यमातून २००९ मध्ये पहिल्यांदा मनसेचा आमदार निवडून आला होता. तेव्हा पक्षाला ३५ टक्के मते मिळाली होती. त्यापुढील २०१४ च्या निवडणुकीत मतांची टक्केवारी ४.४ पर्यंत घसरून भोसले हे पराभूत झाले होते. गतवेळी म्हणजे २०१९ मध्ये मनसेच्या दिलीप दातीर यांना ११.८ टक्के मते मिळाली होती. सलग दोनवेळा गमवाव्या लागलेल्या या जागेवर पक्षाने यावेळी वेगळा प्रयोग केला आहे.

मर्जिया पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती

अनिल ठाणेकर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक , सांस्कृतिक कार्यात आघाडीवर असलेल्या अन् नागरी समस्यांच्या निपटार्यासाठी लढणाऱ्या मर्झिया शानू पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड  यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी  मा. विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण, शमीम खान हे देखील उपस्थित होते. मर्झिया शानू पठाण या गेल्या काही वर्षांपासून सबंध ठाणे शहरात लढाऊ कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. पाणी, कचरा, आरोग्य, महिला अत्याचार आदी प्रश्नांवर त्या सातत्यपूर्ण लढा उभारत आल्या आहेत. मधल्या काळात त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मुंब्रा आणि ठाणे शहरातील अनेक समस्यांचा निपटारा झाला होता. उच्चशिक्षित असलेल्या मर्झिया पठाण यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन शासनाशी संघर्ष करीत आहेतच; शिवाय, विद्यार्थी आणि तरूणांमध्ये संविधानाप्रति जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमही आयोजित केले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीवकुमार झा यांनी मर्झिया पठाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली.  आज शरद पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र दिले. दरम्यान, यावेळेस मुंब्रा, कौसा, ठाणे , आदी भागातील अनेक तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.

 बनोटी परिसरात मुसळधार

वीज कोसळून दोन ठार, आठ शेळ्या ही ठार सोयगाव- बनोटी परिसरात सोमवारी दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडाटात…

 निवडणूक नांदी, पालिकेची चांदी!

