Category: महाराष्ट्र

Maharashtra News

पुढचा डोस कधी द्यायचा हे लवकरच सांगेन – शरद पवार

बारामती : मोदींपेक्षा जास्त मताने तुम्ही तुमचा खासदार जिंकविला. मोदींची गॅरंटी इथे चालली नाही. शेतकऱ्याला कसे अडचणीत आणता येईल याचाच विचार हे मोदी सरकार करत असते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते खाणाऱ्यांचा विचार करतात, अरे परंतू जर पिकवणाऱ्यानेच…

ओबीसी आरक्षणासाठीच्या हाकेंच्या उपोषणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

जालना: मराठा आरक्षण देताना आपण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषणास बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असं…

बिहारमधिल ६५ टक्केचे आरक्षण रद्द; महाराष्ट्रातील आरक्षणही अडचणीत ?

नितीश कुमारांना हायकोर्टाचा झटका पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाटणा हायकोर्टाने झटका दिला आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावरुन ६५ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे. नितीश कुमारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. नोकरी…

जरांगेंच्या विरोधात आम्हीही उमेदवार उभे करू : प्रकाश शेंडगे

नाशिक : मनोज  जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसीही जरांगेच्या विरोधात उमेदवार उभा करतील, आमचं बहुमत आहे. ६० टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतलं तर आम्ही ८० टक्के…

मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा लढवणार ?

छत्रपती संभाजीनगर :  सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127  जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे…

अजित पवार आणि शिंदेमुळेच भाजपा ७ जागा जिंकू शकला

अमोल मिटकरींचा अजब तर्क अकोला: भाजपला राज्यात मिळालेल्या लोकसभेच्या ९ जागा या केवळ अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्याची अजब तर्क अमोल मिटकरींनी मांडला आहे. कालच राजकीय भाष्य करण्याआधी प्रदेशाध्यक्षांची…

शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा सुनिल तटकरे यांनी घेतला आढावा

महायुतीमध्ये ज्या मतदारसंघात उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही – सुनिल तटकरे शिर्डी : आपल्याला महायुतीत सर्वच ठिकाणी उमेदवारी मिळेल असे नाही मात्र ज्याठिकाणी उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शिर्डी येथे दिला. आज राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा दिवस असून सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनिल तटकरे यांनी घेतला. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ता जागरुक असला पाहिजे.आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जायचे आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला आपल्याला उत्तर देण्याचे काम करायचे आहे असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या जिल्हयाने अजितदादांना नेहमीच पाठबळ दिले आहे. हे भरभक्कम  पाठबळ कायम मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. लोकसभा निवडणूकीत आणि आताही अजितदादांना सर्वाधिक टार्गेट करण्यात येत आहे. हे आपला मित्रपक्ष करत नाहीय तर आपल्यावर सतत लक्ष ठेवून असलेले विरोधातील काहीजण ही बदनामीची मोहिम राबवत आहेत त्यांना सडेतोड उत्तर दयायचे आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. जनसामान्यांचे पाठबळ कसे मिळेल अशी भूमिका घेतली तर पक्षसंघटना अजून मजबूत होणार आहे.जनसामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला संघटनेने दिलेल्या पदाचा उपयोग कसा करता येईल यावर काम करा असा सल्लाही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपले विचार मांडले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक शिर्डी येथे आज पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, उत्तर शिर्डी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रदेश सचिव संग्राम कोतेपाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेणार

मनोज जरांगेंचा सरकारला १३ जुलैचा अल्टीमेटम छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातूनच घेणार आणि त्यासाठी सरकारला आम्ही १३ जुलैचा अल्टीमेटम दिला आहे असा अंतिम इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…

ओबीसी आंदोलक आक्रमक; उपोषणकर्त्यांचा उपचारास नकार

 वडीगोद्री ( जालना) : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस असून दोघांनीही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान सरकार ओबीसी आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली  करायचा आहे – सुनिल तटकरे

अहमदनगर : आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी दौऱ्याची व्यापकता लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अजून वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली  करायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात अहमदनगर जिल्हयातून केली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तिथपासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी या अहमदनगर जिल्ह्यातून झाली म्हणून या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करताना यापूर्वी हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहिला तसाच पुन्हा एकदा अजितदादाला पाठिंबा देईल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे काम महाविकास आघाडीने केले. याच आधारावर लोकसभा निवडणूक राज्यात लढली गेली शिवाय ही निवडणूक अक्षरशः ग्रामपातळीवर नेऊन ठेवली गेली. मात्र असे असताना नगर शहराचे तरुण आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीच्या उमेदवारांना ३२ हजाराचे लीड देत या सगळ्यावर मात करून दाखवले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले. पक्षाचा कार्यकर्ता हा धोरण समोर ठेऊन आणि नेता जे काम करतो ती भूमिका घेऊन काम करत असतो त्यावेळी नेत्याच्या त्या संवेदना घेऊन लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचायचे असते असेही सुनिल तटकरे म्हणाले. यापुढे सर्वांनी जबाबदारीचे भान लक्षात घेऊन काम केले पाहिजे असे सांगतानाच विरोधकांनी ज्यापद्धतीने गैरसमज पसरवले आहे ते कसे चुकीचे आहे हे लोकांना सांगायची गरज आहे असे आवाहन कार्यकर्त्यांना सुनिल तटकरे यांनी केले. अजितदादांचे नेतृत्व व्यापकतेने पुढे न्यायचे असेल तर अजितदादांना ताकद देणे गरजेचे आहे. जनाधार वाढवण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे असा विश्वास निर्माण करणारे मार्गदर्शन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले. भाजपकडे जाऊन सत्तेत सहभागी होणार होते त्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला. यापुढे सर्व घटकांना सोबत घेऊन काम करायचे आहे. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडलेली नाही हे आपण सांगत आहोतच परंतु लोकसभा निवडणुकीत जे जे घटक बाजूला गेले आहेत त्या घटकांना सोबत आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. योग्य भूमिका घेऊन लोकांसमोर गेलो तर पक्षाचे व्यापक हित जोपासणारे आणि जो आपल्यासाठी दिवसरात्र काम करतोय त्याला जनमानसात स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले. निवडणूक विकासावर लढली गेली नाही मात्र यावेळी लोकसभेत आलेले अपयश विसरुन किंवा झालेल्या चूका दुरुस्त करुन विधानसभा निवडणुकीत यशाची पायरी नक्की मिळवू असा विश्वास महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. या आढावा बैठकीत युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार संग्राम जगताप यांनी आपले विचार मांडले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी अहमदनगर शहर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी, फ्रंटल सेल व प्रमुख तसेच जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यानंतर दुपारी अहमदनगर दक्षिण ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहूरी  यामधील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि आढावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतला. विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार संग्राम जगताप, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे,महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 000000