Category: मुंबई

Mumbai news

ओम साईश्वर, शिवनेरी, श्री समर्थची विजयी सलामी  

किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षांखालील किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२४-२५ ला आज माटुंग्यात सुरुवात झाली. स्पर्धेचे आयोजन ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, माटुंगा (प.), मुंबई – ४०००१६ येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचे विश्वस्त उमेश नरवणे (सी.ए.), अॅड. अरुण देशमुख, उपाध्यक्ष बाळ तोरसकर, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत तरळ, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, कार्योपाध्यक्ष विकास पाटील, प्र. कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई आणि ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरचे प्रशिक्षक नितीन पाष्टे हे मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील प्रमुख सामने आणि निकाल आज सर्व सामने किशोरीचे झाले. किशोरींच्या ओम साईश्वर सेवा मंडळ ने सरस्वती कन्या संघाचा ९-२ (९-१-१) असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. या सामन्यात ओम साईश्वरच्या वीरा मयेकर (४ मि. संरक्षण व ३ गुण), यशस्वी कदम (४ मि. संरक्षण व २ गुण), आर्या जाधव (नाबाद ३ मि. संरक्षण व २ गुण) यांनी केलेल्या खेळापुढे सरस्वती कन्या संघाचा निभाव लागला नाही. किशोरींच्या दुसऱ्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने आर्य सेनेचा ९-४ (९-२-२) असा १ डाव ५ गुणांनी पराभव केला. शिवनेरी तर्फे गार्गी कडगेने ४:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. गौरांगी पेडणकरने आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. इमला बोऱ्हाडेने ३:२० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. आर्यसेनेतर्फे आरुषी परवडीने नाबाद १:५० संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. दिक्षिता घोलपने १ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. किशोरींच्या तिसऱ्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने वैभव स्पोर्ट्स क्लबचा (१७-२-३) १७-५ असा १ डाव १२ गुणांनी पराभव केला. श्री समर्थतर्फे सोनम शेलारने नाबाद २ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. युक्ता पटेलने २:३० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. स्नेहा कांबळेने १:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. वैभवतर्फे मेघदा देवळेकरने १:१०, १:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. किशोरींच्या चौथ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ॐ समर्थ व्यायाम मंदिराचा (९-१-१) ९-२ असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे कादंबरी तेरवणकरने ४:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. वीरा मयेकरने ४:५० मिनिटे संरक्षण केले. आर्या गोरिवलेने नाबाद २:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. ॐ समर्थतर्फे खेळाडूने चांगला प्रतिकार केला. 0000

विनय क्षीरसागर यांची  व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

मुंबई: विनय क्षीरसागर यांची १ डिसेंबर २०२४ पासून आयआरक्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक – (मॅनेजिंग डायरेक्टर)  पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सागरी उद्योग आणि चाचणी, तपासणी आणि प्रमाणता…

 डॉ. साद काझी आणि रवींद्र लाखे यांचा गौरव

कल्याण-भूषण व कल्याण-रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात कल्याण : कॉम्रेड दत्ता केळकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, ‘कल्याण सिटीझन फोरम’ आयोजित, “कल्याण-भूषण” आणि “कल्याण-रत्न” पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी म्हणून, सामाजिक व शैक्षणिकक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. साद काझी आणि ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक रवींद्र लाखे यांना गौरविण्यात आले. रविवारी, अग्रवाल कॉलेज ऑडिटोरीयम, कल्याण (प.) येथे, मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार-लेखक अनिल थत्ते, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास, आदि मान्यवर ‘प्रमुख पाहुणे’ या नात्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून, डॉ. विजय पंडित; तर, समारंभाचे अध्यक्षपद मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेशचंद्र यांनी भूषविले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी म्हणून, सामाजिक व शैक्षणिकक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. साद काझी आणि ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक श्री. रवींद्र लाखे यांना गौरविण्यात आले.

– डॉ. साद काझी आणि रवींद्र लाखे यांचा गौरव

– कल्याण-भूषण व कल्याण-रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात कल्याण : कॉम्रेड दत्ता केळकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, ‘कल्याण सिटीझन फोरम’ आयोजित, “कल्याण-भूषण” आणि “कल्याण-रत्न” पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी…