 सभा, बॅनर, रॅलीसाठी नाशिक महापालिकेचे दरपत्रक जाहीर हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी महापालिका हद्दीत होणाऱ्या चौक सभा, जाहीर सभांसाठी भाडे निश्चित करून पालिकेच्या विविध विभागाने प्रचारफेऱ्या, सभांसाठीचे झेंडे, बॅनर्सकरिता दरपत्रक (रेटकार्ड) जाहीर केले आहे. प्रचार रॅली, जाहीर सभा, चौकसभा, पथनाट्य, प्रचार वाहन व प्रचार कार्यालयाच्या ठिकाणावर लहान पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, चिन्ह, मफलर, टोपी आदींकरिता प्रतिदिन प्रतिनग १२ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अनंत कान्हेरे मैदानासाठी राजकीय पक्षांना एका सभेसाठी ३५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी यंदाची निवडणूक खर्चिक होणार असली तरी महापालिकेची मात्र चांदी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबरपासून प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे. यंदा दिवाळीनंतरच निवडणुकीचा माहोल तयार होणार असल्याचे चित्र आहे. विधानसभेसाठी राज्यात एकच टप्प्यात मतदान होणार असल्यामुळे राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभा, रॅलीवर नियंत्रण राखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या विविध कर विभागाने दरपत्रक निश्चित केले आहे. सदर शुल्क अदा केल्यानंतरच संबंधित राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना परवानगी मिळू शकणार आहे. या दरपत्रकानुसार चौकसभांकरिता प्रत्येकी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. खासगी मालमत्ता तसेच प्रचार कार्यालयांच्या ठिकाणी ५० चौरस फुटांपर्यंत कापडी बॅनर्सकरिता प्रतिदिन १५० रुपये, तर १०० चौरस फुटांच्या कापडी बॅनर्सकरिता ३०० रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जाणार आहे. जाहीर सभा व चौक सभेच्या ठिकाणी १०० चौरस फुटांपर्यंतच्या बॅनर्सकरिता प्रति सभा प्रति नग ३०० रुपये, तर लहान फलकासाठी १५० रुपये प्रति दिन, प्रति नग शुल्क आकारले जाणार आहे. ईदगाह मैदान व राजे संभाजी स्टेडियमवर हेलिपॅड तयार करण्यासाठी एक दिवसाकरिता ७०० रुपये, अधिक १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. डिजिटलसाठीही मोजा पैसे खासगी जागेतील भित्तिचित्राकरिता सात रुपये प्रतिचौरस फूट मासिक, तर डिजिटल बोर्ड, एलइडी, एलसीडी बॅकलाइट बोर्ड, निऑन बोर्ड, इलेक्ट्रॉनिक, व्हिडीओ डिस्प्ले, लेझर शो व देखाव्यांकरिता ‘अ’ वर्गवारीकरिता ८.४० रुपये प्रतिचौरस फूट मासिक दर असेल. ‘ब’ वर्गाकरिता ६.६० रुपये प्रतिचौरस फूट मासिक दर निश्चित करण्यात आले आहेत. वाहनावरील स्टिकर (अप्रकाशित) करिता प्रतिचौरस फुटास ५.५० रुपये प्रतिदिन, तर प्रकाशितकरिता ६.५० रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जाईल. बूथसाठी ९०० रुपये दर मतदान केंद्राबाहेर लावल्या जाणाऱ्या ५ बाय ५ चौ. फूट आकारच्या बूथकरिता १५०, तर १० बाय १० आकाराच्या बूथकरिता ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रचार वाहनावरील कापडी बॅनरीकरिता २५० रुपये, तर स्टिकरसाठी ६.५० रुपये प्रतिदिन, प्रतिचौरस फूट दर आकारला जाणार आहे. प्रचाररॅली, जाहीर सभा, चौकसभा, पथनाट्य, प्रचार वाहन व प्रचार कार्यालयाच्या ठिकाणावर लहान पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, चिन्ह, मफलर, टोपी आदींकरिता प्रति दिन, प्रति नग १२ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जाहीर सभांकरिता मैदानांचे दर – ईदगाह व अनंत कान्हेरे मैदान : २८,८७५ अधिक १८ टक्के जीएसटी – ३५,००० अनामत – पवननगर मैदान, नवीन नाशिक : ३,८१८ अधिक १८ टक्के जीएसटी – ५,००० अनामत – पाटीलनगर, नवीन नाशिक : ६,९६६ अधिक १८ टक्के जीएसटी – १०,००० अनामत – शिवाजी चौक भाजी मार्केट : ४,९७८ अधिक १८ टक्के जीएसटी – ७,००० अनामत – यशवंत महाराज पटांगण : २,८०० अधिक टक्के जीएसटी – ५,००० अनामत – राजे संभाजी स्टेडियम : २१,९८० अधिक १८ टक्के जीएसटी – २५,००० अनामत – शिखरेवाडी मैदान, नाशिकरोड : १३,२६० अधिक १८ टक्के जीएसटी – २०,००० अनामत – मुक्तिधाममागे शाळा क्रमांक १२५ : ८९५७ अधिक १८ टक्के जीएसटी – १५,००० अनामत – सातपूर क्लब हाऊस मैदान : १८,०८४ अधिक १८ टक्के जीएसटी – २०,००० अनामत ०००००

शिवसेनेचे वामन म्हात्रे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार

  शिवसेनेत दुसऱ्या बंडखोरीचे संकेत, २८ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार बदलापूर : महायुतीतील कुरबुऱ्या आता उघडपणे सुरू असून मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सोमवरी…

 राष्ट्रीय स्तरावरील’कोकण रत्न’ राष्ट्रीय मेनू २०२५ शिबिर रत्नागिरीत

रत्नागिरी : अशोक गायकवाड* २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ५ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण रत्न’ हे मेनू शिबिर होत आहे, अशी माहिती कमांडींग ऑफीसर कमांडर के. राजेश कुमार यांनी दिली. ‘हमारा समुदंर हमारी शान’ हे ब्रीद घेऊन हे १० दिवसांचे शिबिर होणार आहे. ‘कोकण रत्न’ या शिबिराचा शुभांरभ ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता अल्ट्राटेक जेटीवर एससीसीचे एडीजी मेजर जनरल योगेंदर सिंग यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी ते जयगड ते बोरीया परत याच मार्गाने रत्नागिरी असा १२२ नॉटीकल मैल नौका भ्रमण असणार आहे. या शिबिरामध्ये पुणे, मुंबई अ आणि ब, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेड क्वार्टरमधून ६० राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट सहभागी होणार आहेत. पथनाट्यातून समुद्र स्वच्छतेविषयी विशेषत: सागरी किनारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. ‘हमारा समुंदर, हमारी शान’ हे घोषित वाक्य घेऊन स्वच्छता, सुरक्षितता याविषयी जनजागृती होणार आहे. नौसेना आणि कोस्टगार्ड या दोघांचेही या शिबीरासाठी सहकार्य असणार आहे. पश्चिमी कमांडिंग युनिटच्या माध्यमातून हवामान बदल याबाबतची माहिती मिळणार आहे. तर कोस्टगार्डच्या माध्यमातून सर्च, रेस्क्यु, हेलिकॉप्टर आदींची मदत होणार आहे. एक सुरक्षा बोट, २ रेस्क्यु बोटी आणि नेव्हीचे सेलर यांचाही समावेश असणार आहे. यावेळी कार्यकारी अधिकारी अंकित रवी उपस्थित होते. 000

 मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान नाशिक : शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले. चांदवडमध्ये दोन बंधारे फुटून उमराणे, परसूल भागात तारांबळ उडाली. जिल्ह्यात ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन, भात, डाळिंबाचा समावेश आहे. ८०६ गावांतील तब्बल ७६ हजार ५५८ शेतकऱ्यांना फटका बसला. शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांची पडझड झाली. परतीच्या पावसाने चांदवड आणि देवळा तालुक्यात हाहाकार उडवला. चांदवड तालुक्यात मातीचा बंधारा फुटल्याने गावातील लोकांना हलवावे लागले. नाशिक शहरासह कळवण, पेठ, सिन्नर, येवला आदी तालुक्यात अवघ्या काही तासात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टीमुळे चांदवड तालुक्यात सर्वाधिक (१०९९२ हेक्टर), देवळा (८२३६), सटाणा (८८५३), पेठ (६२३०), इगतपुरी (१८३१), निफाड (८०७), येवला (१०७६), मालेगाव (९३५), नाशिक (७५०), कळवण (३४१), त्र्यंबकेश्वर ( ४३३), सुरगाणा (६६६), दिंडोरी (१०५) असे एकूण ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांदा (१२९६१ हेक्टर) व मक्याचे (११५८४) सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीन (३२६), भात (९०४८, भाजीपाला (२९५८), कांदा रोपवाटीका (६४२), द्राक्षे (६२४), डाळिंब (४०८) हेक्टर नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. ८०६ गावातील ७६ हजार ५५८ शेतकरी बाधित झाले. यात सटाणा (१७१३५), देवळा (१६१७८), चांदवड (१५९००) पेठ (१३१४७), इगतपुरी (३३२१), सुरगाणा (२६८३), नाशिक (२०२८), येवला (१४८७), त्र्यंबकेश्वर (११०४), कळवण (७६७), मालेगाव (५४९) शेतकऱ्यांचा समावेश आहे. चांदवड तालुक्यात पावसाचे पाणी शिरून १०० घरे, ४६ दुकानांचे नुकसान झाले. तालुक्यात ३५ घरांची पडझड झाली. २३ जनावरे दगावली. देवळा तालुक्यात वेगळी स्थिती नव्हती. शहरातून जाणाऱ्या कोलथी, भावडी नद्यांसह तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली. ढगफुटीसदृश पावसाचा कापशी, भिलवाड, वाखारी आदी गावांना फटका बसला. सात घरांची पडझड तर, ४५ घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. ००००

 मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

 चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान   नाशिक : शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले. चांदवडमध्ये दोन बंधारे फुटून उमराणे, परसूल भागात तारांबळ उडाली. जिल्ह्यात ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन, भात, डाळिंबाचा समावेश आहे. ८०६ गावांतील तब्बल ७६ हजार ५५८ शेतकऱ्यांना फटका बसला. शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांची पडझड झाली. परतीच्या पावसाने चांदवड आणि देवळा तालुक्यात हाहाकार उडवला. चांदवड तालुक्यात मातीचा बंधारा फुटल्याने गावातील लोकांना हलवावे लागले. नाशिक शहरासह कळवण, पेठ, सिन्नर, येवला आदी तालुक्यात अवघ्या काही तासात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टीमुळे चांदवड तालुक्यात सर्वाधिक (१०९९२ हेक्टर), देवळा (८२३६), सटाणा (८८५३), पेठ (६२३०), इगतपुरी (१८३१), निफाड (८०७), येवला (१०७६), मालेगाव (९३५), नाशिक (७५०), कळवण (३४१), त्र्यंबकेश्वर ( ४३३), सुरगाणा (६६६), दिंडोरी (१०५) असे एकूण ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांदा (१२९६१ हेक्टर) व मक्याचे (११५८४) सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीन (३२६), भात (९०४८, भाजीपाला (२९५८), कांदा रोपवाटीका (६४२), द्राक्षे (६२४), डाळिंब (४०८) हेक्टर नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. ८०६ गावातील ७६ हजार ५५८ शेतकरी बाधित झाले. यात सटाणा (१७१३५), देवळा (१६१७८), चांदवड (१५९००) पेठ (१३१४७), इगतपुरी (३३२१), सुरगाणा (२६८३), नाशिक (२०२८), येवला (१४८७), त्र्यंबकेश्वर (११०४), कळवण (७६७), मालेगाव (५४९) शेतकऱ्यांचा समावेश आहे. चांदवड तालुक्यात पावसाचे पाणी शिरून १०० घरे, ४६ दुकानांचे नुकसान झाले. तालुक्यात ३५ घरांची पडझड झाली. २३ जनावरे दगावली. देवळा तालुक्यात वेगळी स्थिती नव्हती. शहरातून जाणाऱ्या कोलथी, भावडी नद्यांसह तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली. ढगफुटीसदृश पावसाचा कापशी, भिलवाड, वाखारी आदी गावांना फटका बसला. सात घरांची पडझड तर, ४५ घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

 आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुध्द ११ गुन्हे

८८ हजारांचा माल जप्तः ४ पथकांची करडी नजर-कीर्ती शेडगे   रत्नागिरी : अशोक गायकवाड विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १७६ लिटर, देशी मद्य ६.६६ लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य १२.२४ लिटर, रसायन १५०५ लिटर असा एकूण रुपये ८८ हजार २५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑकटोबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाची करडी नजर असून, त्याविरुध्द कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून ४ पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाने १ ऑक्टोबर ते दि. १४ ऑक्टोबर या कालवधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ८० गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु २०३२ लिटर, देशी मद्य १३.६८ लिटर, विदेशी मद्य ९.०० लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य २०५.६५ लिटर, रसायन ३११५० लिटर, प्लॅस्टिकचे बॅरल, कॅन व काचेचे ग्लास असा एकूण रुपये १५ लाख ४४ हजार ४१० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई- गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गांवरुन प्रवाशी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्द अशी कारवाई येथून पुढेही सुरु राहील. जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्स अॕप क्रमांक- ८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती शेडगे यांनी केले आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी / खबर देणाऱ्या व्यक्तीचे नाव या विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल. 0000

 नाशकातून आता नव्या वेळेत झेपावणार विमाने

‘इंडिगो’चे हिवाळी वेळापत्रक जाहीर; २- २७ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी   हरिभाऊ लाखे नाशिक : इंडिगो कंपनीने नाशिक विमानसेवेचे हिवाळी सत्रातील वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार नाशिकच्या विमानांच्या वेळांत काही बदल करण्यात आले आहेत. काही शहरांतून नवी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीही उपलब्ध होणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून या बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवानगी प्राप्त झाल्यानंतर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नाशिक विमानतळावरील इंदूर, गोवा, नागपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, नवी दिल्ली, हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यांपैकी काही शहरांच्या विमानांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. बेंगळुरूसाठी एक तास आधी, तर हैदराबादसाठी दोन तास आधी विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंदूरची वेळ तीन तास उशिरा, तर अहमदाबाद विमानाची वेळ दुपारऐवजी सायंकाळची करण्यात आली आहे. नवी दिल्ली विमानाच्या वेळेत मात्र कोणताही बदल नाही. दि. २७ ऑक्टोबरपासून नाशिक येथून जयपूरसाठी (व्हाया इंदूर) विमानसेवाही सुरू होत आहे. नव्या वेळापत्रकानुसार नाशिकला अबूधाबी, बँकॉक, कोलम्बो, शिकागो, दुबई, हाँगकाँग, काठमांडू, मॉरिशस, वॉशिंग्टन यांसारख्या ४२ देशांतील शहरांना दररोज आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. वेळांतील बदल नाशिक- गोवा : दुपारी १२.०५ ऐवजी १२ वाजता उड्डाण, १.५० ऐवजी १.४० ला लॅण्डिंग नाशिक-अहमदाबाद : सकाळी १०.४५ ऐवजी सायंकाळी ५.४५ ला उड्डाण, दुपारी १२.१० ऐवजी सायंकाळी ६.५५ ला लॅण्डिंग नाशिक नागपूर : सायंकाळी ४.२० ऐवजी ४.३५ ला उड्डाण, सायंकाळी ६.१० ऐवजी ६.०५ ला लॅण्डिंग नाशिक-हैदराबाद : दुपारी २.२५ ऐवजी १२.३० ला उड्डाण, सायंकाळी ४.२० ऐवजी दुपारी २.१० ला लॅण्डिंग नाशिक-बेंगळुरू : सायंकाळी ४.५० ऐवजी ३.४० ला उड्डाण, सायंकाळी ६.३५ ऐवजी ५.३० ला लॅण्डिंग नाशिक-इंदूर : दुपारी ११.०५ ऐवजी २.४० ला उड्डाण, १२.२० ऐवजी ३.५० ला लॅण्डिंग गोव्याच्या दाबोलिम विमानतळावर लॅण्डिंग गोव्यात आता उत्तर गोवा विमानतळाऐवजी दाबोलिम विमानतळावर नाशिक विमानाचे लॅण्डिंग होणार आहे. या विमानतळावर सेवा शुल्क कमी असल्याने प्रवाशांच्या विमानभाड्यात काहीशी कपात होणार आहे.