Category: मुंबई

Mumbai news

“लवकर या, लवकर जा”

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महिलांना गिफ्ट मुंबई : जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा झाला याचे औचित्य साधून आज विधिमंडळ अधिवेशनात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना मोठी गिफ्ट झाली. लवकर या आणि लवकर जाण्याची सुट महीलांना…

वंचितचा पंतप्रधान मोदींविरोधात एल्गार २३ मार्ला आरएसएस मुख्यालयावर मोर्चा

वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चात काँग्रेसही होणार सहभागी ० आरएसएस मुख्यालयासमोर धरणे आंदोलनही करणार मुंबई : देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी तडजोड केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आणि वंचित…

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट मुंबई  : मॉरिशस प्रजासत्ताकाच्या भारतातील उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बाप्पू यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भारत-मॉरिशस संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सुनेत्रा अजित पवार व शीलाबाई बाप्पू यांच्यामध्ये भारत–मॉरिशस संबंध, महाराष्ट्र–मॉरिशस ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध, व्यापार-गुंतवणूक संधी तसेच पर्यटन व सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मॉरिशसचे कॉन्सुल जनरल डॉ. डी. के. बकटोवार, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, दयानंद बाप्पू उपस्थित होते.

ना अर्थ… ना संकल्प…  जयंत पाटीलांचा हल्लाबोल 

  मुंबई –     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ना ‘अर्थ’ आहे… ना कोणता ‘संकल्प’ आहे….या अर्थसंकल्पातून फक्त काँट्रॅक्टर लोकांचे भले होणार आहे आणि तेही फक्त मोठे काँट्रॅक्टर…

युद्धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गॅसची आणीबाणी

युद्धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गॅसची आणीबाणी स्लग – केंद्र सरकारकडून गॅससाठी एस्मा कायदा लागू गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आधी घरगुती गॅसला प्राधान्य मग औद्योगिक वापरासाठी होणार…

मुंबई मराठी पत्रकार संघात ‘एआय परिषद २०२६’ चे आयोजन

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे माध्यमविश्वात मोठे परिवर्तन घडत आहे. पत्रकारिता, कथाकथन आणि चित्रपट निर्मिती यामध्ये एआय च्या वाढत्या वापराचा वेध…

गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी ९ लाख मुलींचे होणार लसीकरण

रमेश औताडे मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या…

युद्धाचा भारताला चटका गॅस ६० रुपयांनी महागला

मुंबई : अमेरिका- इस्रालयने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा चटका अखेर भारताला बसला आहे. घरगुती गॅसचे दर ६० रुपयांनी वाढले आहेत. इतकेच नाही तर आता युद्धजन्य स्थिती पहाता २५ दिवसात एकच गॅस सिलेंडर मिळणार असल्याने गॅसचा पुरवून वापर…

ऋतुराज, आशीष, झेनुलचे चुरशीच्या लढतीत विजय

सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धा ऋतुराज, आशीष, झेनुलचे चुरशीच्या लढतीत विजय मुंबई, ८ मार्च:  सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज कर्नाड, आशीष गोरे आणि झेनुल अर्सिवालाने चुरशीच्या लढतीत विजय मिळवले. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत ऋतुराजने नौजद मुन्शीचा ३-२(५२-७१, ६७-३१, ६६-२८, ४४-५९, ५५-१७) असा पराभव केला. अन्य सामन्यात, आशीषने प्रदीप जाधववर ३-२ (५७-५२, १३-५३, ६१-४४, १५-५8, ४8-४४) त्याच फरकाने विजय मिळवला. झेनुल अर्सिवालाने प्रसाद वानखेडकरला ३-१ असे हरविले. निकाल (पहिली फेरी): झेनुल अर्सिवाला विजयी वि. प्रसाद वानखेडकर ३-१ (२२-६४, ५४-३६. ५२-११, ६१-११); इमदाद खान विजयी वि. मिथुन मर्चंट ३-० (५७-१३, ५०-४०, ५३-९); एजाज मर्चंट विजयी वि. मनन शाह ३-१ (५२-३९, ६६-१, ३२-७४, ७२-३४).

हिरण्मयी, अथर्व, निधीश विजेते 

सुरेखा कडवे स्मृती बुध्दिबळ स्पर्धा हिरण्मयी, अथर्व, निधीश विजेते ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती शालेय बुध्दिबळ स्पर्धेमधील १३ वर्षाखालील गटात हिरण्मयी कुळकर्णी, १० वर्षाखालील गटात अथर्व मुळीक आणि ७ वर्षाखालील गटात निधीश खोपकर यांनी विजेतेपद पटकाविले. परिणामी विजेत्यांबरोबर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या मातांचा देखील आदर्श महिला पुरस्काराने अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते व मंगेश चिंदरकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित स्पर्धेमधील निर्णायक पाचव्या साखळी फेरीत पहिल्या पटावर जी. क्वाड्रसने स्कॉच ओपनिंगचा प्रयोग करीत हिरण्मयी कुळकर्णीच्या राजावर प्रारंभी जोरदार हल्ले केले. परंतु बचाव तंत्राचे अचूक डावपेच रचून अपराजित हिरण्मयीने २८ व्या मिनिटाला बाजी मारली. आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, आरएमएमएस व मुंबई बुध्दिबळ संघटना सहकार्याने झालेल्या स्पर्धेच्या १३ वर्षाखालील गटात मुलींमध्ये हिरण्मयी कुळकर्णीने (४.५ गुण) प्रथम, जी. क्वाड्रसने (३ गुण) द्वितीय, साईशा मुळेने (२.५ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये गोकर्ण औटीने (४ गुण) प्रथम, प्रणव जैनने (३.५ गुण) द्वितीय, अर्णव जगतापने (३ गुण) तृतीय; १० वर्षाखालील गटात मुलींमध्ये आध्या पाठकने (४ गुण) प्रथम, साध्या जाधवने (३ गुण) द्वितीय, विधी येसणेने (३ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये अथर्व मुळीकने (५ गुण) प्रथम, कैवल्य परबने (४ गुण) द्वितीय, अर्णव शेटेने (३ गुण) तृतीय तर ७ वर्षाखालील गटात मुलींमध्ये मिर्या तिवारीने (४ गुण) प्रथम, मनस्वी पाटीलने (४ गुण) द्वितीय, पेहेर शाहने (३ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये निधीश खोपकरने (५ गुण) प्रथम, आरुष नेवस्करने (२.५ गुण) द्वितीय, सार्थ शाहने (२.५ गुण) तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जिंकला.