मुंबादेवीला गाऱ्हाणे…
मुंबादेवीला गाऱ्हाणे… राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईचे आराध्यदैवत मुंबादेवीचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले.
Mumbai news
मुंबादेवीला गाऱ्हाणे… राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईचे आराध्यदैवत मुंबादेवीचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले.
महिला लीग क्रिकेट स्पर्धा धनश्री, आचल, केतकीची फलंदाजीत चमक मुंबई: दोन शतकी भागीदारींच्या जोरावर भारत क्रिकेट क्लबने ग्लोरियस क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या महिला लीग क्रिकेट…
मुंबई : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीची सुनावणी बुधवारी होणार आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या माध्यमातून जे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत त्यांच्यावर स्थगिती देण्यात यावी आणि जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थगिती कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मनसेचे म्हणणे मान्य केलं, तर सर्व बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीवर स्थगिती येऊ शकते. दरम्यान, मनसेकडून दुबार मतदारांची यादी फोटोसहीत तयार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. त्यामुळे मतदानाला असे मतदार आल्यानंतर त्यांची मनसेकडून चांगल्या प्रकारे स्वागत केलं जाईल, असा इशारा देखील अविनाश जाधव यांनी दिला. निवडणुका बिनविरोध जिंकण्यात भाजपने आघाडी घेतली असून आतापर्यंत पक्षाचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक मिळवला असून त्यांचे २२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे सर्वाधिक १५ तर शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे २ उमेदवार, तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा १ आणि एका अपक्ष उमेदवाराचाही बिनविरोध विजय झाला आहे.
मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण महाराष्ट्रातील रखडलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथिगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निवडणुकीत जिल्हा परिषदांच्या ७३१ जागा आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागा भरल्या जाणार आहेत. महिलांबरोबरच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण लागू करण्यात आले आहे. ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. निवडणूक होणाऱ्या १२ जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर यांचा समावेश आहे. या निवडणुकीची अधिकृत सूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून, त्याच दिवसापासून १६ ते २१ जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होईल, तर २७ जानेवारी ही उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. मतदान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतदारांना एक जिल्हा परिषदेसाठी आणि एक पंचायत समितीसाठी असे दोन मते द्यावी लागतील . ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजता जाहीर प्रचार समाप्त होईल आणि त्यानंतर प्रचार तसेच जाहिरातींवर बंदी राहील. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २५,४८२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असून, पुरेशा प्रमाणात ईव्हीएम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ५१,५३७ कंट्रोल युनिट्स आणि १,१०,३२९ बॅलेट युनिट्सचा समावेश आहे. मतदार यादी १ जुलै २०२५ या आधारे तयार करण्यात आली असून, दुबार नावे असलेल्या मतदारांसाठी ” हे चिन्ह वापरण्यात आले आहे. मतदारांना माहिती मिळवण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप तसेच आयोगाची अधिकृत वेबसाइट उपलब्ध आहे.
डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर शिंदेंच्या सेनेचा कोयत्याने हल्ला नवीमुंबई भाजपाकडून शिंदेंच्या कार्यकर्त्याला मारहाण उल्हासनगरमध्ये ५० लाखांची कॅश पकडली मुंबई: मुंबईसह राज्यातील २९ महागनरपालिकांसाठीच्या निवडणूकीचा प्रचार संपला असून निवडणूकीतील राड्याला मात्र सुरूवात झाली…
टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ मुंबई, १३ जानेवारी : टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) २०२६ ने यंदा समाजोपयोगी निधी संकलनात नवा विक्रम प्रस्थापित केला असून, स्पर्धेच्या प्रत्यक्ष शर्यतीपूर्वीच तब्बल ५३.७ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. युनायटेड वे मुंबई या फिलान्थ्रॉपी पार्टनरच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अधिक गती मिळण्याची शक्यता असून, यंदाची आवृत्ती मॅरेथॉनच्या इतिहासातील सर्वात प्रभावी समाजसेवी उपक्रमांपैकी एक ठरत आहे. यंदा विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच निधी संकलन करणाऱ्या फंडरेझर्सची विक्रमी संख्या. शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, प्राणी कल्याण आणि समुदाय विकास अशा विविध सामाजिक कारणांसाठी नव्या फंडरेझर्सनी पुढाकार घेतला आहे. एकूण सहभागी फंडरेझर्सपैकी जवळपास ७५ टक्के म्हणजे १,१०० हून अधिक फंडरेझर्स हे नवखे असून, त्यांनी आतापर्यंत ५.६ कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे. २००४ पासून आतापर्यंत टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून एकूण ५३६ कोटी रुपयांहून अधिक निधी संकलित करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, धावपटू आणि वैयक्तिक देणगीदार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा सामाजिक ठेवा उभा राहिला आहे. यंदा कॉर्पोरेट सहभागातही मोठी वाढ झाली आहे. १९४ कॉर्पोरेट संघ यंदा सहभागी झाले असून, त्यातील ४० कंपन्या प्रथमच मॅरेथॉनच्या समाजसेवी उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच ६८ नव्या स्वयंसेवी संस्था यंदा सहभागी झाल्याने एकूण सहभागी एनजीओंची संख्या ३०५ वर पोहोचली आहे. हे या व्यासपीठावरील विश्वासार्हता आणि परिणामकारकतेचे द्योतक असल्याचे आयोजकांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रथमच निधी संकलन करणाऱ्या काही फंडरेझर्सनी आपले अनुभव मांडले. यामध्ये आर्यवीर झुंझुनवाला, हसीना थेमाली, समीर मेंगल, इरा खान आणि शांता वल्लुरी गांधी यांचा समावेश होता. अनेकांनी सुरुवातीचा संकोच, लोकांकडे मदतीसाठी हात पुढे करण्याचा अनुभव आणि मिळालेला सकारात्मक प्रतिसाद याविषयी मनमोकळेपणाने सांगितले. ०००००००००
मुंबई, १३ जानेवारी २०२६: भारताची सर्वात मोठी स्मॉल फायनॅन्स बँक आणि युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित होण्यासाठी रिझर्व बँकेची सैद्धांतिक मंजुरी मिळवणारी पहिली बँक अशी ख्याती असलेली AU स्मॉल फायनॅन्स बँक (AU…
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचा अध्यादेश निर्गमित केला आहे. ही सार्वजनिक सुट्टी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी ‘दक्षता पथक’ स्थापन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशात नमूद आहे. याबरोबरच उद्योग आणि कामगार विभागानेदेखील सार्वजनिक सुट्टीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुट्टी लागू असेल. Reply Forward Add reaction
मुंबई : राज्यात २९ महापालिका क्षेत्राती तळीरामांसाठी वाईट बातमी आहे. गुलाबी थंडीत गसा गरम करण्याचे त्यांचे मनसुब निवडणूक आयोगाने उधळले आहेत. महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार १३ जानेवारीला संपणार आहे. त्यानंतर राजकीय पक्षांकडून कुठलीही आमिष दिले जाऊ नये या हेतुने राज्यात १३ ते १६ जानेवारी या चार दिवसांच्या कालावधीत जिथे महापालिका निवडणुका आहेत, तिथे ड्राय डे लागू करण्यात आला आहे. प्रचाराच्या तोफा थंडावताच मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपासून राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात ड्राय डे असणार आहे. जिथे जिथे निवडणुका आहेत, तिथे दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यात २९ महानगरपालिकांची निवडणूक होत आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर महानगरांमध्ये महानगरपालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस या महानगरपालिकांच्या हद्दीत ड्राय डे लागू असेल. निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता आणि शिस्त राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मद्यपानाला बंदी घातल्याने मतदानावेळी मतदारांना सुरक्षित वातावरण मिळेल. निवडणूकसंबंधी गैरप्रकार, गोंधळ, दंगल टाळता येईल. तसेच मतदारांना आमिष म्हणून मद्य देण्याच्या घटनाही घडल्याचे दिसून आले होते. तसे प्रकार टाळण्यासाठी या चार दिवसांत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भात दुकानदारांना पूर्वकल्पना देण्यात आली आहे.