Category: मुंबई

Mumbai news

“एमएमआरडीए”चा अधिशेष अर्थसंकल्प

“एमएमआरडीए”चा अधिशेष अर्थसंकल्प स्लग-  ४८,०७२.५७ कोटींचा आराखडा O आर्थिक परिवर्तन आणि पायाभूत सुविधांना गती O प्रकल्पांसाठी ८७%  भरघोस तरतूद मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने  आज सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रुपये ४८,०७२.५७  कोटींचा अधिशेष अर्थसंकल्प सादर केला…

म्हाडाच्या मुंबईतील ११८ सदनिकेसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी

म्हाडाच्या मुंबईतील ११८ सदनिकेसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ११८ सदनिकांची विक्री जाहीर करण्यात आली आहे.…

सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा

सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा येत्या २६ फेब्रुवारीला होणार शिक्कामोर्तब राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय स्वाती घोसाळकर मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार आहे. आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

माझी जीभ खुशाल कापा पण, भाजपाला एक्सपोज करणारच काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचे भाजपाला चँलेंज मुंबई  : अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, भाजपाचा पर्दाफाश करतच राहणार असे चँलेंजच आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला २ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकर्‍यांचे अमेरिकेतून होणार्‍या आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल, चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा.  सपकाळ पुढे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची किर्ती महान आहे, चंद्र जसा वाढत जातो तशीच महाराजांची किर्ती आणखी वाढत जावी, याबाबत दुमत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाने माझ्या विधानाचा “ध” चा “मा” करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, यामागचे कारस्थान समजून घेतले पाहिजे. एपस्टिन फाईल्समध्ये बरंच काही दडलेलं आहे, त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करणे हा एक भाग आहे तर अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्थ होणार आहे, महाराष्ट्रातही अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यावर भाजपा सरकारकडे उत्तर नाही म्हणून या प्रश्नांवर भाजपाला पडदा टाकायचा आहे, यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

अजित पवारांच्या अपघातग्र्स विमानाचा  ब्लॅक बॉक्स बंद ?

अजित पवारांच्या अपघातग्र्स विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ? मुंबई :  अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीतून दरदिवशी संशयास्पद घटना उघडकीस येत आहेत. आता अजित पवारांच्या अपघातग्र्स्त विमानातील ब्लॅकबॉक्स बंद होता अशी माहिती पुढे येत आहे.  विमानातील तांत्रिक अडचणींची माहिती देणाऱ्या ब्लॅक बॉक्सबाबतही अनेक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असल्याचा दावा काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. तसंच, तपासणीसाठी हे ब्लॅक बॉक्स आता विदेशात पाठवला जाणार आहे, असंही म्हटलं जातंय. दरम्यान, यावर रोहित पवारांनीही आता शंका उपस्थित केलीय. ते म्हणाले, “ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. अतुल लोंढे म्हणतात त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स बंद केला असेल तर खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून आता एक कारण लोकांमध्ये पेरलं जात आहे. ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. पण ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे चौकशी करता येत नसेल तर मी म्हणतोय त्याप्रमाणे हा अपघात नव्हता, हा घातच होता हे क्लिअर होईल.”

पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा

पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्या मंगळवारी १७ फेब्रुवारीला एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत असून मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईतील  वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान  दुपारी २.१५ वाजता मुंबईत येणार आहेत. त्यानंतर, दुपारी २.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात लोकभवन (यापूर्वीचे राजभवन) येथे द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. त्यानंतर, दुपारी ५ वाजता नरेंद्र मोदी आणि मॅक्रोन यांची हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंडटेबल चर्चा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल  करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया‘ परिसरात इंडो–फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संतापजनक: मढयाच्या टाळूवरील लोणी खाणारे ते अधिकारी कोण ?

संतापजनक: मढयाच्या टाळूवरील लोणी खाणारे ते अधिकारी कोण ? अजितदादांच्या निधनानंतर काही तासातच त्यांनी रोखलेल्या ७५ फाईलांना संशयास्पद मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल  फडणवीसांनी दिली मंजुरीला स्थगीती स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित…

मेट्रो- ४ च्या स्लॅब दुर्घटनेप्रकरणी अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रावर कारवाई कधी करणार ?

  खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल मुंबई : मेट्रो ४ चा मुलुंड भागातील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेत आतापर्यंत फक्त उपकंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना…

आठ दिवसांत अहवाल सादर करा – सभापती प्रा. राम शिंदे

माझगाव ताडवाडीतील बी.आय.टी. चाळ पुनर्विकास प्रकरणी २१ वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे मुंबई: माझगाव ताडवाडी येथील बी.आय.टी. चाळ पुनर्विकास प्रकरणी म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिका, विकासक व सर्व संबंधित अधिकाऱ्यांची महानगरपालिका…

दिलीप सुखटनकर व मिलिंद पूर्णपात्रे यांना राज्य उपविजेतेपद

  योनिक्स सनराईज महाराष्ट्र मास्टर राज्य बॅडमिंटन स्पर्धा   मुंबई: योनिक्स सनराईज महाराष्ट्र मास्टर राज्य बॅडमिंटन स्पर्धा ही प्रतिष्ठेची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच बॉम्बे जिमखाना येथे उत्साहात पार पडली. या…