Category: महाराष्ट्र

Maharashtra News

हिंदुनो, तीन मुले जन्माला घाला !

सरसंघचालक भागवातांचे आवाहन नागपूर : हिंदू धर्म ठिकवायचा असाल असेल तर तमाम हिंदू जोडप्यांनी किमान तीन मुले जन्माला घालायलाच पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथील एका…

संघ दक्ष ! फडणवीसच मुख्यमंत्री !

मुंबई : मागील सत्तासंघर्षात सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याएवेजी एनवेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा धक्कादायक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून घेण्यात आला…

नाशिककरांना हुडहुडी!

 शहरात पारा १०.५ अंशावर, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद   हरिभाऊ लाखे नाशिक: राज्यातील शहरांच्या तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असताना शहरात गुरुवारी किमान १०.५ तर कमाल २७.४ तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडचा पारा गुरुवारी पहाटे अवघ्या ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील २४ तासांकरीता थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली अहे. तर पुढील दोन ते तीन दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे. शहरात गुरुवारी किमान १०.५, तर कमाल २७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. बुधवारी किमान १०.६, तर कमाल २७.५ अंश सेल्सिअस आणि मंगळवारी किमान १०.८, तर कमाल २८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. राज्यात नाशिकच्या खालोखाल अहिल्यानगर आणि पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी अहिल्यानगरमध्ये ९.४, तर पुण्यात ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातही १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडचा पारा घसरला निफाड : गेल्या तीन-चार दिवसांपासून निफाड तालुक्यात थंडीचा पारा सातत्याने घसरत असून, गुरुवारी कुंदेवाडी येथील निफाड गहू संशोधन केंद्रात ८ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यातील निफाड येथे नीचांकी तापमान होते. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून निफाड तालुक्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या होत्या. कडाक्याच्या थंडीने सकाळी भरणाऱ्या शाळांमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गुरुवारी मात्र चांगलीच वाढली होती. निफाड तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने द्राक्ष बागांच्या शेंड्यांच्या वाढीवर परिणाम होईल. मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ००००

समीर भुजबळ यांचे राष्ट्रवादीत पुनर्वसनाचे संकेत

हरिभाऊ लाखे नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी पदाधिकारी समीर भुजबळ हे पराभूत झाल्यानंतर पुन्हा या पक्षाचे ज्येष्ठ नेते, काका छगन भुजबळ यांच्याबरोबर सक्रिय झाले आहेत. समीर हे सोबत होते, आहेत आणि राहतील, अशा शब्दांत काकांनी पुतण्याची पाठराखण केल्यामुळे राष्ट्रवादीत (अजित पवार) नव्याने त्यांचे पुनर्वसन होण्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक राजकारणात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ हे मैदानात उतरल्याने उभयतांमध्ये पराकोटीचे मतभेद झाले होते. नांदगावमधील बंडखोरीचे पडसाद नांदगावच नव्हे तर, जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात उमटले. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष उमेदवारी केली होती. तेव्हापासून छगन भुजबळ यांनी काहिसे अलिप्त धोरण स्वीकारत त्यांचे निवडणूक लढवणे ही बंडखोरी नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा राजीनामा देऊन ते निवडणूक लढत असून शिंदे गटाने देवळालीत अधिकृत उमेदवार दिल्याकडे काकांनी लक्ष वेधले होते. नांदगावमधील या उमेदवारीने कांदे-भुजबळ वाद पुन्हा उफाळून आला. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप झाले. हे वाद प्रचारासह मतदानाच्या दिवशी समर्थकांना धक्काबुक्की, धमक्यांपर्यंत गेले होते. निवडणुकीत कांदे यांनी भुजबळ यांना पराभूत करुन काका-पुतण्याला एकाचवेळी शह दिला. विधानसभा निवडणुकीआधी छगन भुजबळ यांनी पुत्र पंकज यांची विधान परिषदेवर वर्णी लावली होती. पराभूत झालेले पुतणे समीर भुजबळ यांचे पुनर्वसन आता कुठे, कसे करणार, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. गुरुवारी महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबई नाका येथे फुले स्मारकात छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी समीर हे बरोबर होते, आहेत आणि उद्याही राहतील, अशा मोजक्याच शब्दांत काय ते सांगून टाकले.

