रमेश औताडे
मुंबई : प्रवाशांची सुरक्षितता, आराम, विश्वसनीयता आणि टिकाऊपणा या बाबतच्या वाढत्या अपेक्षांमुळे भारताचे प्रवासी वाहतूक क्षेत्र एका मोठ्या परिवर्तनातून जात आहे. या बदलत्या बाजार पेठेतील गतिशीलतेला स्टारझ ने प्रवाशांच्या अपेक्षांना विश्वासाची नवी गती दिली आहे. असे मत एम जी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  अनिल मोहन कामत यांनी व्यक्त केले.
भारतातील अग्रगण्य एमजी ग्रुपने “ प्रवास २०२६ “ मध्ये आपल्या ‘स्टारझ’ नेक्स्ट-जनरेशन प्रीमियम कोच प्लॅटफॉर्मचे अनावरण केले.  गांधीनगरच्या महापौर मीराबेन पटेल यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  दरियापूरचे आमदार  कौशिक जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उद्घाटनानंतर तीन दिवस  नवनवीन कल्पना, उत्पादनांचे प्रदर्शन, व्यावसायिक संबंध आणि उद्योग सहकार्य असे  कार्यक्रम होणार आहेत. एम जी ग्रुपने आघाडीच्या ओईएम राज्य परिवहन उपक्रम , खाजगी फ्लीट ऑपरेटर्स आणि संस्थात्मक ग्राहकांना सेवा देणारा एक विश्वसनीय मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता म्हणून स्वतःला स्थापित केले आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *