महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन २०२४
मेहेंदळे, कर्णिक तिसऱ्या फेरीत मुंबई : अग्रमानांकित तनय मेहेंदळेसह दुसरा मानांकित श्वेतांक कर्णिकने ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशनच्या (जीएमबीए) संयुक्त विद्यमाने एनएससीआय आयोजित योनेक्स सनराइज-महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब कोर्टवर पहिल्या दिवशी गुरुवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मेहेंदळेने शिवम चौरेचे आव्हान 21 मिनिटांत 30-19 असे मोडीत काढले. बाजूच्या कोर्टवर कर्णिकने अरित्रा सरकारविरुद्ध 11 मिनिटांत 30-7 असा विजय मिळवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. युवा हर्षित माहीमकरने कनिष्क गुर्रमचा १७ मिनिटांत ३०-२३ असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या लढतीत, अनय पिंगुळकरने यश भोंगळेला 17 मिनिटांत 30-28 असे रोखले. पियुष कांबळेने सुमीत माडेवर 23 मिनिटांत 30-28 अशी मात केली. पुरुष एकेरी (फेरी-1): 1-तनय मेहेंदळे विजयी वि. शिवम चौरे 30-19; 2-श्वेतांक कर्णिक विजयी वि. अरित्र सरकार 30-7; सोहम पाटील विजयी वि. सार्थक कुलकर्णी ३०-२५; अभिनव सिंग विजयी वि. अभिषेक भागवत ३०-२५; अनय पिंगुळकर विजयी वि. यश भोंगळे ३०-२८; देवम देसाई विजयी वि. अनुप रत्नपारखी 30-25; चिरायू भोबू विजयी वि. सागर डेकाटे ३०-२७; ओम महाजन विजयी वि. सार्थक वाडेकर ३०-२६; सलाज मेघराज विजयी वि. आदित्य शर्मा ३०-२६; हर्षित माहिमकर विजयी वि. कनिष्क गुर्रम 30-23; आर्यन वर्मा विजयी वि. विनित शेलार 30-27; दारस नाडर विजयी वि. अयान कुलकर्णी 30-27; पियुष कांबळे विजयी वि. सुमीत माडे ३०-२८; निखिल चारी विजयी वि. कृष्णा भट्टड 30-26. 0000
मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा
सातत्यपूर्ण राजारवालचा शेखवर 3-2 असा विजय मुंबई, 14 नोव्हेंबर: मराठवाड्याच्या चेतन राजरवालने सातत्य राखताना नागपूरच्या झुबेर शेखवर मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेत बेस्ट ऑफ फाइव्ह फ्रेम ’15-रेड’ स्नूकर फेरीत 3-2 असा सनसनाटी विजय मिळवला. मलबार हिल क्लब (एमएचसी) बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत राजारवालने पहिली फ्रेम गमावूनही शेखचा 46-47, 64-11, 66-07, 25-54, 88- 1 असा पराभव केला. अनुभवी अनुराग बागरीने 30, 46 आणि 40 अशा छोटेखानी परंतु, महत्वपूर्ण ब्रेकसह मराठवाड्याच्या आमिर अन्सारीवर 3-0 (55-15, 80-8, 67-29) अशी मात करून दुसरा विजय नोंदवला. दरम्यान, मुंबईच्या हसन बदामी या आणखी एका अनुभवी क्यूईस्टने नाशिकच्या जगदीश कुर्मी याला (नाशिक) ३-० (६६-०८, ६९-३०, ६६-१३) असे पराभूत केले. मुंबईचा युवा खेळाडू शाहयान रझमीने आशित पंड्याला (डोंबिवली) याचा 3-1 (9-65, 74-30, 78-45, 65-17) असे हरवले. कृष्णा तोहगावकरने (ठाणे) आशित पंड्यावर 3-1(71-10, 54-22, 51-58, 61-52) अशी मात केली. निकाल – 15 – रेड स्नूकर:…
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची 47 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर
मुंबई : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची मानाची नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची चिरंतन स्मृती जपणारी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली…
देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा डाव होता
न्या. चांदीवाल यांचा गौप्यस्फोट मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही…
तनय मेहेंदळे, शिवानी हेर्लेकरला टॉप सीडिंग
-आजपासून महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा मुंबई : ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) अंतर्गत एनएससीआय आयोजित 14 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार्या योनेक्स सनराइज-महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तनय…
विधानसभा निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत आज सकाळी ११ वाजता
ठाणे जिल्ह्यात एक कोटीहून अधिक नागरिक घेणार सामूहिक मतदार शपथ नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार विविध उपक्रम राबविण्यात येत…
महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मविआला विजयी करा – कन्हैयाकुमार
धारावी, सायन कोळीवाड्याच्या जमिनीवर मोदीच्या मित्राची नजर, धारावी बचाओसाठी मात्र काँग्रेस धारावीकरांबरोबर मुंबई : भारतीय जनता पक्षाने ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी…
भाजपाची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ पोकळ घोषणा;
महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या पाठीमागे भाजपाचे कायम पाठबळ – आराधना मोना मिश्रा मुंबई : भाजप आणि रास्वसंघाची महिलांबाबतची भूमिका कायम अन्यायी राहिली आहे. महिला अत्याचारांबाबत मणिपूर ते मुंबई असा…
विधानसभेसाठी २० तारखेला जागरुक नागरिकाची भूमिका बजावा; मविचाच मुख्यमंत्री होणार–वर्षा गायकवाड.
निवडणूक आयोग फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासणार का? सत्ताधारी पक्षावर कारवाई कधी करणार? मुंबई : मुंबईकरांनी लोकसभा निवडणुकीलाच आपला कौल महाविकास आघाडीला देऊन विधानसभेचा निकाल दिला आहे. लोकसभेला ६ पैकी…
