Category: महाराष्ट्र

Maharashtra News

विनायक राऊतांचे डिपॉझिट जप्त करणार-नारायण राणे

सिंधुदुर्ग: आयुष्यात सगळी पदं ही रेकॉर्ड ब्रेक करून मिळवली आहेत, यंदाच्या लोकसभा निवडणूकीत शिल्लक सेनेच् विनायक राऊतांचे डिपॉझिट जप्त करून तब्बल अडीच लाख मताधिक्यांने विजय अपेक्षित असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे…

मोदींना रोखणे ही देशाची गरज- पवार

सातारा – नरेंद्र मोदींची हुकमशाही रोखणे ही देशाची गरज आहे. एक एक जागा निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी काम करतेय. मोदींची एक एक जागा कमी करणे, मोदींची संसदेतील संख्या कमी करणे, त्यांची शक्ती कमी करणं ही आता…

दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही-एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार

महायुतीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांची घोषणा प्रकल्पासाठी ३५०० कोटींचा कृती आराखडा कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता कायमची मिटणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी आयोजित केलेल्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रिफ, मंत्री शंभुराज देसाई आदी महायुतीचे नेते उपस्थित होते. कोल्हापूर शक्तिपीठ महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. ही निवडणूक एका व्यक्तीची नाही आणि एका मतदारसंघाची देखील नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर आपण वेगळे लढत असलो तरी या निवडणुकीत राष्ट्रभक्ती आणि देशाचा विकास डोळ्यासमोर एकजुटीने लढायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था केवळ मजबूत केली नाही तर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणली. आता भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे जगभरात भारताचा मानसन्मान वाढला आहे. राज्यातील महायुतीचे सरकार झपाट्याने काम करत आहेत. हे सरकार घरात बसणारे, फेसबुकवरुन काम करणारे सरकार नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा, शासन आपल्या दारी असे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले. कोल्हापुरकर शब्दाला पक्के आहेत. ते महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पंचगंगेचे प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने ३२०० कोटींचा प्रकल्प तयार केला आहे. कोल्हापुरातील महापुर निवारण्यासाठी ३५०० कोटींचा आरखडा शासनाने मंजूर केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विरोधक पंतप्रधान मोदींचा व्देषाने पिडीत आहे. २०१४ आणि २०१९ प्रमाणेच २०२४ च्या निवडणुकीत जनता विरोधकांचा सुपडा साफ करेल. संविधान बदलणार अशी ओरड करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी परखड शब्दांत सुनावले. ६० वर्षे सत्तेत असताना काँग्रेसला कधी संविधान दिन साजरा करण्याचे सुचले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून संविधान दिन सुरु केला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोवर संविधान कधीही बदलणार नाही, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लोटला जनसागर कोल्हापुरात ४२ डीग्री तापमान असून देखील महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीचा अलोट महासागर आज कोल्हापुरकरांनी पहिल्यांदा बघितला असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोल्हापुरातील मुख्य रस्ते, गल्ली, बोळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहत होते.

चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादतून 100 जणांना विषबाधा झाली आहे. भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाप्रसाद घेतल्यानंतर जवळपास 100 जणांना त्रास सुरु झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. रामप्रेक्ष यादव असे…

माढ्यासाठी फडणवीस क्शन मोडमध्ये

पंढरपूर: माढा मतदारसंघात शरद पवारांनी विजयसिंह मोहीते पाटील यांना राष्ट्रवादीत दाखल करून घेतल्यामुळे मतदार संघाचे बिघडलेले गणित सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मोहिते-पाटलांच्या जाण्यामुळे माढ्यात होणारे नुकसान भरुन…

बाबासाहेबांचा पराभव करणारेच त्यांच्या नावाने मत मागतायत

अमित शाहांचा काँग्रेसवर घणाघात भंडारा : अवघा देश आज बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती साजरी करत आहे. या महामानावाचा निवडणूकीत पराभव करण्यासाठी त्यावेळी ज्या काँग्रेसने जंग जंग पछाडले आज तीच…

तीन ब्रिलियंटस माढ्यात एकत्र

सोलापुर : शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाने आज पुन्हा एकदा भाजपाप्रणीत महायुतीला धोबीपछाड दिली. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहीते पाटील हे तीन ब्रिलियंटस…

सावंतवाडी गंजीफा कलेला मिळाला ‘जीआयटी टॅग’  

सावंतवाडी : सुमारे 500 वर्षांपूर्वीचा सावंतवाडी गंजीफा कलेचा वारसा सावंतवाडी संस्थांनचे राजमाता श्रीमंत सत्वशीला देवी भोसले आणि राजेसाहेब श्रीमंत शिवराम राजे भोसले यांनी जपून ठेवला होता. त्यांच्या पश्चात त्यांची डोर राणीसाहेब शुभदा देवी भोसले आणि युवराणीसाहेब श्रद्धा राजे भोसले यांनी सांभाळली आहे आणि या सावंतवाडीच्या गंजिफा कलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचवले आहे. यावर्षी १६ जानेवारीला भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री  द्वारा ‘जीआयटी टॅग’ सावंतवाडी गंजिफा कलेला मिळालेला आहे. ही गोष्ट सावंतवाडीकरांसाठी खूप गर्वाची आहे. ज्यांनी या पारंपारिक कलेला वेळोवेळी जतन करून या पारंपरिक गंजीफा कलेचा वारसा जपलेला आहे. सावंतवाडी गंजीफा कार्डला मिळालेल्या ‘जीआयटी टॅग’मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडी गंजीफा कार्डचा अस्सल सेट सावंतवाडी पॅलेस वर्कशॉप मधून मिळणार आहे,ज्यामुळे पर्यटकांची फसगत होणार नाही. हा सर्वात मोठा फायदा ‘जीआयटी टॅग’ मिळण्याचा आहे. वरील सर्व भौगोलिक मानांकन कायदेय प्रक्रिया मध्ये एडव्होकेट समीक्षा राजेंद्रकुमार दाभाडे यांनी पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे व सावंतवाडी गंजीफा कलेला ‘जीआयटी टॅग’ मिळवून दिलेला आहे.

गवळी ‘भावना’ सारुन प्रचाराला लागल्या !

मुंबई : माझ्या वडिलांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना विनंती करून वाशिम जिल्हा निर्माण केला. वाशिम जिल्ह्यात शिवसेना माझ्या वडीलांनी रुझवली. त्यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पराभव करून या मतदार…