Category: महाराष्ट्र

Maharashtra News

कोकणात मुसळधार पाऊस

रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट रत्नागिरी : मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू…

मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना

पंढरपुरात मुख्यालय, 50 कोटींची तरतूद मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. या महामंडळावर  कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवतील अधिकारीची व्सवस्थापकिय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्य सरकारकडून याबाबत आज अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. “आषाढी वारी” म्हणजे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावांपासून पंढरपूर पर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा होय. वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच, परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. “वारी” ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशी अशा दोन वेळा होते. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते. तसेच पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातुन वेगवेगळ्या ठिकाणा वरुन मार्गस्थ होत असतात. संत तुकाराम महाराज (देहू), संत एकनाथ (पैठण), संत सोपानकाका (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव (पंढरपूर), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत जनार्दनस्वामी (छत्रपती संभाजीनगर), संत जयरामस्वामी (वडगाव), संत शेकूबोवा (शिरसावडी), संत घाडगेबोवा (कोळे), संत तपकिरीबोवा (चिंचगाव), संत मच्छिंद्रनाथ (मच्छिंद्रगड), संत रोहिदास (पंढरपूर), संत संताबाई (पंढरपूर), संत चोखोबा (पंढरपूर), संत चोखोबा बंका (मेहुणपुरा), संत दामाजी (मंगळवेढे), संत रुकमाबाई (कौंडण्यपूर- अमरावती), संत शंकर महाराज (माहुली-अमरावती), संत गोरखनाथ (शिराळा), या दिंडींबरोबर लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात.

फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात

मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात दबाव आणत आहेत. फडणवीस आणि छगन भुजबळ हे आरक्षणाच्या विरोधात आहेत असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.…

काँग्रेसच्या सात आमदारांची गद्दारी

मुंबई : काँग्रेसच्या सात आमदारांनी गद्दारी केल्याने मविआचे उमेदवार ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना पराभव पत्कारावा लागला. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निव़डणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून…

आमदार ‘पक्ष’कैदेत

० विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी ० आमदारांवर हॉटेलच्या सीसीटीव्हीची नजर ० मतदान होईपर्यंत आमदारांचा मुक्काम पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्वाती घोसाळकर मुंबई: विधान परिषदेच्या मतदानाआधी सावधगिरीचा उपाय म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदांराना…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका

अनेक घरात घुसले पाणी,लाखोंचे नुकसान सिंधुदुर्गनगरी –  सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टी झाली. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. कित्येकांच्या घरात पाणी शिरले. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…

सोलापुरात भाजपाला दगाफटका झाला!

सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वकीय नेत्यांकडूनच दगाफटका झाला. भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मतदान केले. पण आम्ही या नेत्यांचे नाव घेणार नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. काँग्रेसच्या…

लहान बाळा सारखे अजून कितीवेळ रडणार- शिंदे

नागपुर : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं. लोकसभा निवडणुकीत 13 जागा आम्ही लढलो आणि सात जागा जिंकल्या. च्यापेक्षा दोन लाख मत आम्ही जास्त घेतली.…

शिंदे सरकार आता जनतेची घरं फोडताय- उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : आधी आमचे पक्ष फोडले आता लाडकी बहीण योजनेमुळे शिंदे सरकार आता महाराष्ट्रातील घरं फोडतायत अशी घणाघातील टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर केली आहे. जी योजना आणल्यामुळे सगळीकडे महिलांची गर्दी उसळलीय. चांगली गोष्ट…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला

 6 दहशतवादी ठार, 2 जवान शहीद काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मंजकोट भागातील ग्लुटी गावात लष्कराच्या चौकीवर तैनात असलेल्या जवानावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.…