प्रियंकां गांधीनी संविधान हाती घेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली

नवी दिल्ली : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी नेसून कुटुंबीय आणि नातेवाईकांसह संसद भवनामध्ये आलेल्या प्रियंका गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेत लोकसभा सदस्यत्वाची…

नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद

गळणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती हरिभाऊ लाखे नाशिक : शहरात पाणी पुरवठ्यातील समस्यांवरून निवडणुकीआधी बराच गदारोळ उडाल्यामुळे आचारसंहिता संपताच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पाणी वितरणाशी संबंधित विविध कामे शनिवारी करण्यात येणार असून त्यामुळे या दिवशी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नाशिक स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपा पाणी पुरवठा वितरण विभाग यांच्यातर्फे विविध जलशुध्दीकरण केंद्र आणि सहायक केंद्रांवर प्रवाह मीटर, व्हॉल्व्ह बसविणे यासह इतर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रात उच्चदाब खांब स्थलांतरीत करणे, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात प्रवाह मीटर बसविणे, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी प्रवाह मीटर, व्हॉल्व्ह बसविणे, शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी प्रवाह मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या शिवाय सहायक जलशुध्दीकरण केंद्रात याच स्वरुपाची कामे केली जातील. सातपूर विभागातील मुख्य वाहिनीवर व्हॉल्व्ह आणि पाणी मापक मीटर बसविणे, सातपूर प्रभाग क्रमांक नऊमधील कार्बन नाका येथील वाहिनीची गळती थांबविणे, प्रभाग १० मधील अशोकनगर येथे गळती लागलेल्या ९०० मिलिमीटर वाहिनीची दुरुस्ती, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक येथील जलवाहिनीची दुरुस्ती, पाथर्डी फाटा येथील व्हॉल्व्ह दुरुस्ती, कशिश हॉटेलजवळील जलवाहिनीवरील व्हॉल्व्हची गळती बंद करणे तसेच हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंदनगर कुंभाच्या वाहिनीवरील गळती बंद करणे. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत वासन नगर, राणेनगर, पाथर्डी फाटा येथील जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह बसविणे व तत्सम कामे केली जातील. नाशिकरोड विभागातील उपनगर येथील संजय गांधी नगर वाहिनीतील गळती आणि पवारवाडी जलकुंभ भरणाऱ्या वाहिनीची जेलरोड सिग्नलजवळ गळती बंद करण्याची कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन व्यापक स्वरुपातील कामांमुळे शनिवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत शहरात पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाहूी. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. शनिवारी दिवसभर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 000

राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पुणे सर्वसाधरण विजेता;

पुणे क्रीडा प्रबोधिन उपविजेते अहिल्यानगर २७ नोव्हेंबर – सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनर डिस्ट्रीक्ट आयोजित ५व्या महाराष्ट्र राज्य रोड…

साकिब रिझवीतर्फे रविवारी मॅरेथॉन

  मालाड : वांद्रे पूर्व बीकेसी येथे सहावी साकिब रिझवी मेमोरियल कॅन्सर अवेअरनेस मॅरेथॉन १ डिसेंबर रोजी जी-८ ग्राउंड येथे सकाळी साडेपाच वाजता आयोजन केले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर प्रसिद्ध ऑलिंपिक ॲथलीट अक्षय खोत यांच्यासह अनेक देशांचे राजकीय मान्यवर व अभिनेता अरबाज खानही उपस्थित राहणार आहेत. आरोग्य, पर्यावरणीय शाश्वतता आणि महिला सुरक्षितता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी व सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित केल्याचे रुबिना अख्तर हसन रिझवी यांनी पत्रकारांना सांगितले. 000

