Category: मुंबई

Mumbai news

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण : मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाची राजकीय पक्षांना माहिती

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे मार्गदर्शन अशोक गायकवाड रत्नागिरी : मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत सोमवारी राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत…

ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत

ई20 पेट्रोलमध्ये आर्द्रता (Moisture) आणि क्लोराइडच्या उपस्थितीची तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) तपासणी ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत नवी दिल्ली : अलीकडेच ईबीएमएस…

 काँग्रेसच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करत नोंदवला निषेध मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या निषेधार्थ मूक आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना गुंगी गुडिया असा अपशब्द काँग्रेस पक्षाच्या सोशल हॅंडलवर करण्यात आला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घुसून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर काँग्रेसकडून माफीनामा आला नसल्याने आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने हाताला काळ्या फिती लावून आणि संविधान हातात घेऊन जोरदार मूक आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या आमदार सना मलिक-शेख, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, कार्यालयीन सचिव संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सहकार सेल अध्यक्ष नंदकुमार काटकर, ज्येष्ठ नेते बापू भुजबळ आदींसह पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. ०००००००

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती…

मुंबई दि. ५ ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला प्रदेशाध्यक्षा पदी वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्ष पदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती सकाळी करण्यात आली तर दुपारी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिन्मय गाढे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन २००९ पासून काम करत आहेत. नाशिक विद्यार्थी शहराध्यक्ष, युवक शहर कार्याध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत आणि आता विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. ०००००००

मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये आयोजित “पल पल दिल के पास – म्युझिक फॉर अ कॉज” या संस्मरणीय संगीत मैफिलीत संगीत, आठवणी आणि संवेदनांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांच्या उपस्थितीत, त्यांचे सुपुत्र अमित कुमार आणि सुमित कुमार, तसेच नात मुक्तिका गांगुली यांनी किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण करत त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) आयोजित या कार्यक्रमातून वंचित कर्करोगग्रस्त कर्करुग्णांसाठी निधी उभारण्यात आला. संगीत, वारसा आणि मानवतेचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

कागदी जीर्ण अवस्थेतील जातीच्या नोंदी डिजिटल करा

रमेश औताडे मुंबई: राज्यातील वंचित समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जीर्ण अवस्थेतील कागदी जातीच्या नोंदी डिजिटल स्वरूपात जतन करण्याची मागणी इतर मागासवर्ग कल्याण समितीचे प्रमुख आमदार सुरेश भोळे यांच्याकडे करण्यात आली आहे. या नोंदी कागदी स्वरूपात असून जीर्ण झाल्याने नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. हा ऐतिहासिक अभिलेख कायमस्वरूपी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे  रिपब्लिकन सेनेचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय माने, जनसेवा कामगार संघटनेचे सरचिटणीस अमित साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष हर्षल पाटील, ॲड. सुमेश परमार, ॲड. श्याम शुक्ला, ॲड. मेघनाथ तेलावडे, राजेश शर्मा, अजय बरुचा, अश्विन पाटणे यांनी अभ्यासपूर्ण महत्वाची मागणी सरकारकडे केली आहे. १९५० ते १९६७ किंवा त्यापूर्वीच्या कालावधीतील नोंदी संबंधित अभिलेखांचे तातडीने स्कॅनिंग करून त्यांचे डिजिटल जतन करण्यासाठी राज्यस्तरीय सुरक्षित डिजिटल अभिलेखागार निर्माण करून या डिजिटल नोंदींना अधिकृत पुरावा म्हणून मान्यता द्यावी. यामुळे बनावट कागदपत्रे, जात घुसखोरी व गैरव्यवहाराला आळा बसेल असे अमित साळुंखे यांनी सांगितले.

खाजगी वाटाघाटीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र

 राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय अनिल ठाणेकर | ठाणे राज्यातील सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटीद्वारे स्वेच्छेने जमीन उपलब्ध करून देणाऱ्या भूमीधारकांना आणि त्यांच्या वारसांना आता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील आणि राज्यमंत्री ॲड.…

‘हर घर तिरंगा’ मोहीमेंतर्गत लोकसहभागातून होणार विविध उपक्रमांचे आयोजन

०००००००० नवी मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सन २०२२ पासून ‘हर घर तिरंगा’ ही अभिनव मोहीम सुरू करण्यात आलेला आहे. जनतेच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी सदस्यांनी २२ अतिकुपोषित मुलांना घेतले दत्तक

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन, पदाधिकारी आणि सदस्यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.जिल्ह्यातील तीव्र कुपोषित (SAM) श्रेणीतील मुलांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्याची जबाबदारी आता या…