Category: महाराष्ट्र

Maharashtra News

महाराष्ट्रात आम आदमी पक्ष दोन जागा मागणार

कुडाळ : आम आदमी पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या दोन जागा लढवण्याची इच्छा असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगून महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कोणतेही प्रकारचे नुकसान होणार नाही…

जुने वृत्तपत्र रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करा – मनिषा पिंगळे

अशोक गायकवाड अलिबाग : स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात २२ ऑक्टोबरपर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले आहे. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या…

पोषण महिना अभियानात ३ वर्ष रायगड जिल्हा राज्यात प्रथम पाच क्रमांकात

अदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव, डॉ. किशन जावळे व निर्मला कुचिक यांनी स्वीकारला पुरस्कार अशोक गायकवाड अलिबाग : देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारतर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण महिना अभियान राबविण्यात…

शासकीय आवारामध्ये निवडणूकीच्या घोषणा देण्यास, मतदाराला प्रलोभन दाखविण्यास निर्बंध – एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील…

अवैधरित्या दारु आणि अंमली पदार्थाची वाहतूक रोखण्यासाठी ‘चेकपोस्ट ‘ कार्यान्वित

सिंधुदुर्गनगरी : आगामी विधानसभा    निवडणूक निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हयात अवैधरित्या दारु आणि अंमली पदार्थाची वाहतूक होऊ नये म्हणून ‘चेकपोस्ट ‘ कार्यान्वित करण्यात…

मतदारांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार – आनंद परांजपे

  अनिल ठाणेकर लोकशाहीमध्ये मतदारांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि लोकशाही जीवंत असल्याचा कानमंत्र किंवा प्रवचन जे नेहमी देत असतात तेच विकासाबद्दल प्रश्न विचारल्यावर विचलित होत असतात. महायुती सरकारकडून मुंब्रा कळवा मतदारसंघातील विकासासाठी आतापर्यंत १५० कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. यातील काही कामे सुरु झाली आहेत, काही टेंडर निघून कामे मार्गी लागतील. न्यायदेवतेच्या हाती आता संविधान आहे, डोळ्यावरच्या पट्टीऐवजी डोळे उघडे आहेत, हा देश परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानावर चालेल हा संदेश देणाऱ्या बदलाचे स्वागत सर्व भारतीयांनी केले पाहिजे. विसंगतीसह मुख्यमंत्रीपदावरुन एक शर्यतही काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा या तीनही पक्षामध्ये दिसून येते. विकासाचे पर्व घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस मतदारांपर्यंत जाणार आहोत. महायुतीचा उमेदवार कमळ घेऊन उभा असेल तिथे कमळाचा प्रचार करु, जिथे  धनुष्यबाण घेऊन उभा असेल तिथे धनुष्यबाणचा प्रचार करु, जिथे घड्याळ घेऊन उभा असेल तिथे घड्याळाचा प्रचार करु, असे मत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.*   मला माहीत नाही विकासाबाबतचे प्रश्न विचारणारे बॅनर कळवा मुंब्र्यात लावण्यात आले.’हक्क मागतो महाराष्ट्र’ अशाचप्रकारे कळवा मुंब्रा मतदारसंघातील १५ वर्षाच्या विकासाबद्दल मतदाराने बॅनरद्वारे प्रश्न विचारला असेल की ‘हिशोब मागतोय मुंब्रा कळवा, १५ वर्ष विकासाचा’, मला त्याची कल्पना नाही. पण मी त्या मतदाराच्या भावनेशी सहमत आहे आणि ज्यांनी विकास केला नसेल कदाचित त्या लोकांनी ते बॅनर फाडले असतील. खरतर लोकशाहीमध्ये मतदारांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि लोकशाही जीवंत असल्याचा कानमंत्र किंवा प्रवचन जे नेहमी देत असतात तेच विकासाबद्दल प्रश्न विचारल्यावर विचलित होत असतात याचे हे एक उदाहरण आहे. नकलाकार,  कलाकार डॉ. जितेंद्र आव्हाड नेहमी टाहो फोडत असतात की महायुती सरकार मुंब्रा कळव्याला विकास निधी देत नाही मुळात महायुती सरकारकडून मुंब्रा कळवा मतदारसंघातील विकासासाठी आतापर्यंत १५० कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून ५५ कोटी, नियोजन विभागाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत पहिले ५० कोटी नंतर ४० कोटी, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तारसाहेब यांच्यामार्फत ५ कोटी असा १५० कोटीचा विकास निधी वितरित करण्यात आला आहे. यातील काही कामे सुरु झाली आहेत,  काही टेंडर निघून कामे मार्गी लागतील. ब्रिटिशकालीन न्यायदेवतेची प्रतिमा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतर बदललेली आहे, ही बाब सकारात्मकदृष्टीने सर्वांनी पहायला हवी. न्यायदेवतेच्या हाती आता संविधान आहे, डोळ्यावरच्या पट्टीऐवजी डोळे उघडे आहेत, हा देश परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानावर चालेल हा संदेश देणाऱ्या बदलाचे स्वागत सर्व भारतीयांनी केले पाहिजे. एकीकडे महाविकास आघाडी म्हणतेय, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची चर्चा करु तर दुसरीकडे शरद पवार हे जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून सूचित करत आहेत, एका बाजुला उद्धव ठाकरे यांनी सातत्याने ही भूमिका मांडायची की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा जनतेसमोर गेला पाहिजे तर दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र सांगतात की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नंतर ठरवू अशाप्रकारे महाविकासआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा या तीनही पक्षांमध्ये विसंगत भूमिका दिसत आहे. लोकसभेतील निवडणूक निकालानंतर जिंकलेल्या जास्त जागांमुळे काँग्रेस पक्ष आणि स्ट्राईकरेट अधिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे शिवसेना उबाठा पेक्षा मोठा भाऊ आहोत अशी अनेक नेत्यांच्या वक्तव्यामधून भूमिका येत असते. या विसंगतीसह मुख्यमंत्रीपदावरुन एक शर्यतही तीनही पक्षामध्ये दिसून येते. शब्दांचा प्रयोग करत असताना कुठल्याही  परिस्थितीमध्ये धर्माचा, जातीच्या भावना दुखावल्या जातील अशाप्रकारचे शब्दप्रयोग करु नयेत, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कायम विकासाचा दृष्टिकोन ठेवून येणाऱ्या निवडणूकीमध्ये विकास कामांच्या जोरावरच आम्ही मतदारांपर्यंत जाणार आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच धोरण आहे. आणि हेच विकासाचे पर्व घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस मतदारांपर्यंत जात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचा समन्वयक म्हणून ठाणे व पालघर जिल्ह्यातील ज्या ज्या जागा मागायच्या आहेत त्या जागांचा अहवाल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे दिलेला आहे.त्याच्यावर राज्यपातळीवर योग्य ती चर्चा व निर्णय होईल, ज्या जागा आम्हाला लढायला मिळतील त्या जागा महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस लढेल. ज्या जागांवर महायुतीचा उमेदवार कमळ घेऊन उभा असेल  तिथे कमळाचा प्रचार करु, जिथे …

महर्षि वाल्मिकी जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

  महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांच्या शुभहस्ते, समाजविकास विभागाचे उपआयुक्त  किसनराव पलांडे यांच्या शुभहस्ते, लेखाधिकारी मारूती शिंदे व इतर अधिकारी…

महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

हरिभाऊ लाखे नाशिक : शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने हाती घेतले आहे. या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रकाश पेट्रोल पंप…

बदलत्या हवामानाची आव्हाने पेलण्यासाठी संशोधन केंद्राला निधीची गरज-डॉ.भरत वाघमोडे

  अशोक गायकवाड कर्जत : बदलत्या हवामानाने निर्माण केलेली आव्हाने पेलण्यासाठी संशोधन केंद्र अद्यावत करणे आवश्यक असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन…

प्रियांका गांधीं अखेर वायनाडमधून लढणार

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी अखेर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. राहुल गांधीनी लोकभेत दोन मतदार संघातून विजय मिळवल्यानंतर वायनाडच्या खासदारीकीचा राजीनामा दिला होता.…