Category: मुंबई

Mumbai news

भाषा गौरव दिनानिमित्त ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’

भाषा गौरव दिनानिमित्त ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’ ‘सुंदरा’ फेम मीना नेरुरकर यांचा कलाश्रमच्या उपक्रमात सहभाग अभिनेते राजा परांजपे यांना अभियान सन्मान पुष्पात नृत्यांजली अर्पण ‘कलाश्रम’ या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबवला जातो. यंदा या फेब्रुवारी महिन्यात होणारे हे ७४ वे पुष्प आहे. स्वातंत्र्यसैनिक डॉ. पशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम डॉ. मीना नेरुरकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका अशी त्यांची ओळख आहे. शुक्रवार, २७ मार्च ‘मराठी भाषा गौरव दिनी’ सायंकाळी ४ वाजता. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर चौथा मजला, चित्रकला दालन, प्रभादेवी येथे हा कार्यक्रम होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दिवंगत झालेल्या प्रज्ञावंतांचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या गुणीजनांना ‘दखलपत्र’ देऊन त्यांचा सन्मान करणारा हा उपक्रम असतो. नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची पत्नी आणि नाट्यसंपदा संस्थेचे व्यवस्थापन जबाबदारी स्वीकारणाऱ्या दिवंगत विजया पणशीकर, चित्रकार, सजावटकार वसंत तोडणकर, वृत्त निवेदक, लेखक अनंत भावे या दिवंगतांचे स्मरण यावेळी केले जाणार आहे. यांच्या नावाचे ‘दखलपत्र’ सुप्रिया प्रोडक्शन या नाट्यसंस्थेला गती देणाऱ्या अनिता चव्हाण, चित्रकार, सजावटकार प्रकाश लहाने, वृत निवेदक, पत्रकार विशाल पाटील, ज्या गिरणी कामगार पुत्राने कलेच्या प्रांतात यश मिळवले आहे. त्यांना ‘अव्वल पुरस्कार’ देऊन गौरवांकित करण्यात येते. रोख रक्कम, दखलपत्र असे त्याचे स्वरूप असते. दिवंगत आदर्श श्रमिक पांडुरंग परब, आदर्श गृहिणी रुक्मिणी परब यांच्या नावाचा हा मान यंदा  रंगभूषा, प्रकाश योजना, नेपथ्यकार सुनील देवळेकर यांना प्राप्त झालेला आहे. परब यांचे सुपुत्र, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक परब यांचे मार्गदर्शन या पुरस्काराला लाभलेले आहे.  प्रत्येक महिन्याला महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजा परांजपे यांना निवृत्त पोलीस अधिकारी, गायक हरिश्चंद्र ठोंबरे आणि नृत्यांगना अनघा देसाई ‘बाई मी विकत घेतला शाम’ या गाण्यावरती भावमुद्रा सादर करून नृत्यांजली अर्पण करणार आहेत. २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’चे निमित्त घेऊन संस्थेने ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’ या ६७ व्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. चित्रपट निर्माते, पर्यावरण तज्ञ, संपादक डॉ. किशोर भोईर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. डॉ. कामिनीदेवी भोईर यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माते सतीश रणदिवे हे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी होणार आहे. ज्योती शिंदे, शेजल जाधव, मानसी धारप, रोहन वानखेडे, सुजाता गोलटकर, सलोनी बोरकर, मृण्मयी मोडक आदींचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. नंदकुमार पाटील हे या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आहेत तर नंदिनी पाटील या संचालिका आहेत.

  वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार

वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे अनिल ठाणेकर मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.

 आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा भाजपा सरकारकडून राज्यात विकासाच्या नावावर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी – सुरेशचंद्र राजहंस मुंबई : भाजपा महायुती सरकारने मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास केला आणि आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पर्यावरणाची काळजी व्यक्त करत आहेत, हा केवळ दिखाऊपणा  आहे. पर्यावरण आठवडा सारख्या कार्यक्रमात भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती अधिक महत्त्वाची असते. पर्यावरण हा केवळ परिषदांचा विषय नाही, तर तो जनतेच्या श्वासाचा, भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे. पर्यावरणावर बोलताना सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, मुंबईतील ‘पर्यावरण आठवडा’ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास याबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या पण त्यांच्याच सरकारने राज्यात पर्यावरणाची मोठी हानी केली आहे. आरे मधील झाडांची कत्तल, चंद्रपूर ताडोबा– अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जंगलांवर वाढता ताण आहे, वेताळ टेकडी येथील झाडांवर घाला घालण्यात आला, मुंबई तील मँग्रोव्ह्स आणि सॉल्ट पॅन जमिनींवर विकासाच्या नावाखाली अनेक प्रकल्प सुरू आहेत. तपोवन मध्ये वृक्ष तोड चाललेली आहे. या सर्व घटनांनी सरकारची “विकास” ही संकल्पना नेमकी कोणासाठी आहे, हा प्रश्न निर्माण केला आहे. सरकारला खरोखरच पर्यावरणपूरक विकास हवा असेल तर, मोठ्या प्रकल्पांपूर्वी पारदर्शक पर्यावरणीय परिणाम अहवाल जाहीर करावेत. झाडतोडी ऐवजी पर्यायी आराखडे तयार करावेत. मँग्रोव्ह, टेकड्या आणि जंगलांचे कायदेशीर संरक्षण अधिक मजबूत करावे. स्थानिक नागरिक व पर्यावरणतज्ज्ञांचा सल्ला बंधनकारक करावा. केवळ शब्दांमध्ये शाश्वत आणि प्रत्यक्षात वेगळीच कृती ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राची जनता ओळखते. पर्यावरण वाचवायचे असेल, तर घोषणांपेक्षा ठोस कृती हवी. अन्यथा पर्यावरण आठवडा हा फक्त प्रतिमानिर्मितीचा कार्यक्रम ठरेल, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

  भाजपाचे ‘सबका साथ, सबका विकास’ थोतांड

भाजपाचे ‘सबका साथ, सबका विकास’ थोतांड मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे जुने निर्णय रद्द करण्याची भाजपा सरकारची कृती लोकशाहीसाठी घातक – वर्षा गायकवाड मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…

पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत बैठक

पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत बैठक आडतदारांबरोबर मूळ शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे – अण्णा बनसोडे मुंबई : गेल्या काही वर्षांपासून पुणे मार्केट यार्ड येथील फळ विभागाऐवजी भाजीपाला विभागात डमी आडत्यांमार्फत लिंबू विक्री सुरू…

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच –सरनाईक

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच –सरनाईक मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसी टीव्ही कॅमेरा प्रकल्प’ हाती घेतला. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल १११ कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीची बस स्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये; तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यासारख्या संवेदनशील ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. एकूण ६३३ ठिकाणी तब्बल ७,०३५ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे या ठिकाणच्या प्रत्येक हालचालीवर सतत नजर राहणार आहे, असे सरनाईक म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी इ-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) या संस्थेकडे सोपवली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असून, या प्रकल्पाचा एकूण कालावधी एक वर्ष निश्चित केला आहे. या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (यूएटी) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येईल. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागांतील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे. उर्वरित २७ विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालये सुरक्षित होतील. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. 

अंत भला तो सब भला…

अंत भला तो सब भला… शेवट्च्या मॅचमध्ये नेपाळचा पहिला विजय वर्ल्डकप विजय स्कॉटलंडचा केला पराभव वाढदिवशी गुलशन झाने ठोकला विजयी चौकार मुंबईत :  टी२० क्रिकेट वर्ल्डकपच्या आपल्या शेवटच्या मॅचमधये मुंबईत रंगलेल्या सामन्यात नेपाळने…

हर्षवर्धन सपकाळांची जाहीर दिलगिरी 

हर्षवर्धन सपकाळांची जाहीर दिलगिरी मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण देत छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणाशीही तुलना केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्याअसल्यास आपण जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे सपकाळ यांनी आज सांगितले. सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्यास समाजात तेढ निर्माण न होता ऐक्याचा संदेश जावा, हा आपल्या ७० सेकंदांच्या वक्तव्याचा गाभा होता, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय असून ते आपले आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सपकाळ यांनी नमूद केले.

मुंबई महापालिकेत ५७ हजार पदे रिक्त

मुंबई महापालिकेत ५७ हजार पदे रिक्त मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील तब्बल ५७ हजार पदे रिक्त असून ती पदे तात्काळ भरावीत अशी मागणी कामगार संघटनांव्दारे केली जात आहे.  राज्यात  लवकरच ७० हजार सरकारी पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या भरतीसहीत महापालिकेतीलही हा अनुषेश भरून काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.  मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली असून महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे महापालिकेतही नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून रिक्त पदे भरण्याची मागणी केली. या पत्रात कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे – बापेरकर यांनी म्हटले आहे की, मुंबई व मुंबई उपनगरातील जनतेला उत्तम नागरी सेवा पुरविता याव्यात यासाठी पालिकेचे १२९ विभाग व खाती कार्यरत आहेत. ४ प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये व ५ संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठीची रुग्णालये, प्रसुतिगृहे यामधून आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. हे सर्व विभाग आणि रुग्णालये योग्य प्रकारे चालविली जावीत यासाठी पालिकेच्या रचना व कार्यपध्दती विभागाने सखोल अभ्यास करून, कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या १ लाख ४५ हजार १११ अशी निश्चित केली आहे. तथापि, सध्या ही कर्मचारी संख्या सेवानिवृत्ती, मृत व इतर कारणांमुळे कमी झाली आहे. सध्या मुंबई महापालिकेत जेमतेम ९० हजाराच्या आसपास कामगार – कर्मचारी आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण येत आहे. रिक्त पदांमुळे अत्यावश्यक सेवेतील काम ठप्प होऊ नये म्हणून कंत्राटी कर्मचारी भरती केली जात आहे. कोणेतही कायमस्वरुपी व सततचे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेणे उचित नसताना पालिका मागील अनेक वर्षांपासून रिक्त शेडयुल्ड पदे न भरता कंत्राटी भरती करत आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता कामगार भरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान, मुंंबई महापालिकेतील रिक्त पदे भरण्यात येतील. असे आश्वासन पालिका प्रशासनाच्यावतीने वारंवार दिले जाते. मात्र रुग्णालयातील अत्यावश्यक रिक्त पदे पुन्हा कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याकरीता नुकतीच जाहिरातही देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटी भरती बंद करावी आणि पदभरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागील अनेक वर्षांपासून तुटपुंजा पगारामध्ये कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना, शासनाच्या भरती धोरणाच्या अधीन राहून कायम करावे व उर्वरित पदांसाठी भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी कामगार सेनेने केली आहे.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रान मुंबईच्या रस्त्यावर धावले…

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रान मुंबईच्या रस्त्यावर धावले… मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी सुरक्षेचे सारे संकेत धुडकावत मंगळवारी १७ फेब्रुवारी  रोजी मुंबईच्या रस्त्यावर जॉगिंग केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईच्या रस्त्यावर धावतांना दिसताच मुंबईकरांनी अचंबित होत त्यांचे फोटो…