पुण्याचे क्यूईस्ट गौरव देशमुख, आरव संचेती बाद फेरीत
मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा मुंबई : पुण्याच्या गौरव देशमुख आणि आरव संचेती यांनी लीग सामने जिंकताना मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेत बाद फेरी गाठली. मलबार हिल…
Mumbai news
मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा मुंबई : पुण्याच्या गौरव देशमुख आणि आरव संचेती यांनी लीग सामने जिंकताना मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेत बाद फेरी गाठली. मलबार हिल…
मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ या दिवशी होईल. त्यासाठी अर्ज पाठवण्याचा शेवटचा दिवस २८ नोव्हेंबर २०२४ असा आ्रहे. हे अर्ज संस्थेच्या फेसबुक आणि dadarmatungaculturalcentre.org या वेबसाईट वर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ः ०२२-२४३०४१५०.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल असून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला असून या संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अनिल चौगुले यांनी पाठिंब्याचे पत्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांना दिले आहे. मुंबई शहरात नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे लाखो रहिवासी आहेत, हा समाज काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे चौगुले यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल खासदार वर्षा गायकवाड यांनी नाथपंथी डवरी समाजाचे आभार व्यक्त केले आहेत.
डॉ. बाबासाहेबांचे संविधान रामलीला मैदानावर जाळून भाजपाकडूनच संविधाननिर्मात्यांचा अपमान – वर्षा गायकवाड मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय जनता पक्ष व आरएसएस यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वात पवित्र ग्रंथ संविधान दिले त्या संविधानाला भाजपा व आरएसएस मानत नाहीत. मनुवादी प्रवृत्तींनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान रामलीला मैदानावर जाळून संविधान व संविधाननिर्माते बाबासाहेब यांचा अपमान केला आहे, असे प्रत्युत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्षला खोटे बोलण्याचे प्रशिक्षण दिलेले असते त्यामुळे ते सातत्याने खोटे व अपप्रचार करणारी माहिती पसरवत असतात. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही तेच केले असून काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केल्याचे सांगत आहेत. राजनाथसिंह यांना माहित असायसा हवे की संविधानाला विरोध त्यांच्या मातृसंस्थेनेच केलेला आहे. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा भाजपा व आरएसएस खुलेआम करत आहे. ४०० पार चा नारा कशासाठी दिला होता, हे देशाची जनता विसरलेली नाही. भाजपाच्या राज्यात आजही दलित व मागासवर्गीय समाजावर सर्वात जास्त अत्याचार होत आहेत. काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच आदर व सन्मान केला आहे. तत्कालीन मुंबई प्रांतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले व संविधानाची जबाबदारी दिली. पंडित नेहरु यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. राजनाथसिंह सवयीप्रमाणे खोटे बोलले असून काँग्रेस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोटी व माहिती पसरवल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
हर्षित माहिमकरला दुहेरी मुकुटाची संधी मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) मान्यतेने तसेच ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) आणि एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्ट चॅम्पियन 24 द्वारे आयोजित महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धेत हर्षित माहिमकरने पुरुष आणि १७ वर्षांखालील मुले एकेरी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. महालक्ष्मी येथील वेलिंग्डन स्पोर्ट्स क्लब कोर्टवर खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत बिनसीडेड हर्षितने कमालीचे सातत्य राखताना पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित श्वेतांक कर्णिकवर ३४ मिनिटांमध्ये 21-13, 21-10 असा विजय मिळवला. १७ वर्षांखालील मुले गटात दुसऱ्या सीडेड हर्षितने बिगरमानांकित सुमीत माडे याचा 21-16, 21-15 असा पराभव केला. १७ वर्षांखालील मुली एकेरीच्या उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित खुशी पाहवाने अव्वल सीडेड श्रावनी पाटील हिला चुरशीच्या लढतीत 18-21, 21-14, 28 26 असे हरवले. अंतिम फेरीत…
मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२४-२०२५ चे आयोजन महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट हॉल, शिवाजी पार्क, दादर येथे करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात हि स्पर्धा रंगणार असून पुरुष गटातील पहिल्या ३२ तर महिला गटातील पहिल्या १६ विजेत्यांना मिळून एकंदर १० लाखांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुरुष गटातील विजेत्याला रोख रुपये १ लाख ५० हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ७५ हजारांचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात येईल. तर महिला गटातील विजेतीला १ लाख, उपविजेतीला ५० हजार व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ३० हजारांचे ईनाम व ट्रॉफी देण्यात येणार आहे. शिवाय पहिल्या फेरीपासून खेळाडूने केलेल्या व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅमसाठी रोख पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने गणवेश देण्यात येणार असून बाहेर गावच्या खेळाडूंची निवास, चहापान व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेबाबतची संपूर्ण माहिती प्रवेश अर्जासोबत असलेल्या माहितीपत्रकात देण्यात आली असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. इच्छुक खेळाडूंनी आपली नावे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे नोंदवावीत. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेत स्थळावरून करण्यात येईल.
