Category: महाराष्ट्र

Maharashtra News

लोकसभेचा निकाल महायुतीचा  ‘निकाल’ लावणारा !

स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूक संपून देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण लोकसभेच्या या निकालानंतर महाराष्ट्रात मात्र भाजपाप्रणीत महायुतीचा पुरता निकाल लागल्याचे चित्र आहे. लोकसभेतील निकालानुसार विधानसभा क्षेत्रातील मतांची…

खातेवाटप जाहीर

अमित शाह पुन्हा गृहमंत्री, गडकरींकडे रस्ते  विकास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अमित शाहयांच्याकडे पुन्हा एकदागृहमंत्रीपद  सोपवण्यात आले आहे. नितीन गडकरींकडे रस्ते  विकास कायम ठेवण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचीजबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनीरविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला  कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीहोती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथघेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडेसर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यातआलं. त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणिपरिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एसजयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणिअश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे. बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वेमंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हेखातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणारअसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय? अमित शाह- गृहमंत्रालय राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय एस जयशंकर – परराष्ट्र नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय…

सगे सोयरेबाबत तोडगा काढणार-अजित पवार

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आमची एकत्रित चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने सगे सोयरे बाबत निर्णय घेण्याबाबत काय, कुणी बोलायचं हे आमचं ठरलं आहे. आम्ही लक्ष घालून मार्ग…

मोदींचे ७२ जणांचे मंत्रीमंडळ

अजित पवारांना भोपळा; शिंदे सेनेची एका राज्मंत्रीपदावर बोळवण मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश नितीन गडकरी, पीयुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांना…

८वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

पुण्याचा सुखबिंदर कटनोरिया चौथ्या फेरीत दाखल कोल्हापूर – श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम येथे सुरु असलेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या…

शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना पोलिसाला अटक

लातूर : शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी या पीएसआयला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड…

काँग्रेसच्या यशात सेनेचा वाटा – राऊत

मुंबई : शिवसेनासोबत नसती तर काँग्रेसच्या इतक्या जागा आल्या असत्या का? हा साधा प्रश्न आहे. काही ठिकाणी आमची मदत झाली नसती आणि त्यांची आम्हाला झाली नसती तर हे यश मिळालं असतं का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय…

नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला सावरले– सुशीलकुमार शिंदे

मुंबई – कठीण काळात महाराष्ट्रात नाना पटोलेंनी ज्या पद्धतीने काँग्रेस उभी केली ते महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. नुसतीच उभी केली नाही तर आर्थिकदृष्ट्याही चांगल्याप्रकारे सावरलं. तुम्ही जे काम केले ते सदैव लक्षात राहणारं आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते…

ठाकरेंच्या संपर्कात सहा नव्हे चाळीस आमदारही असू शकतात

सचिन अहिर यांचा गुगली ! मुंबई : लोकसभा निवडणूकीत भाजपाप्रणित महाविकासा आघाडीचा दारूण पराभव झाला. त्यातही एकनाथ शिंदे यांच्या १५ पैकी सात जागा फक्त निवडून आल्या. माझा एक जरी सहकारी पडला तरी…

राज ठाकरेंची ‘मनसे’ माघार

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या सभांमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना च्रकावून टाकणारा निर्णय घेत कोकण पदवीधर…