Category: मुंबई

Mumbai news

मध्यवर्ती रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन १५ दिवसांपासून बंद; गोरगरीब रुग्णांचे हाल

सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असला, तरी जिल्हा रुग्णालयाच्या तुलनेत आवश्यक त्या सुविधा येथे उपलब्ध नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे.…

कविता या अवघड साहित्यप्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

 ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरूरकर यांचे प्रतिपादन मुंबई : कविता ही अत्यंत अवघड साहित्यप्रकार असून तिच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरूरकर यांनी केले.  अखिल भारतीय साहित्य परिषद  साहित्य भारती (कोकण प्रांत), मुंबई उपनगर शाखेच्या वतीने महाकवी कालिदास जयंतीनिमित्त ‘आषाढरंग’ या काव्यपुष्पाचे आयोजन  बोरिवली पूर्व येथील श्रीमती जयाबेन खोत शाळेत   करण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरुरकर या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी अनुराधा नेरूरकर यांनी पावसाची दोन वेगवेगळी रूपे उलगडणाऱ्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमात विविध ठिकाणाहून आलेल्या सुमारे २२ नवोदित व हौशी कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भाग्यश्री फडके धर्माधिकारी यांनी परिषद गीत सादर केले. ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. साहित्य भारतीचे मुंबई उपनगराचे संपर्क प्रमुख जयेश मेस्त्री यांनी ‘आषाढरंग’ या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली व साहित्य, कविता आणि नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या साहित्य भारतीच्या उपक्रमांची माहिती  करून देण्यात आली. ‘आषाढरंग’मध्ये सहभागी नवोदित कवी-कवयित्रींनी आपल्या विविध कविता सादर केल्या. सर्व सहभागी कवी-कवयित्रींना प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विठ्ठल घाडी यांनी केले. आभार प्रदर्शन भाग्यश्री फडके-धर्माधिकारी यांनी केले. कार्यक्रमाला साहित्य भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष व लेखक दुर्गेश सोनार, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे सदस्य  किशोर उन्हेलकर आणि त्यांचे सहकारी तसेच सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे यांच्या सह साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी  उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्य तातडीने उपलब्ध करून द्या

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी…

स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली

कल्याण : १५ऑगस्ट  स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून डोंबिवली शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या सहभागाने…

 कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

 १२५ हून अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याचा दावा कल्याण : कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसर ते खडकपाडा परिसरातील एका रस्त्यावर भटक्या कुत्र्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भटक्या कुत्र्याने तब्बल १२५ ते १५० नागरिकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आणि  गटनेते उमेश बोरगावकर आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले.विशेष म्हणजे, भटक्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी खडकपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही रात्रभर परिसरात फिरत होते. अखेर रात्री या कुत्र्याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या भटक्या कुत्र्याला पकडला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, आता मोठ्या संख्येने नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची घटना समोर आल्याने प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संदीप हॉटेल ते खडकपाडा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रविवारी दुपारपासून हा भटका कुत्रा गाडीवर बसलेल्या, चालणाऱ्या नागरिकांना पाठीमागून येऊन चावण्याच्या तक्रारी आहेत. अचानक वाढलेल्या श्वानदंशाच्या घटनांमुळे अनेक नागरिकांनी उपचारासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे धाव घेतली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात एका दिवसात १३० नागरिक श्वानदंशाच्या उपचारासाठी आले. त्यापैकी गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या २५ नागरिकांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या घटनेतील ११ वर्षीय मुलीवर अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने तिला मुंबईतील शीव रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अन्य रुग्णांवर आवश्यक उपचार करून त्यांना अँटी-रेबीज लस देण्यात आली. रविवारच्या घटनेनंतर सोमवारी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात भटक्या श्वानाची दहशत पाहायला मिळाली. याठिकाणी १० ते १५ प्रवाशांना चावा घेतला.  रुग्णालयात औषधांचे सॅम्पल दाखविण्यासाठी आलेला सेल्स मॅनेजरच भटक्या कुत्र्याची शिकार ठरला असून रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारातच फार्मा कंपनीच्या सेल्स मॅनेजर अतुल सिंग यांना श्वानदंश झाला. सलग दुसऱ्या दिवशी श्वानाच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीनंतर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले असून केडीएमसी  आयुक्त आणि महापौरांकडून डॉग सेंटरची पाहणी करण्यात आली. कल्याणमधील खडकपाडा आणि रेल्वे स्टेशन परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनांनंतर अखेर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर हर्षाली चौधरी यांनी कल्याणमधील डॉग सेंटरची पाहणी केली. डॉग सेंटरचे सुरू असलेले बांधकाम मंगळवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासह कुत्र्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम राबवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आकडा कमी सांगितल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर आयुक्तांनी हा आकडा पुन्हा व्हेरिफाय करण्याचे मान्य केले आहे. तर रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैदयकीय अधिकारी कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार रविवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात एकुण 58 नागरीकांना कुत्रा चावल्याने रुग्ण उपचाराकरिता आले. त्यापैंकी, 17 नागरीकांना संदीप हॉटेल बिर्ला कॉलेज परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याचे निदर्शनास आलेले आहे. या रुग्णांना महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात, वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार अँटी-रेबीज लस व इतर आवश्यक उपचार करण्यात आले आहेत. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. संबंधित रुग्णांना आवश्यक पुढील डोस व वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून त्यातील संशयातील कुत्र्याला पकडले आहे. या परिसरात भटक्या कुत्र्यांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित पशुवैदयकीय विभागास देण्यात आल्या आहेत. 0000

 रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरूच

 – समाजसेविका वैशाली गावडे यांचा आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई : मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील नावाजलेल्या महानगरपालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र, याच मुंबई महापालिकेच्या टी.बी. रुग्णालयात झुरळांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी त्यांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याचा आरोप महलत महिला मंडळ अध्यक्षा समाजसेविका वैशाली गावडे यांनी केला आहे. वैशाली गावडे यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णालय परिसरात झुरळ, अस्वच्छता आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदनही सादर केले आहे. टी.बी.सारख्या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असताना रुग्णालयातच झुरळांचा उपद्रव वाढणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवली जाते की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. निवेदन देऊनही सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने स्वच्छता व्यवस्था सुधारावी, झुरळांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि रुग्णांना स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. या प्रकरणावर आता जाहीर पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार असल्याचे वैशाली गावडे यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेनंतरही रुग्णालय प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर रुग्णांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आशिया खंडात नावाजलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अशी परिस्थिती निर्माण होणे ही महापालिका प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची बाब असून, प्रशासन या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरक्षणाच्या संरक्षणासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचा एल्गार

रमेश औताडे मुंबई : अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न म्हणजे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाचा आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा अपमान आहे. अशा प्रकारचे प्रयत्न आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत आरक्षणाच्या संरक्षणासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने  विशाल मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या हक्कासाठी आणि समाजाची एकजूट कायम ठेवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या माध्यमातून वंचित समाजाला मिळालेल्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला. कविता गाडगे, सागर वानखडे, सुनंदा कांबळे, प्रफुल्ल इंगोले, नंदा गायकवाड, वैशाली बाराथे, सुलभा बुचुंदे, मनोरमा ढोले, अनिता गाडगे, शंकुतला मोरे, वैशाली चव्हाण, मिलन दनाने, मिना पाटिल, वनिता नागले, मनिषा कांबळे सह मोठ्या संख्येने महिला पुरूष सहभागी झाले होते. आरक्षण हा केवळ सरकारी नोकरी किंवा शिक्षणातील लाभ नसून सामाजिक न्याय आणि समान संधीचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर आंबेडकरी समाजाने एकजुटीने भूमिका घेऊन आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करावा, असे आवाहन मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन

मिरा -भाईंदर : ९ ऑगस्ट देशभरात क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. मिरा -भाईंदर शहराला सुद्धा क्रांतिकारकांचा वारसा लाभलेला आहे. मीरा भाईंदर मधील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्यासाठी महानगरपालिकेने नवघर नाका…

२०० हून अधिक प्रकरणांचे विशेष लेखापरीक्षण, पर्यावरणीय गुन्ह्यांची निष्पक्ष चौकशीची मागणी

मिरा -भाईंदर: पर्यावरणवादी, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पर्यावरणीय गुन्ह्यांच्या निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीच्या मागणीसाठी मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाबाहेर नुकतच शांततापूर्ण आंदोलन केले. आंदोलनानंतर, शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त निकेत कौशिक…

 ठाणेकरांवर अतिरिक्त आर्थिक भाराची शक्यता

 १० वर्षांनंतर मालमत्ता कर आणि टीएमटी बसभाडेवाढीचा प्रस्ताव सिद्धेश शिगवण ठाणे : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिकेने उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी ठाणेकरांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याची तयारी सुरू केली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर मालमत्ता करात वाढ करण्याबरोबरच ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसभाड्यातही वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव येत्या १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणेकरांच्या दैनंदिन खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीनंतर महापालिकेच्या आर्थिक स्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. महापालिकेच्या उत्पन्नातील प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीत वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर थकीत कर असलेल्या मालमत्ताधारकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे. मात्र, वाढता प्रशासकीय खर्च, विविध विकासकामांसाठी लागणारा निधी आणि महापालिकेच्या आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेता उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची आवश्यकता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. डिसेंबर २०२६पर्यंत मंजूर अर्थसंकल्पीय निधीपैकी केवळ ७० टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपलब्ध निधीचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने वापर करण्यावर प्रशासनाचा भर आहे. महापालिकेच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांमध्ये मालमत्ता कराचा समावेश होतो. मागील दहा वर्षांपासून मालमत्ता कराच्या दरात मोठी वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या महसुलात अपेक्षित वाढ होत नसल्याने मालमत्ता करात सुधारणा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.मालमत्ता करात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम शहरातील घरमालक, व्यावसायिक आस्थापना आणि मालमत्ताधारकांवर होणार आहे. प्रस्तावित वाढीचे स्वरूप आणि त्यानुसार नागरिकांवर नेमका किती अतिरिक्त आर्थिक भार पडणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. ठाणे परिवहन सेवेच्या बसभाड्यातही गेल्या दहा वर्षांपासून वाढ झालेली नाही. जुलै २०१५ मध्ये टीएमटीच्या बसभाड्यात अखेरची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी किमान भाडे पाच रुपयांवरून सात रुपये, तर कमाल भाडे ३० रुपयांवरून ३६ रुपये करण्यात आले होते. वातानुकूलित बसच्या दोन किलोमीटर अंतरासाठीचे भाडे १० रुपये, तर ३८ ते ४० किलोमीटर अंतरासाठीचे भाडे ६५ रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर टीएमटीच्या बसभाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही. इंधनाच्या किमती, देखभाल-दुरुस्तीचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, बस संचालनाचा वाढता खर्च आणि सार्वजनिक वाहतूक सेवा टिकवून ठेवण्यासाठी लागणारा निधी यामुळे टीएमटीवर आर्थिक ताण वाढत आहे. त्यामुळे बसभाड्यात सुधारणा करण्याचा निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. मालमत्ता कर आणि टीएमटी बसभाडेवाढीचे दोन्ही प्रस्ताव १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेत मांडले जाणार आहेत. या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळते की त्यामध्ये बदल केला जातो, याकडे ठाणेकरांसह राजकीय पक्षांचेही लक्ष लागले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढविणे आवश्यक असले तरी त्याचा थेट भार नागरिकांवर टाकण्याऐवजी थकीत करांची प्रभावी वसुली, अनावश्यक खर्चाला आळा आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याची मागणीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १७ ऑगस्टची महासभा ठाणे महापालिकेच्या आर्थिक धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.