Category: मुंबई

Mumbai news

मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या मंत्रालयातील मिलिंद शेणॉयांची बदली

मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या मंत्रालयातील मिलिंद शेणॉयांची बदली अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या दिवशी त्यांचा विरोध असणाऱ्या फाईलींना दिली होती मंजुरी शासकीय दुखवटा असताना राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना दिला अल्पसंख्यांक दर्जा…

विश्वास, मुक्तसंचार अन् महत्वकांक्षेचे नवे पर्व…

विश्वास, मुक्तसंचार अन् महत्वकांक्षेचे नवे पर्व… स्लग : भारत–फ्रान्समधिल मैत्रीचे नवे पर्व ०  जागतिक स्थैर्यासाठी उभय देशातील भागीदारी महत्त्वाची मुंबई : विश्वास, मुक्तसंचार अन् महत्वकांक्षेचे नवे पर्व फ्रान्स आणि भारतात आजपासून सुरु होतेय अशा शब्दात फ्रान्सचे ऱाष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या भारत भेटीचे…

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत स्वागत करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत-फ्रान्सच्या मैत्रिचे नवे पर्व अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी या मॅक्रॉन यांच्या या भारतभेटीचे वर्णन केले.

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट आमनेसामने! मुंबई : दादरच्या अजितदादा पवार क्रीडा नगरीत सध्या ‘डायनॅमिक’ व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा अक्षरशः जंगी…

२०वी राज्य अजिंक्यपद ट्रम्पोलीन टमब्लिंग जिम्नास्टिक्स स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न

२०वी राज्य अजिंक्यपद ट्रम्पोलीन टमब्लिंग जिम्नास्टिक्स स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न मुंबई : २० व्या राज्य अजिंक्यपद ट्रम्पोलीन टमब्लिंग जिम्नास्टिक्स स्पर्धा नुकत्याच मुंबईत वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या भारतीय क्रीडा…

 प्रशांत – अंबिका- हेमंत विजयी

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा प्रशांत – अंबिका- हेमंत विजयी मुंबई जिल्हा कॅरम संघटना आयोजित भारतीय आयुर्वीमा महामंडळ, ओ एन जी सी व हिंदुस्थान पेट्रोलियम पुरस्कृत ३३ व्या वरिष्ठ मुंबई…

  मेट्रो- ४ च्या स्लॅब दुर्घटनेप्रकरणी अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रावर कारवाई कधी करणार?

मेट्रो- ४ च्या स्लॅब दुर्घटनेप्रकरणी अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रावर कारवाई कधी करणार? खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल मुंबई : मेट्रो ४ चा मुलुंड भागातील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला तर…

सानपाडा येथे भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन

सानपाडा येथे भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथील सेक्टर ११ मध्ये भक्ती रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा जवळ भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच प्रभाग १९च्या नवनिर्वाचित नगरसेविका शैला पाटील,  शिल्पा ठाकूर,  नगरसेवक भाऊ भापकर,  सुनील कुरकुटे, समाजसेवक   अजय पवार, श्री तानाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर,  नगरसेविका कोमलताई वास्कर, प्रभाग क्रमांक २२चे नगरसेवक अभिजीत देसाई, समाजसेवक मिलिंद सूर्याराव, शुभांगी सूर्याराव, समाजसेवक गणेश पावगे, सानपाडा  ७.५०गार्डन ग्रुपचे रणवीर पाटील,  दत्तात्रय कुरळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे  अध्यक्ष मारुती विश्वासराव, चिटणीस जगदीश एकावडे,  उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे, संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम,  उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे,  सह खजिनदार सुभाष बारवाल, उपाध्यक्षा डॉ. विजया गोसावी, हास्य क्लब गार्डन ग्रुप ६.३० चे भरत खरात, गार्डन ग्रुप ७.०५ चे जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा टोपी, रुमाल आणि तुलसीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. नगरसेवक भाऊ भापकर आणि समाजसेवक अजय पवार यांनी  विश्वासराव कुटुंबियांच्या विजया इंटरप्राईजेस यांच्यातर्फे महाराष्ट्र सरकार आणि खाजगी सेवा एकाच ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या सेवाभावी कार्याला शुभेच्छा दिल्या.

दिव्यांग मुलीचे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण

दिव्यांग मुलीचे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण मुंबई / रमेश औताडे नागपूर येथील दिव्यांग मुलगी कु. मानवता ऊर्फ बेशिका रवीकांत डोंगरे हिला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवार १६ फेब्रुवारी पासून हे आंदोलन सुरू झाले असून विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. “निर्णय झाल्याशिवाय माघार नाही, जिंकलो नाही तर कधीच नाही,” असा निर्धार व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनस्थळी मानवता हिने हातात आपल्या नातेवाईकाचा फोटो धरून न्यायाची मागणी केली. प्रशासनाने संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे पाहावे, अशी मागणी केली. आझाद मैदानावरील या उपोषणामुळे पुन्हा एकदा दिव्यांगांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

घरांसाठी १४ कामगार संघटनांच्या वतीने येत्या १० मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा!

घरांसाठी १४ कामगार संघटनांच्या वतीने येत्या १० मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा! मुंबई -घराच्या प्रश्नावर सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने निराश झालेल्या कामगारांमध्ये आता कमालीचा असंतोष उफाळून आला…