 कल्याणमध्ये पत्रीपूलजवळ जलवाहिनी फुटली

शेकडो लीटर पाण्याची नासाडी   कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले. कल्याण पूर्व भागाला या जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळतात या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी बंद केला. जलवाहिनीतून बाहेर पडणारे पाणी ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर साचले होते. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर जलवाहिनीतून पाण्याचे कारंजे उडत असल्याने वाहन चालकांना या भागातून वाहने चालविताना काळजी घ्यावी लागत होती. अनेक वाहन चालकांनी जलवाहिनीजवळ आपली वाहने उभी करून उडणाऱ्या पाण्याद्वारे आपली वाहने धुऊन घेतली. उल्हास नदी पात्रातून उचललेले पाणी बारावे जलशुध्दीकरणात आणले जाते. तेथून हे पाणी जलवााहिनीव्दारे पत्रीपूल भागात रेल्वे मार्गाखालून कल्याण पूर्व भागात पुरवठा केले जाते. ही जलवाहिनी सोमवारी सकाळी ९० फुटी रस्त्यावरील मोहन सृष्टी येथे फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी फुकट गेले. परिसरातील जागरूक नागरिकांनी ही माहिती तात्काळ पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. ही जलवाहिनी फुटल्यामुळे कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. नागरिकांनी घरातील उपलब्ध पाणी एक दिवस जपून वापरण्याचे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी केले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू केले होते. दुपारपर्यंत हे काम पूर्ण करून या जलवाहिनीतील पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. या जलवाहिनीच्या परिसरात राहणारे काही रहिवासी जलवाहिनीतून पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर भांडी घेऊन पाणी भरण्यासाठी आले होते. जलवाहिनीतील पाण्याच्या अति उच्चदाबामुळे जलवाहिनी फुटली असण्याचा प्राथमिक अंदाज अधिकारी वर्तवत आहेत. दुरुस्ती करत असताना जलवाहिनी फुटण्याचे खरे कारण समजून येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. कोट ९० फुटी रस्त्यावर पत्रीपुल भागात जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे. ही जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन कल्याण पूर्व भागाचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल. अशोक घोडे (कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग) ०००००

जगातील पहिले सुवर्ण स्वरमंडल पनवेलमध्ये

पनवेल : शास्त्रीय गायनात स्वरमंडल या झंकार वाद्याला एक परंपरा आणि अनन्य साधारण महत्व आहे. शास्त्रीय संगीतातील गायक या वाद्याचा उपयोग करत असतात. असाच एक स्वरमंडल पनवेलमध्ये दाखल झाला आहे,…

 सिंगापूर विद्यापाठीतील विद्यार्थ्यांची नमुंमपा भेट

शाश्वत भविष्याकरिता माहिती व ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी नवी मुंबई : नॅशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देत महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची व उपक्रमांची माहिती जाणून घेतली आणि भारतातील एका आधुनिक…

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांना संरक्षण द्या – नरेश म्हस्के

नवी दिल्ली : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात विरोधात शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरात जोरदार आवाज उठविला. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी खासदार नरेश…

डॉ. रवींद्र थत्ते यांचे गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित व्याख्यान

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित डॉ. रवींद्र थत्ते यांचे `तत्वज्ञान सोपे आहे’  हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै. वासुदेव आणि नलिनी परांजपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ…

ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस’ हे एक उत्तम व्यासपीठ – रुचेश जयवंशी

अशोक गायकवाड नवी मुंबई : ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. महालक्ष्मी सरस २०२४ प्रदर्शन व विक्रीचे भव्य उद्घाटन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई याठिकाणी भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात ‘घे भरारी – मला पंख मिळाले’ या कार्यक्रमात सहभागी उमेद अभियानाच्या महिलांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उमेद अभियानचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, अवर सचिव धनवंत माळी, श्रीमती मंजिरी टकले तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना चालना मिळावी, त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा आधार मिळावा, यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण महिलांना पाठिंबा द्यावा. असे अवाहान ही जयवंशी यांनी केले.या प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये हातमाग, कलाकुसर, हस्तकला, साड्या, कपडे, मसाले, सजावटीच्या वस्तू, तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचा समावेश आहे.तसेच, महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी ७० भव्य स्टॉल्सचे फूड कोर्ट उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी आपल्या कौशल्याने साकारलेल्या उत्पादनांचा विशेष ठसा उमटवला आहे. नवी मुंबईतील नागरिकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. महालक्ष्मी सरस २०२४ हे प्रदर्शन फक्त विक्रीसाठी नाही तर ग्रामीण संस्कृतीचा आणि कलेचा अनुभव घेण्यासाठी एक पर्वणी आहे. संपूर्ण वातानुकूलित व्यवस्थेमुळे खरेदीसाठी अतिशय सुखद वातावरण आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील महिलांनी आपल्या उत्पादनांसह सहभाग घेतला आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि ग्रामीण महिलांच्या यशाला प्रोत्साहन द्यावे.