बदलापुरात गरजूंना मदतीचा हात

00000   बदलापूर : गरजू आणि दिव्यांगबांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट मागील अनेक महिन्यांपासून सेवा बजावत आहे. पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल मराडे यांच्या माध्यमातून मागील अनेक महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशीष दामले यांच्या हस्ते या नागरिकांना धान्याचे वाटप करण्यात आले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांच्या माध्यमातून वर्षभर चालणाऱ्या सामाजिक उपक्रमातून प्रेरणा घेत राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अनिल मराडे यांनी बदलापूर पूर्व शिरगाव आपटेवाडी परिसरातील गरजू आणि दिव्यांग नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य वाटपाचे काम त्यांनी हाती घेतले. या उपक्रमाला आशीष दामले यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते या नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले. या मदतीचा लाभ घेणाऱ्या या नागरिकांनी अनिल मराडे व दामले यांचे यावेळी विशेष आभार मानले.

 अभय योजनेत 27717 थकबाकीदारांना लाभ;

24.40 कोटी घरपट्टी वसूल हरिभाऊ लाखे नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महापालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी राबविलेल्या अभय योजनेत दोन महिन्यात २७, ७१७ मिळकतधारकांनी लाभ घेतला. यातून २४.४० कोटी रुपयांची घरपट्टी अदा केली, तर महापालिकेने १२.५१ कोटी रुपयांचा दंड माफ केला. महापालिकेला शासनाच्या माध्यमातून जीएसटी प्राप्त होतो. जवळपास ९८५ कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून शासनाकडून प्राप्त होतो. जीएसटीनंतर महापालिकेला घरपट्टीतून अधिक उत्पन्न मिळते. वार्षिक अडीचशे कोटी रुपये महसूल घरपट्टीच्या माध्यमातून मिळणे अपेक्षित आहे. मात्र, एक एप्रिल २०१८ नंतर शहरातील नवीन मिळकतींना दुप्पट घरपट्टी लागू करण्यात आल्याने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ३०० कोटीपर्यंत थकबाकीची रक्कम पोचली आहे. महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने देयकांचे वाटप होत नाही. त्यामुळे आता घरपट्टी बिलांचेदेखील आउटसोर्सिंग करण्यात आले आहे. महापालिकेकडून उत्पन्नात वाढ करण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी आगाऊ घरपट्टी अदा केल्यास सवलत योजना राबविली जाते. त्यानंतर मात्र मुदत संपल्यानंतर घरपट्टी अदा न करणाऱ्यांना जुलै महिन्यापासून घरपट्टीच्या थकबाकी वर मासिक दोन टक्के शास्ती केली जाते. एक एप्रिल २०१८ नंतर महापालिकेच्या रेकॉर्डवरील मिळकतींना दुप्पट दराने घरपट्टी लागू करण्यात आल्याने थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. घरपट्टीची मूळ थकबाकीची रक्कम १७३ कोटी रुपये आहे. त्यावरील दंडाची रक्कम ही २७२ कोटी रुपये आहे. त्यामुळे महापालिकेने दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी १ ऑक्टोंबर २०२४ पासून अभय योजना लागू केली. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थकबाकीची रक्कम अदा केल्यास दंडाच्या रकमेत ९५ टक्के माफी, डिसेंबर महिन्यात ८५ टक्के, तर जानेवारी २०२५ मध्ये ७५ टक्के शास्ती माफी असे योजनेचे स्वरूप आहे. १ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या दोन महिन्यांत २७,७१७ थकबाकीदारांनी लाभ घेतला. असा मिळाला लाभार्थ्यांना लाभ सातपूर विभागात ३,४४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यांच्याकडून २. ५२ कोटी रुपये थकबाकी जमा झाली असून, ९० लाखांची दंडमाफी देण्यात आली. पश्चिम विभागात १, ७८७ थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेत ३.२२ कोटी रुपये थकबाकी अदा करून १. १४ कोटी शास्तीचा लाभ घेतला. पूर्व विभागात ४, ९५०, पंचवटी विभागात ६,२१०, सिडको विभागात ७,०९१, नाशिक रोड विभागात ४,२३९ याप्रमाणे लाभ घेण्यात आला. कोट ”थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली असून, थकबाकीदारांनी एकरकमी थकबाकी अदा करून दंड माफीचा लाभ घ्यावा.” – श्रीकांत पवार, कर उपायुक्त, महापालिका. ००००