ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार पडताळणी मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील आपल्या नाव रद्द होऊ शकते असा इशारा नगरसेविका मालती पाटील आणि शिवसेना कोपरी ठाणे पूर्व विभागाचे संघटक समाजसेवक रमाकांत पाटील यांनी दिला आहे.  या संदर्भात मालती पाटील आणि रमाकांत पाटील म्हणाले बूथ स्तरीय अधिकारी २९ जुलैपर्यंत घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत. बूथ स्तरीय अधिकारी प्रत्येक घरी तीन वेळा भेट देतील. यावेळी घरात कोणीही भेटले नाही किंवा फॉर्म भरला नाही तर मतदार यादीतून नाव रद्द होऊ शकते. घरात कोणी भेटले नाही तर बूथ स्तरीय अधिकारी दारावर नोटीस चिटकवतील त्यानंतर घरातील व्यक्तीने स्वतःहून संबंधित बूथ स्तरीय अधिकाऱ्यांशी भेट घेणे आवश्यक आहे. बूथ स्तरीय अधिकाऱ्याच्या भेटीदरम्यान जन्म दाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, १० वी किंवा १२ वी चे प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, वनहक्क प्रमाणापत्र, १ जुलै १९८७ पूर्वीचे बँक किंवा पोस्टचे पासबुकची झेरॉक्स द्यावी लागणार आहे. लोकशाहीत मतदानाचा अधिकार महत्वाचा आहे त्यामुळे हा अधिकार अबाधित राहण्यासाठी नागरिकांनी आपली एसआयआर पडताळणी करुन घ्यावी असे आवाहन नगरसेविका मालती पाटील आणि शिवसेना कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांनी केले आहे.
०००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *