Category: मुंबई

Mumbai news

मुस्लिम आरक्षणावर आता हायकोर्टात ९ मार्चला सुनावणी

मुंबई : सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांना दिलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात ९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे…

काका, तोपर्यंत शर्टचं बटण असंच ठेवणार- रोहित पवार

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आपल्या शर्टचं वरचं बटण उघडं असायचं, त्यावर ते बटण लावत जा असं अजित पवार…

अजितदांदाच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला- उद्धव ठाकरे

मुंबई : अजित पवार आणि आम्ही कधी एकत्र येऊ असं वाटलंही नव्हतं. कारण दोन्ही पक्ष राजकीय दृष्ट्या एकमेकांच्या विरोधात होते. दोन सकाळ अशा आपण पाहिल्या आहेत ज्यातल्या एका सकाळच्या बातमीने अजित पवारांनी…

देवेंद्रजी आणि मी मित्र गमावला – शिंदे

मुंबई : “मीही अपघातात माझी दोन मुले गमावली आहेत. माझे गुरु आनंद दिघे यांनाही अपघातात गमावले. त्यामुळे अपघात अचानक जवळचा कुणी जाणे हे दुःख काय असते, मला ठाऊक आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाने देवेंद्रजी आणि मी…

मित्रशोक, हृदय आणी अंतस्थ आत्म्यालाही जाळतो- फडणवीस

मुंबई : अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकातील सुभाषिताचा उल्लेख केला. “लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो; पण मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. अजितदादांच्या निधनाने…

झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे… राज ठाकरे

काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना…

अश्रुं अनावर… शब्द गहीवरले…

अश्रुं अनावर… शब्द गहीवरले… महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला. अजित दादांच्या वरळीतील डोममधिल श्रद्धांजली सभेत राज्यभरातील दिग्गज मान्यवरांनी दादांना श्रद्धांजली वाहीली. यावेळी दादांच्या आठवणीने…

 पुण्याचे चैतन्य शिंदे आणि दीक्षा यादव ठरले सर्वात वेगवान जलतरणपटू

६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ दिमाखात संपन्न पुण्याचे चैतन्य शिंदे आणि दीक्षा यादव ठरले सर्वात वेगवान जलतरणपटू महाराष्ट्रासह ६ राज्यांतील ३३७ जलतरणपटूंचा जल्लोष मुंबई (क्री. प्र.) : ‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) यांच्या वतीने आयोजित ऐतिहासिक ‘६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ स्पर्धा जल्लोषात पार पडली! अथांग अरबी समुद्राच्या थरारक लाटांवर जिद्द, वेग आणि सहनशक्तीचा अफलातून संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्रासह ६ राज्यांतील तब्बल ३३७ जलतरणपटूंनी गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने समुद्राला आव्हान दिले. त्यापैकी ३३० जलतरणपटूंनी हि स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण केली. पुण्याच्या चैतन्य शिंदे आणि दीक्षा यादव यांनी सर्वात वेगवान जलतरणपटूचा किताब पटकावत स्पर्धेवर आपली ठसठशीत छाप उमटवली. आठ गटांमध्ये मुलं-मुली, पुरुष-महिला आणि दिव्यांग खेळाडूंनी लाटांवर वर्चस्व गाजवत जलतरणाचा खरा महोत्सव रंगवला. वेगाचा विजेता ठरले पुण्याचे तारे…

 ओलेक्ट्रा ग्रीनटेकला इ बसची मोठी ऑर्डर

ओलेक्ट्रा ग्रीनटेकला इ बसची मोठी ऑर्डर १,०८५ इलेक्ट्रिक बसेसची १,८०० कोटींचे टेंडर मिळाले मुंबई : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात  महत्वाचा सहभाग असणारी हैद्राबादची कंपनी  ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला (Olectra Greentech) तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (TGSRTC) १,०८५ इलेक्ट्रिक बसेससाठी तब्बल १,८०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. या ऑर्डरमध्ये १,०२५ नॉन-एसी आणि ६० एसी बसेसचा समावेश आहे. या सर्व १२-मीटरच्या बसेस शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरल्या जातील. हा करार १२ वर्षांच्या कालावधीसाठी असून तो GCC (Gross Cost Contract) मॉडेलवर आधारित आहे. यामध्ये बसेसचा पुरवठा, संचालन आणि देखभाल ओलेक्ट्रा कंपनी करणार आहे. पुढील २० महिन्यांत या सर्व बसेसचा पुरवठा पूर्ण केला जाईल. गेल्या ३ वर्षात १५९% परतावा देणाऱ्या या कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये आता मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे शेअर बाजारतही या कंपनीची शेअर वर जाण्याची चर्चा सुरू आहे.

लेखक काशिनाथ  माटल यांच्या “सावट” कथासंग्रहाला संभाजी महाराज साहित्य पुरस्कार!

लेखक काशिनाथ  माटल यांच्या “सावट” कथासंग्रहाला संभाजी महाराज साहित्य पुरस्कार! मुंबई- ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांच्या ‘सावट’ या कोविड आधारित कथासंग्रहाला यावर्षीचा ऍग्रोन्यूज परिवार चेरिटेबल आयोजित मानाचा संभाजी महाराज साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सावट कथासंग्रह संपूर्णतः मानव संहारिक कोरोना काळातील घटनांवर आधारित आहे. मागील फेब्रुवारीला दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले होते. पुण्याच्या चपराक प्रकाशनने अतिशय सुबकरित्या  हे पुस्तक प्रकाशित केले होते.कोरोना घटनांवर अत्यंत संवेदनशील मनाने लेखन केलेले हे एकमेव पुस्तक ठरले. त्यामुळेच हे पुस्तक सर्वत्र चर्चेत होते. लेखक काशिनाथ माटल यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. पुरस्कारवितरण सोहळा येत्या २७ फेब्रुवारीत रोजी ९व्या वर्षी होत आहे. या व्यतिरिक्त उत्कृष्ट कादंबरी,बालसाहित्य, काव्य,प्रवासवर्णन,संशोधन इत्यादी साहित्यात पुरस्कार जाहीर झाले आहेत.