Category: मुंबई

Mumbai news

तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई  ः तृतीयपंथी समाजाला मोठ्या संघर्षातून मतदानाचा हक्क मिळाला आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी  बुधवारी (ता. २०) विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. तृतीयपंथी समाजाला मतदानाच्या हक्कापासून कित्येक वर्षे वंचित राहावे लागते होते. आपल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात लढा द्यावा लागला होता. मुंबई व उपनगरात मोठ्या संख्येने तृतीयपंथी समाजाचे वास्तव्य आहे. त्यात उपनगरात १,०७६ पेक्षा अधिक तृतीयपंथी राहतात. घाटकोपर, मानखुर्द, मानखुर्द, शिवाजीनगर, सायन कोळीवाडा, धारावी, माहीम, दहिसर, विलेपार्ले, अंधेरी पश्चिम, विक्रोळी, वडाळा, वर्सोवा व अन्य मतदान केंद्रांवर जाऊन तृतीयपंथींनी मतदान केले. कागदपत्राच्या अपुऱ्या अभावामुळे कित्येक तृतीयपंथींना मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित रहावे लागले आहे. लोकप्रतिनिधी निवडण्याची ताकद आपल्या बोटात आहे. आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदान केल्याची भावना किन्नर माँ संस्थेच्या अध्यक्षा सलाम खान यांनी व्यक्त केली आहे. ०००

आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश…

मुंबई …लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या श्री नारायणराव आचार्य  विद्यानिकेतन जिम्नॅस्टिक्स  केंद्रात सराव करणाऱ्या  विविध शाळेतील एकूण १३ खेळाडूंनी बालेवाडी , पुणे या ठिकाणी झालेल्या शालेय राज्यस्तरीय  ऍक्रोबॅटीक्स  जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत  मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व…

मुंबईचा हसन बदामी उपांत्यपूर्व फेरीत

– मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्पर्धा   मुंबई, 19नोव्हेंबर: मुंबईचा अनुभवी खेळाडू हसन बदामीने सातत्य राखताना मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्पर्धेच्या सीनियर 15-रेड स्नूकर प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश…

हर्षित माहिमकर, प्रिशा शाहला दुहेरी मुकुट

– महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा 2024   मुंबई, 19 नोव्हेंबर: ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) संयुक्त विद्यमाने कोर्ट चॅम्पियन्स 24 आयोजित एनएससीआय- योनेक्स सनराईज-महाराष्ट्र…

इंदिरा गांधी जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच याप्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची सामुहिक शपथ…

मेघना साने यांची हॅटट्रिक

मुंबई : मेघना साने यांना  ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा विशेष पुरस्कार त्यांच्या ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकासाठी घोषित झाला आहे. मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात हा पुरस्कार त्यांनी…

मतदान केंद्रावर मोबाइल बंदीमुळे मतदान कमी होण्याची भीती

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल नेता येणार नाही किंवा मोबाइल नेला तरी तो बाहेर ठेवण्याची…

विशेष मेट्रो गाडीच्या माध्यमातून पोस्को कायद्याबाबत जनजागृती

मुंबई : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को) २०१२ जनजागृती सप्ताहाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पोस्को जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी, मुलांच्या सुरक्षिततेसाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ लिमिटेड…

धारावीतील एका मंदिरासंदर्भात खोटे सांप्रदायिक पोस्टर लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न -वर्षा गायकवाड

मुंबई : बटेंगे तो कटेंगे घोषणा देणारेच समाजात फूट पाडून विभाजन करण्याचे काम करत आहेत. प्रचार संपताच सत्ताधारी भाजपा युतीकडून फेक नेरेटीव्ह पसरवले जात आहे. धारावीतील एका मंदिरासंदर्भात खोटे सांप्रदायिक…

 सरस्वती मंदिर आयोजित आंतरशालेय खोखो व लंगडी स्पर्धेची घोषणा

सरस्वती मंदिरच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मुंबई: सरस्वती मंदिर, माहीम आयोजित आंतरशालेय खो-खो व लंगडी स्पर्धा सरस्वती मंदिर शाळेच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात सुरु होत आहेत. या स्पर्धेत ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धा फेडरेशनच्या नियमांनुसार खेळवली जाईल. स्पर्धा विभाग: मुंबई शहरातील शाळांमधील खो-खो व लंगडी या दोन खेळांसाठी ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, लंगडीसाठी अधिकतम ३५ किलो वजन असलेले विद्यार्थीच भाग घेऊ शकतील याची नोंद घावी. या स्पर्धेसाठी प्रथम प्रवेशका देणाऱ्या पहिल्या १२ शाळांचाच समावेश केला जाईल. स्पर्धेची तारीख व वेळ: प्रवेशका देण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२४ आहे. शाळांच्या क्रीडा प्रमुखांनी प्रवेशकाचे फॉर्म सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत द्यावेत. प्रवेशकासोबत शाळेच्या मुख्याध्यापकांचा शक्का व सही असलेली खेळाडूंची यादी संबंधित जमा करावी. यादीमध्ये खेळाडूंचे नाव, जन्मतारीख, इयत्ता ही माहिती शाळेच्या जी-आर नुसार बिनचुक भरावी. सामन्याची वेळ: दररोज सकाळी ८.०० वाजता सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणावर स्पर्धा होतील. संपर्क: अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख श्री. सिरिल सर  (९९२२९३३६४७) किंवा श्री. बंडगर सर  (९९६९०३३०६२) यांच्याशी संपर्क साधा.