Category: महाराष्ट्र

Maharashtra News

पाग(चिपळूण) येथील गोरक्षनाथ तांबडे, पाडुंरंग तांबडे व रुपेश तांबडे यांच्या घरी स्थानापन्न झालेली श्री गणरायाची सुबक मूर्ती.

 धाराशिवला राज्य किशोर, किशोरी चाचणीस सुरुवात

राज्यातून १३६ खेळाडूंचा सहभाग धाराशिव : ३४ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेकरिता मैदान निवड चाचणी धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मैदानावर सुरु झाली. या चाचणीत राज्यातील विविध जिल्ह्यातून ६० किशोर व ७६ किशोरी असे १३६ खेळाडूंनी भाग घेतला आहे. यातून भारतीय खो खो महासंघाच्या वतीने ३४ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे किशोर व किशोरी संघ निवडण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धा  २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान झारखंड येथे होणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेबरोबर वडोदरा, गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय खेलो इंडिया महिला लीग करिता किशोरी संघ निवड होणार आहे. अशा प्रकारे किशोरीचे दोन संघ निवडण्यात येणार आहेत. अमोल मुटकुळे (हिंगोली), विशाल पाटील (जळगाव), राजाराम शितोळे (सोलापूर) व वर्षा कछवा (बीड) हे निवड समिती सदस्य महाराष्ट्राचे संघ निवडणार आहेत.  किशोर व किशोर संघाचे सराव शिबिर मुंबई येथे १८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून चाचणीस सुरुवात झाली. यावेळी यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे चेअरमन सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा, माजी सचिव संदीप तावडे, सहसचिव डॉ. पवन पाटील, डॉ. राजेश सोनवणे, कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत इनामदार, धाराशिव जिल्हा खोखो संघटनेचे सचिव प्रवीण बागल आदी उपस्थित होते.

अहेरीमध्ये रंगणार बाप विरुद्ध लेक सामना

आत्रामांची मुलगी भाग्यश्री अखेर शरद पवारांच्या पक्षात  नागपूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने ‘दादां’ना मोठा धक्का दिला आहे. भाग्यश्री आत्राम यांनी ‘घड्याळ’ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला…

मनोज जरांगे पाटील यांची राहुल गांधींवर तिखट टीका

वडीगोद्री : ‘काय करायचं करा, सत्ता आली तर पाहिजे ना, सत्ता येण्याच्या आधीच आरक्षण कसे रद्द करता’, अशी बोचरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी कॉँग्रेस विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केली. काल दुपारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील…

लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी ?

गोंदिया : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला असून दीड कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा झाले आहेत. मात्र, राज्य सरकारच्या योजनेवरुन…

चंद्रपूरच्या आशा बावणे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित

आदिवासी क्षेत्रातील सेवा आणि कोविड काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार   नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका…

भाजपाचे खापरी येथील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

 भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांच्याकडून स्वागत मुरबाड : तालुक्यातील खापरी ग्रामपंचायतीतील सदस्य व गावातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पवार व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार उपस्थित होते. माजी आमदार गोटीरामभाऊ पवार व शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांना खापरी ग्रामपंचायतीत पदाधिकारी व ग्रामस्थांकडून कायम साथ देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून विकासकामे सुरू असून, ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी दिली. खापरी, कामतपाडा, वैतागवाडी कामतपाडावाडी भागात झालेल्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी असताना सुभाष पवार यांनी पुढाकार घेतला होता, याचा आवर्जून उल्लेख उपसरपंच सुरेश भांगरथ यांनी केला. तसेच खापरी येथील अरुण सीताराम राऊत, पांडुरंग राऊत, कपिल राऊत यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांचे भाजपामधून शिवसेनेत स्वागत केले. या वेळी सरपंच दीपक कवटे, संतोष देशमुख, अरुण (बंडू) पवार, महेश पवार, भाई देशमुख, नाना देशमुख, राजेश राऊत, चिंतामण वाघ, शंकर पारधी, अनिल भांगरथ, नेताजी भांगरथ, बुधाजी पारधी, संतोष वाघ, रघुनाथ हिलम, भालचंद्र लचका, योगेश भांगरथ, महेश भांगरथ, भूषण राऊत, कुणाल शिंदे, समीर पवार, गणेश बांगारा, दशरथ लचका, गणेश भला, अंकुश भांगरथ, सागर भांगरथ, काळुराम वाघ, प्रमोद लचका, पांडुरंग मुकणे, सचिन भांगरथ, सार्थक भांगरथ रोहित राऊत,प्रतीक राऊत,प्रशांत भांगरथ तुकाराम मुकणे संतोष भांगरथ कमलाकर भांगरथ, काशिनाथ पारधी, काशिनाथ मुकणे, सुनील फसाळे, संदेश पारधी, जगन मुकणे, सोमनाथ चवर, हिरामण हिरवा अशी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची नावे आहेत.