मुंबई : उमेदवारी अर्जावर अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्याने चेंबूरमधील एका अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. याप्रकरणी अपक्ष उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र उच्च न्यायालयाने…
त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवात महिलाभगिनींचा मोठा सहभाग दिनेश मराठे मुंबई : कार्तिक मासातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तिरावर शुक्रवारी सायंकाळी 7:30 ते 9:30 च्या दरम्यान पार्वतीपते हरहर महादेव च्या जयघोषात महामंगल असा देह चित्त भान हरपणारा नयनरम्य दीपोत्सव आणि महाआरती सोहळा मोठया हर्ष उल्हासात संपन्न झाला.या मनाला सुखद आनंद देणाऱ्या महाआरती सोहळ्याचे आयोजन गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट आणि मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. उत्तर प्रदेश येथील वाराणसी स्थित श्री काशी मठ संस्थानचे मठाधिपती साम्यमिंद्र तीर्थ स्वामीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात अध्यक्ष प्रविण कानविंदे,सेक्रेटरी शशांक गुळगुळे आणि सीईओ प्रोजेक्ट ऋत्विक औरंगाबादकर यांनी उपस्थित सर्व भाविकांचे स्वागत केले. यंदाच्या 11 व्या वर्षी त्रिपुरारी पूर्णिमा निमित्त वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तिरावर भाविकांच्या प्रचंड गर्दीत मोठ्या हर्षोल्हासात ढोलताशाच्या गजरात हर हर शंभो जय शिव शंभूच्या जय घोषात दीपोत्सव आणि महाआरती संपन्न झाली.या महाआरतीला मुंबईसह ठाणे, डोंबिवली,कल्याण,कर्जत,कसारा येथून लोकं आली होती. बाणगंगेच्या दगडी पायर्यांच्या घाटावर बसलेल्या गंगाभक्तांच्या मुखातून हर हर महादेव आणि जय जय गंगे नमामी गंगे,हर हर शंभो जय शिव शंभूचा जयघोष सुरू होता.त्यात भगवी पताका डौलाने नाचवत ढोल ताशा पथकाने उपस्थित तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली होती. बाणगंगा काठावर सर्वत्र गगनभेदी घोषणा शंखनाद,केशरी ध्वज नृत्य, पाण्यात पोहणारे,बदकांचे थवे त्यात छोट्या 4 होड्यात फोटोसाठी छायाचित्रकारांची चाललेली लगबग,पायर्यावर बसलेली भाविक मंडळी पहायला मिळत होती.स्थानिक तरुण तरुणी, तर दूरवरून आलेले काही भाविक आपल्या पत्नी, लहानग्यांना घेऊन महाआरतीच्या जल्लोषात मग्न होती. त्यातही महिलांनी केलेला साजशृंगार सर्वांचे चित्त आकर्षित करीत होती. चारही बाजूंनी दिव्यांचा लखलखाट प्रकाशमान होत असल्यामुळे येथे दीपोत्सवाच्या सोहळ्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. बाणगंगेच्या किनारी उभारलेल्या खास सात स्टेजवर मंगलमय गणेश स्तुती,गंगा स्तुती, गीत गात सात षोडशी कन्या पारंपारिक वेषभूषा करीत भरत नाट्यम नृत्य करताना त्यांच्या चेहर्यावर आनंदोत्सव झळकत होता. पौरोहित्य सादर करीत असलेल्या मंगलमय श्रीगणेश वंदना,रुद्र सूक्त,पुरुष सुक्त,श्रीसूक्त आणि शांती पाठाच्या मंगलमय वेद मंत्राच्या घोषाने वातावरणात अगदी वाराणसी येथील गंगा आरतीचा अनुभव निर्माण करीत होते तर किनारी बसुन मुली आणि महिला गंगेत प्रज्वलन केलेले दीप सोडत होत्या.हे विलोभनीय वातावरणात अगदी भक्तिमय झाले होते. हर हर महादेव या जयघोषात शिव तांडव स्तोत्र घेत उपस्थितांचे स्वागत केले गेले .प्रथम धूपारची, दीपारती आणि शेवटी महाआरती झाली.यावेळी सोहळे परिधान केलेले गळ्यातील रुद्राक्ष माला,भगवे अंगरखा या पारंपारिक वेषभूषा केलेले तरुण पुरोहित तालबद्ध होऊन महाआरती करीत होते. भाविकांनी पार्वतीपते हरहर महादेव, गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम च्या जय घोषात सारा बाणगंगा परीसर भाविकांनी दुमदुमुन सोडला.त्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता, दुर्गे दुर्गटभारी, शिव तांडव स्तोत्र, पुरुष सूक्त,गंगा स्तुती, रामस्तुती,शिवपार्वती स्तुती आणि जल,वायू,आकाश, अग्नी आणि पृथ्वीचे आभार व्यक्त करीत वेद मंत्र,पौराणिक मंत्र म्हणत वातावरण एका दिव्य सोहळ्याचा आनंद भाविकांनी अनुभवला. येथील स्थानिक बाणगंगा रहिवाशी महिला पुरुष यानी घाट सजविण्यात मोठे सहकार्य केले.येथील घाटावर जागो जागी काढलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या रांगोळ्यांच्या…
स्वाती घोसाळकर कल्याण: कल्याणशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे भावनिक नाते आहे. कल्याणचा गड शिवसैनिकांनी आपल्या घामाने राखलाय. कल्याणच्या या स्वाभिमानी भूमित शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना मतदार करून गाडा असा आदेश आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
जैन इरिगेशनचा रूट मोबाईलवर 10 धावांनी विजय मुंबई, 16 नोव्हेंबर: मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कार्पोरेट ट्रॉफी टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या ए डिव्हिजनमध्ये जैन इरिगेशन अ संघाने रूट मोबाईलवर 10 धावांनी विजय…