Category: मुंबई

Mumbai news

५वी अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा

यजमान स्पोर्टिंग युनियन आणि साईनाथ अशी अंतिम झुंज   मुंबई, दि. १७ जानेवारी : साईनाथ स्पोर्ट्सने गतविजेत्या डॅशिंग सी. सी.चा २३ धावांनी पराभव करुन ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांची गाठ यजमान स्पोर्टिंग युनियनशी पडेल. कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेमध्ये यजमान संघाने मोठ्या धक्क्याची नोंद करताना भामा सी.सी.चा ७ विकेटनी पराभव केला. यापूर्वी गटसाखळीमध्ये पराभूत संघांनी मोठमोठ्या धावसंख्या रचल्या होत्या आणि विशेष म्हणजे स्पर्धेतील ३ शतके याच संघांच्या खेळाडूंनी ठोकली होती. साईनाथने प्रथम फलंदाजीचा निर्णय  घेत ९ बाद १२२ अशी तुटपुंजी धावसंख्या उभी केली. त्यांची किंजल कुमारी ही एकमेव खेळाडू विशीचा टप्पा गाठू शकली. श्रेया सुरेश, निलाक्षी तलाठी आणि वेदिका मंत्री यांच्या फिरकीने जसे साईनाथच्या फलंदाजांना जखडून ठेवले. तसे मग साईनाथच्या श्रीनी सोनी (२१/३ बळी) आणि श्रावणी पाटील यांनी डॅशिंगला लय सापडूच दिली नाही. साखळीत शतके ठोकणारी खुशी निजाई (३३) हीने थोडीफार चिकाटी दाखवली पण ती व्यर्थ ठरली. भामाने १९.३ षटकांमध्ये सर्व बाद ११३ धावा केल्या. त्यांच्या अंजू सिंग हिला आज भोपळाही फोडता आला नाही. अंजूप्रमाणे शतक ठोकणारी प्रिती पटेल देखील अपयशी ठरली. काव्या भगवंत (२१/३ बळी) आणि गगन मुल्कला यांच्यासमोर इतर फलंदाजांचा प्रभाव पडला नाही. त्याला अपवाद हृदयेशा पाटील (२९) आणि सृष्टी कुडाळकर (२२) यांचा. स्पोर्टिंगला ध्रुवी पटेल (२८) आणि प्रांजल मळेकर (नाबाद ६०) यांनी ६० धावांची सलामी दिली. ध्रुवी धावचीत झाल्यावर प्रांजलने एक बाजू लावून धरली आणि वेळ येताच ५ चौकार ठोकत विजय साध्य केला. त्याआधी अंजू सिंगने आपल्या ऑफ स्पिनवर दोन फलंदाजांना १५व्या षटकात बाद करुन काही काळ अवश्य सनसनाटी पैदा केली होती. संक्षिप्त धावफलक साईनाथ स्पोर्ट्स २० षटकात ९ बाद १२२ (किंजल कुमारी २०, श्रावणी पाटील १९, श्रेया सुरेश १५ धावात २ बळी, निलाक्षी तलाठी २६ धावात २ बळी, वेदिका मंत्री ३० धावात २ बळी) वि. वि. डॅशिंग सी. सी. २० षटकात ८ बाद ९९ (खुशी ‌निजाई ३३, श्रीनी सोनी २१ धावात ३ बळी, श्रावणी पाटील १० धावात २ बळी) सामन्यात सर्वोत्तम : श्रीनी सोनी भामा सी. सी. १९.३ षटकात सर्वबाद ११४ (हृदयेशा पाटील २९, सृष्टी कुडाळकर २२, काव्या भगवंत २२ धावात ३ बळी, गगन मुल्कला २१ धावात २ बळी) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग युनियन १८.२ षटकात ३ बाद ११५ (ध्रुवी पटेल २८, प्रांजल मळेकर नाबाद ६०, अंजू सिंग १४ धावात २ बळी) सामन्याता सर्वोत्तम: प्रांजल मळेकर

आज कुर्ला येथे‌ मानव सेवा प्रतिष्ठानची आंतर शालेय कबड्डी स्पर्धा‌

मुंबई : मानव सेवा प्रतिष्ठान कुर्ला शाखा आयोजित १४ वर्षाखालील शालेय मुलांची  कबड्डी स्पर्धा १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता  गांधी मैदानावर होणार आहे. स्पर्धेत महिला मंडळ माध्यमिक विद्यालय कुर्ला, सेंट…

कल्याणात दुर्मीळ मांजर्या सापाला सर्पमित्राने दिले जीवनदान

कल्याण : कल्याण स्टेशन जवळील दत्त मंदिर परिसरातील एका बिल्डिंग मध्ये रात्री 3 वाजता साप शिरल्याने लोकांनी वॉर फॉउंडेशनचे सर्प मित्र सतीश बोबडे यांना संपर्क केला तेव्हा सतीश बोबडे व…

‘चिंतामणी चषक – २०२५’ कबड्डी स्पर्धा

लायन्स स्पोर्टस्, विजय क्लब, शिवशक्ती क्रीडा यांनी प्रथम श्रेणी पुरुष, तर हिंदमाता सेवा, वीर संताजी क्रीडा, शिवनेरी सेवा यांची कुमार गटात विजयी सलामी मुंबई:- लायन्स स्पोर्टस्, विजय क्लब, शिवशक्ती क्रीडा…

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा १० फेब्रुवारीपासून

मुंबई : विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा भरविण्याचे ठरविले आहे. ही स्पर्धा १०…

सेक्स ऑन व्हील एकांकिका ठरली सर्वोत्कृष्ट

अनिल ठाणेकर ठाणे :तिसरी घंटा या संस्थेच्या सेक्स ऑन व्हील या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या कोकण चषकचे मानकरी ठरले. सर्वोत्कृष्ट एकांकिकामध्ये द्वितीय क्रमांक चीनाब से रावी…

५वी अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धा

साईनाथ, भामा सी.सी.सह डॅशिंग आणि स्पोर्टिंग युनियन उपांत्य फेरीत मुंबई, दि. १६ जानेवारी : गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष…

जीवनविद्या मिशन तर्फे 56 वा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा

भाविकांना कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण ठाणे : जीवनविद्या मिशन आयोजित 56 वा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा शनिवार दिनांक 18 जानेवारी व रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5…

अवैध वाळू उपसा विरोधात तोंडवळी ग्रामस्थांचे नदीपात्रात उतरुन आंदोलन

आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये तीव्र संताप मुंबई : मालवण तालुक्यातील तोंडवळी गावातील ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीसाठी गड नदीच्या पात्रात उतरुन साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनामुळे…

अनधिकृत बांधकामांविरुद्ध मनसेचे ठिय्या आंदोलन

अरविंद जोशी मिरा-भाईंदर : निवडणुकीनंतर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे असा आरोप करत आज मनसेने प्रभाग क्रमांक 4 मध्ये ठिय्या आंदोलन केले. महापालिकेतील आयुक्तासह इतर अधिकाऱ्यांवर मनसेने गंभीर आरोप केले.…