Category: मुंबई

Mumbai news

संघाच्या ‘हिटलरवादी सांस्कृतिक राष्ट्रवादा’विरोधात पर्यायी सांस्कृतिक राष्ट्रवाद उभारण्याची गरज : संभाजी भगत

ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक राजकारणाचा महत्त्वाचा भाग असलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा हिटलरवादी विचारसरणीवर आधारित असल्याचा आरोप लोकशाहीर संभाजी भगत यांनी केला. संघाला देशात विरोधी पक्ष नकोत, संघाचा संविधानाला…

 रिंग मेट्रो हा काय भातुकलीचा खेळ आहे का?

 मनोज प्रधान यांचा ठाण्यातील आमदारांवर घणाघात अनिल ठाणेकर ठाणे – ठाणेकरांची मागणी नसताना सत्ताधाऱ्यांनी रिंग मेट्रो प्रकल्प लादला आहे. सोशल मिडीयावर १०० टक्के लोक विरोध करीत आहेत. असे असताना, शहराचे प्रतिनिधीत्व करणारे तीन आमदार,  “हा प्रकल्प फेस्टिव्हल होणार नाही म्हणून पुढे सरकवा; सोसायटीच्या दारात स्टेशन नको म्हणून २०० मीटर पुढे न्या; कळवा- मुंब्रा येथे प्रकल्प न्या”, असे सल्ले देत आहेत. हा प्रकल्प म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. जर तुम्ही एखाद्या विदूषकाला निवडून दिले, तर सर्कसचीच अपेक्षा करा!, असा टोलाही प्रधान यांनी लगावला आहे. मनोज प्रधान यांनी रिंग मेट्रो रेल्वेला सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून उभारला जाणारा हा प्रकल्प ठाणे शहराच्या मूळावर उठणार आहे, असे प्रधान यांनी सप्रमाण पटवून दिले आहे. त्यावर ठाणे शहरातील तीन आमदारांनी तीन अव्यवहार्य सूचना केल्या आहेत. त्यावर प्रधान यांनी टीकेचा सूर आळवला आहे. प्रधान यांनी सांगितले की,  रिंग रेल्वेचा प्रकल्प हा ठाणे शहरासाठी जाहीर करण्यात आला आहे.  १२,२०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र, आपला पहिला प्रश्न आहे की,  हा प्रकल्प मागितला कुणी? ठाण्यातील कुठल्या नागरिकाला हा रिंग रेल्वे प्रकल्प पाहिजे?  सोशल मीडियावर बघितलं, तर १०० पैकी १०० कमेंट्स ह्या प्रकल्पाच्या विरोधात जातात. त्याचे कारण आहे की, मेट्रो लाइन चार आणि मेट्रो लाइन पाच गेले १० वर्ष चालू करू शकलेले नाहीत. आता ही नवीन रिंग रेल्वे तुम्ही सुरू करताय. आपण सुरूवातीलाच १,००० कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक बसेस घ्या आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करा, पण आपल्या सत्ताधाऱ्यांना त्यावर काहीच  बोलायचे नाही. काही ठाणेकर या प्रकल्पाला विरोध करीत असले तरी एका सोसायटीचे लोक,  आमच्या समोर स्टेशन नको, २०० मीटर पुढे स्टेशन घेऊन जा. दुसरे सोसायटी वाले सांगतात, या रस्त्यावर नका घेऊ, मागच्या रस्त्यावर नेऊन घ्या, असे म्हणत आहेत. हा अतिशय चुकीचा पायंडा पडतोय. १२,२०० कोटीच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही एक तर लोकांच्या सूचना – हरकती घेतल्याच नाहीत. लोकांना हा प्रकल्पच नको आणि भातुकलीसारखा खेळ सुरू केलाय. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, नियोजनशून्य विकास आम्हाला मान्य नाही.हा प्रकल्प राबविताना जे नियोजन करायचे होते ते करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प राबवित असताना प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. हा प्रकल्प २०२९ मध्ये पूर्ण होणार असल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी २०३५ पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणे शक्यच नाही. त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला हवेत. कारण, त्यांनी नागरिकांच्या सुचना – हरकती – सल्ले घेऊ, असे म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागतच आहे. परंतु, सुचना , हरकती येण्याआधीच जर कामे सुरू असतील तर फायदा कसा काय होणार?  त्यामुळे नागरिकांच्या हरकती, सुचना स्वीकारून त्यावर साधक – बाधक चर्चा झाल्याशिवाय प्रकल्पाचे कामच सुरू करू येऊ नये,  तसेच मेट्रो लाइन चार आणि मेट्रो लाइन पाच पूर्ण कार्यन्वित झाल्याशिवाय रिंग मेट्रोचा विचार  करू नये, अशी आमची मागणी असल्याचेही प्रधान यांनी म्हटले आहे.

‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत ठामपाच्या शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी तयार केल्या तिरंगा राख्या  विविध शाळांमध्ये स्थानिक नगरसेवकांची उपस्थिती ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत…

१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी पूर्ण केले प्रशिक्षण

 मराठीचे ज्ञान अनिवार्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होणार-  प्रताप सरनाईक अनिल.ठाणेकर ठाणे-१ मे पासून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप १७ ऑगस्टला ठाण्यातील राम गणेश…

राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत ३ हजारहून अधिक बालचित्रकारांनी साकारली कल्पक रंगचित्रे

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता आयोजित ‘बाल चित्रकला स्पर्धा’ या राज्यस्तरीय उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपल्या मनातील कल्पनांना रंगाच्या माध्यमातून चित्ररूप…

तायक्वांदो ग्रॅंडमास्टर संतोष गुलदेकर यांचे कोरिया, थायलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश

मुंबई. …नुकत्याच दक्षिण कोरिया आणि थायलंड येथे झालेल्या आंतर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ५३ वर्षीय तायक्वांदो ग्रॅंडमास्टर संतोष गुलदेकर यांनी शानदार कामगिरी करताना ३ रौप्य आणि १ कास्य पदकाची कमाई केली.…

 रायगड जिल्ह्यातील ३ अनाथ बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब

आदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे विशेष प्रयत्न अशोक गायकवाड रायगड-लिबाग : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रीआदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचे निर्देश दिले…

 विनायक निम्हण राज्य कॅरम स्पर्धा

– झैद – प्राजक्ताला विजेतेपद मुंबई : सोमेश्वर फाऊंडेशनच्यावतीने व नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तसेच झेनेटीक स्पोर्ट्सच्या सहकार्याने सनिज वर्ल्ड, सनी स्पोर्ट्स किंग्डम, पुणे येथे संपन्न झालेल्या कै. विनायक निम्हण तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या सागर वाघमारेचा १७-१२, १६-१२ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी झैदने मुंबईच्या प्रशांत मोरेचा १५-२५, २५-२२ व २५-१० असा तर सागरने पुण्याच्याच अभिजित त्रिपनकरचा २५-६, २५-१९ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा २५-१०, २५-११ असा सरळ दोन सेटमध्ये प्रभाव केला. तर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या मधुरा देवळेवर २३-१९, १७-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून आपल्या विजयावर शिक्कमोर्तब केला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी प्राजक्ताने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला २३-२१, १२-२५ व २५-६ असे तर मधुराने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणला २५-७, २१-१७ असे पराभूत केले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला रंगतदार तीन सेटमध्ये २४-१०, १४, २५ व २५-१२ अशी मात केली. स्पर्धेतील विजेत्यांना उद्दोजक मधुरा वाळुंज, ज्येष्ठ राष्ट्रीय विजेते व शिव छत्रपती पुरस्कारार्थी सुहास कांबळी यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर अहमद खान, यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव सुशील गुजर आणि राज्य कॅरम असोसिएशनचे सहसचिव आणि स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते उपस्थित होते. मधुरा वाळुंज यांनी खेळाडूंचे कौतुक करताना कै. विनायक निम्हण यांना क्रीडा क्षेत्राची आवड असून ते स्वता उत्कृष्ट कॅरम खेळत असत असे सांगितले. तर अरुण केदार यांनी प्रतिवर्षी कॅरम स्पर्धेचे आयोजन करत असल्याबद्दल सोमेश्वर फाऊंडेशन व स्पर्धेचे आश्रयदाते नगर सेवक सनी निम्हण यांचे विशेष आभार मानले. तसेच स्पर्धेचे नीट नेटके आयोजन केल्याबद्दल राज्याचे सहसचिव,सहकारी व स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते यांचे कौतुक केले. ००००

 ३० लाख रुपये किंमत असलेली बिबट्याची कातडी जप्त

 डोंगरी पोलिसांची मोठी कारवाई दिनेश मराठे मुंबई : डोंगरी पोलिसांनी बिबट्या या संरक्षित वन्यजीव प्राण्याच्या कातडीची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या इसमास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या संदर्भात डोंगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बिबट्या या संरक्षित वन्यजीव प्राण्याची कातडी विक्री करण्याच्या उद्देशाने एक इसम येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती.या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे, पोलीस हवालदार विशाल सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल सुरज धायगुडे यांचे पथक तयार करण्यात आले.सदर पथकाने प्राप्त माहितीची खातरजमा करून नियोजनबद्ध, कौशल्यपूर्ण पद्धतीने कारवाई केली. ९ ऑगस्टला निखिल सोनावणे (रा.ताडदेव) मुंबई या इसमास ताब्यात घेतले.त्याच्या ताब्यातून बिबट्या या वन्यजीव प्राण्याच्या कातडीसदृश वस्तूचे जप्ती करण्यात आली. सदर कातडीचे अंदाजे वजन २ किलो ५०० ग्राम असून, तिची अंदाजे किंमत तीस लाख रुपये असल्याचे प्राथमिकदृष्ट्या नमूद करण्यात आले आहे. सदर कातडीची प्रजाती व अधिकृत किंमत सक्षम वनविभाग/वन्यजीव तज्ज्ञांकडून निश्चित करून घेण्यात येत आहे.सदर प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कलम २, ९, ३९(२),(३), ५१, ५२ या लागू तरतुदींनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे यांचेकडून करण्यात येत आहे.सदर गुन्ह्यात बिबट्याची कातडी कोणाकडून प्राप्त झाली, तिची विक्री/खरेदी करण्यामागे कोण व्यक्ती सहभागी आहेत, आर्थिक व्यवहार झाला आहे काय, तसेच या वन्यजीव तस्करीमध्ये अन्य कोण व्यक्तींचा सहभाग आहे काय, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत लोक भवन येथे ‘हर घर तिरंगा’ अभियान

अशोक गायकवाड मुंबई : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे हाती राष्ट्रीय ध्वज घेऊन राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्य गीत गायले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात साजरा केल्या जात असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा भाग म्हणून तसेच ‘वंदे मातरम’ या गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोक भवनातील दरबार हॉल, जल विहार यांसह इतर ऐतिहासिक महत्वाच्या इमारतींवर राष्ट्रध्वज लावण्यात आला. ००००००