बदललेल्या टीशर्टमुळे कर्जत तिहेरी हत्याकांडातील आरोपी अडकला, पोलिसांच्या जाळ्यात

  अलिबाग  (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी हनुमंत जैतु पाटील याची पोलिसांनी 36 तास चौकशी केली. तरी तो गुन्ह्याची कबूली देत नव्हता. कोणताही पुरावा सापडत नव्हता. त्यामुळे त्याला सोडून देण्याच्या तयारीत पोलीस होते. परंतु ज्या घरातून आरोपी निघाला होता; तेव्हा त्याच्या अंगात पांढरा शर्ट होता. सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळे टीशर्ट होते. टीशर्ट का बदलले हे सांगू शकला नाही. त्यानंतर त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. त्यामुळे हनुमंत हादरला आणि घराच्या हिस्स्यासाठी आपणच हे तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली त्याने दिली. त्याला अटक करण्यात आले आहे, अशी महिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी  पत्रकार परिषदेत दिली. कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील मदन पाटील, त्यांची सात महिन्यांची गरोदर असलेली पत्नी अनिषा उर्फ माधुरी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विनायक यांची डोक्यात धारधार शास्त्रांनी वार करून हत्या केली.  तिघांचेही मृतदेह फेकण्यात आले होते. या प्रकरणात हत्येमागच्या सर्व  शक्यता तपासण्यात आल्या. तपास करत असताना मदन पाटील आणि त्यांचा सख्खा भाऊ हनुमंत यांच्यात घराच्या हिस्स्यावरून वाद होते अशी महिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी हनुमंत याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची 36 तास चौकशी केली. तरी तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता. ही हत्या झाली तेव्हा आपण पोशीर येथे मामाकडे रहायला गेलो होतो. तेथून कुठे गेलो नाही असे पोलिसांना त्यांनी सांगितले. त्याचे मामा देखील हनुमंत आमच्याचकडे होता असे सांगत होते. पोलीस त्याला सोडून देण्याच्या मानसिकतेत होते. त्याचवेळी त्याने रात्री सफेद शर्ट घातला होता आणि सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळा टीशर्ट होता, अशी माहिती मिळाली. टीशर्ट का बदलला. रात्री घातलेला पांढरा शर्ट कुठे आहे?असे प्रश्न विचारताच तो निरूत्तर झाला. त्याचवेळी पोशीर येथील शाळेच्या आवारतील सीसीटीव्ही फुटेजमधील त्याच्या हालचाली त्याला दाखवण्यात आला. तो हादरला आणि गुन्ह्याची कबुली दिली. चिकनपाडा येथील घराचा हिस्सा मिळावा व वेगळे रेशकार्ड काढून द्यावे  अशी मागणी हनुमंत थोरला भाऊ मदन याच्याकडे अनेक वर्ष करत होता. यावरू काही वर्षापूर्वी दोन्ही भावांमध्ये भांडण झाली होती. आपला भाऊ आपल्याला घराचा हिस्सा देणार नाही याची खात्री झाल्यामुळे मदनची हत्या करण्याचे हनुमंतने ठरवले. त्यानुसार गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आपल्या पत्नीला माहेरी पाठवले. स्वतः पोशीर येथे मामाकडे राहण्यासाठी गेला. रात्री घरी मामाच्या घरी थांबला. मध्यरात्री घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर तो उठून चालत चिकनपाडा येथे भावाच्या घरी गेला. दरवाजा उघडा असल्यामुळे सरळ घरात शिरला. त्याने कुर्‍हाडीने मदन, अनिषा व विनायक यांच्यावर वार केले. घरातील रक्ताचे डाग फुसले. तीघांचे मृतदेह घराशेजारच्या ओढ्यात फेकले. रक्ताने माखलेला आपला सफेद शर्ट फेकला व दुसरे टीशर्ट घालून तो पुन्हा पोशीर येथे मामाच्या घरी गेला व गणपतीसमोर जाऊन बसला. चिकनपाडा येथे तिहेरी हत्याकांड झाल्याची बातमी पोशीरमध्ये पोहचली. तरी जणू आपण काही केले नाही असे हनुमंत वावरत होता. भावाच्या हत्येमुळे तो दुःखी झाल्याचे नाटक करत होता. त्यामुळे हनुमंत रात्रभर घरातच होता असे मामांना देखील वाटत होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अटकला.  हनुमंतनेच  घराच्या हिस्स्यासाठी सख्खा भाऊ, गरोदर  वहिनी आणि पुतण्याची हत्या केली हे  उघड झाले तेव्हा सारेच हादरून गेले. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी धुळा टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या पथकांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला. कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी धुळा टेळे पुढील तपास करत आहेत. ही पूर्वनियोजित हत्या आहे. यात एका गरोदर महिलेची हत्या झाली आहे. 11 वर्षाच्या लहान मुलाची हत्या करण्यात आली आहे. ही क्रुरता लक्षात घेता आरोपी हनुमंत पाटील याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल करून. हा खटला फास्टट्रॅकवर चालवाव अशी न्यायालयाला विनंती करणार आहोत, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. ००००