Category: महाराष्ट्र

Maharashtra News

पाणी प्रश्नी नाशिक महापालिकेवर महिलांची शहर बसमधून धडक

प्रवेशद्वारावर हंडे आपटून निषेध हरिभाऊ लाखे नाशिक : नवीन नाशिक, खुटवडनगर भागात एक-दोन महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी सिटीलिंक बस घेऊन थेट…

चार दिवसांनी मुरबाड करांना सडलेल्या तारातुन विजपुरवठा

  नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर. राजीव चंदने मुरबाड : झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणचे विज पुरवठा करणारे शेकडो पोल पडले होते.तर ठिकठिकाणी तारा तुटल्या होत्या.त्यामुळे तब्बल चार दिवस तमाम मुरबाड कर अंधारात…

पाणी प्रश्नी नाशिक महापालिकेवर महिलांची शहर बसमधून धडक

  प्रवेशद्वारावर हंडे आपटून निषेध हरिभाऊ लाखे नाशिक : नवीन नाशिक, खुटवडनगर भागात एक-दोन महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी सिटीलिंक बस घेऊन…

माथेरानकर विधानसभेला प्रस्थापितांना देणार धक्का

माथेरान : विधानसभेच्या निवडणुकांचा ज्वर आता हळूहळू जोर धरू लागला असून माथेरानमध्येही त्याचे वारे आता फिरू लागले आहे परंतु यावेळी माथेरानकर कोणाला साथ देणार हे मात्र अजूनही बोलत असतात व…

शहीद झाल्यानंतर भेदभाव का?’

नाशिकमध्ये अग्निवीरांच्या बलिदानावर राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल नवी दिल्ली : नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांच्या बलिदानानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी शहीद झाल्यानंतर भेदभाव…

मुरबाड विधानसभा मतदारसंघात निष्ठावंताच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

निष्ठावंतांच्या पाठीशी उभे राहणार : कपिल पाटील मुरबाड : भाजपा हा सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून, मुरबाड तालुक्यातील एका व्यक्तीचा तो पक्ष नाही. अशा व्यक्तींच्या जोखडातून भाजपाला मुक्त करणार असून, पक्षाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. भाजपाच कार्यकर्ता स्वाभिमानी आहे अन, तो स्वाभिमानी राहील, अशी ग्वाही माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिली. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असून, कोणावरही अन्याय होणार नाही, असा दिलासा कपिल पाटील यांनी दिला. भाजपाच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आज मुरबाड येथील माऊली हॉलमध्ये पार पडला. या मेळाव्याला मुरबाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण हॉल गच्च भरल्यानंतर हॉलचे आवार व हॉलबाहेर कार्यकर्ते उभे होते. या मेळाव्याला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, ज्येष्ठ नेते रामभाऊ पातकर, तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, शरद म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत, माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी, रामभाऊ बांगर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, दीपक खाटेघरे, नारायण गोंधळी आदी उपस्थित होते. भाजपाचा कार्यकर्ता कसा मोठा होईल, याला आपण प्राधान्य दिले. पदावर नसलो, तरी भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आपण कायम पाठीशी राहू, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी देऊन भाषणाला सुरुवात केली. लोकसभेला केलेल्या कामाप्रमाणेच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विधानसभेला दुप्पट काम करू, असा विश्वास व्यक्त केला. मुरबाड तालुक्यात विकास प्रकल्पे राबविताना शेतकऱ्यांच्या आपण कायम पाठीशी राहू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला धमक्या दिल्या जातात. कल्याण-मुरबाड रेल्वे, शहापूर-मुरबाड रस्ता तयार करण्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला मोबदला मिळेल, यासाठी आपण प्रयत्न केले. यापुढील काळातही शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला. कल्याण-मुरबाड रेल्वे, माळशेज घाटातील रस्त्याचे काम, शहापूर-मुरबाड रस्ता ही कामे केंद्र सरकारची आहेत. त्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करु नये, असा टोलाही कपिल पाटील यांनी लगावला. 00000

काम रस्ते सफाईचे, निविदेत अटी मात्र घंटागाडीच्या!

नाशिक महापालिकेत अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार हरिभाऊ लाखे  नाशिक : विधानसभा निवडणुका दृष्टीक्षेपात असताना नाशिक महापालिकेचा अजब कारभार आता समोर आला आहे. महापालिकेचे रस्ते सफाईचे काम असताना निविदेत मात्र घनकचरा संकलनाशी…

 महायुतीच्या माध्यमातून शहापूरची विकसित शहराकडे वाटचाल

  माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे प्रतिपादन शहापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून शहापूर शहराची विकसित शहराकडे वाटचाल सुरू आहे. शहापूरात नागरी सुविधांसाठी विविध कामे सुरू असून, भविष्यात एक सुनियोजित शहर म्हणून शहापूरचा नावलौकिक होईल, असा विश्वास माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केला. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेतून शहापूरमध्ये सुमारे साडेआठ कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ७ मधील जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र, प्रभाग क्र. ११ मधील नगरपंचायत कार्यालयासमोर उद्यान, तहसील व पोलिस ठाण्याच्या आवारात हायमास्ट व स्वच्छतागृह, सोनार आळी येथे कॉंक्रिट रस्ता, भेंडी आळी येथे कॉंक्रिट रस्ता, प्रभाग क्र. १४ मधील डोंबिवली नागरी बॅंकेनजीक ओपन स्पेस वॉल कंपाऊंड बांधणे, जुना आग्रा रोड केणे आळी ते भारंगी नदीपर्यंत गटारांचे कॉंक्रिटीकरण, हायमास्ट बसविणे आदी कामांचे कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे शहापूर विधानसभा प्रमुख अशोक इरनक, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत, भाजपाचे तालुकाध्यक्ष विवेक नार्वेकर, नगरसेविका मिताली भोपतराव, योगेश महाजन, विनोद कदम, कामिनी सावंत, माजी नगरसेविका वैदेही नार्वेकर आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहापूर येथील पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभासाठी गायकवाड कुटुंबांने दानपत्रान्वये नगरपंचायतीला जमीन दिल्याबद्दल गायकवाड कुटुंबियांचे कपिल पाटील यांनी आभार मानले. तसेच या जलकुंभामुळे शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, याबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शहापूरच्या विकासासाठी आणखी भरीव निधी मिळेल, असा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला. 0000

अखेर धोकादायक विजेचे पोल काढण्यात आले

माथेरान : माथेरान मध्ये अनेक ठिकाणी जुने गंजलेल्या स्वरूपात विजेचे पोल आहेत जे वादळी वाऱ्याने केव्हाही उन्मळून पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती याबाबत दि.४ ऑगस्ट रोजी ” विजेच्या…

 पीवायसीतर्फे राज्यभरातील खेळाडूंसाठी 19 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेट निवड चाचणी

 निवड झालेल्या खेळाडूंना वर्षभर मोफत प्रशिक्षण देणार पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने राज्यभरातील खेळाडूंसाठी पीवायसी क्रिकेट अकादमीची येत्या 15 व 16 ऑक्टोबर रोजी 19 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेटची निवड…