Category: मुंबई

Mumbai news

महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा ‘मेगा प्लॅन’

राहुल गांधीसह, प्रियंका,खरगें, पायल, रेवंता रेड्डी, सिद्धरामय्यांच्या सभा मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी काँग्रेसने मेगाप्लान आखला आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या ६ दिवसांत  कांग्रेसचे राष्ट्रीय आणि राज्यातील बडे नेते सुमारे नव्वद सभा…

नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याच्या हालचाली

स्वाती घोसाळकर मुंबई: भाजपचा विरोध झुगारुन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. एन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नवाब मलिक यांचा जामीन रद्द…

‘ठाकरें’साठी सरवणकरांनी तडजोड करायला हवी होती – नांदगावकर

सिध्देश शिगवणकर मुंबई : भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत अनेक ठिकाणी मनसे मैत्रीपूर्ण  लढतीत आमने-सामने रिंगणात आहे. यावर बोलताना नांदगांवकर म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही, भाजप आणि शिवसेना शिंदे गट…

वाचन संस्कृती लोप पावली नसून माध्यम बदलले आहे – संदीप चव्हाण   

मुंबई : वाचन संस्कृती लोप पावली नसून वाचनाचे माध्यम बदलले आहे. दिवाळी अंक प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला साहित्याची ओळख होण्यास मदत होत असल्याचे मत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी व्यक्त केले. विहंग प्रतिष्ठान आणि नेहरूनगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ल्याच्या नेहरू नगर येथील नागरिक मंडळाच्या सभागृहात दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संदीप चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या प्रदर्शनात महाराष्ट्रातून प्रकाशित झालेले 110 दिवाळी अंक मांडण्यात आले असून हे अंक रसिकांना भरघोस सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्याबद्दल विहंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी सदामंगल प्रकाशनचे आभार मानले. विहंग प्रतिष्ठानने महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळख दिवाळी अंक प्रदर्शनातून जपली आहे. जेष्ठांनी वाचनाची आवड जोपासली तर नवीन पिढी मोबाइल वाचनातून पुन्हा पुस्तक वाचनाकडे वळू शकेल. मात्र वाचन हे कायमच राहील, असा आशावाद संदीप चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. रही भिडे यांनी दिवाळी अंक प्रदर्शनाद्वारे विविध साहित्यिकांच्या दिवाळी अंकातील साहित्याची ओळख करून दिल्याबद्दल विहंग प्रतिष्ठान आणि नेहरूनगर नागरिक मंडळा चे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरूनगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंग गोरे होते. यावेळी महाराष्ट्र दिनमानचे संपादक विनोद साळवी, पत्रकार हेमंत सामंत, सदामंगलच्या संपादक प्रज्ञा जांभेकर, व्यवस्थापक प्रशांत शिंदे, विधी आयोगाचे माजी सदस्य प्रिन्सिपल डी. एन. संदानशिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्जुक्ता मोकाशी-राव यांनी केले. हे प्रदर्शन रविवार 10 नोव्हेंबर पर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले असून सवलतीच्या दरात रसिकांना अंक विकत घेता येतील. प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी सहा वाजता स्वरगंध वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

सद्गुरू श्री वामनराव पै यांची 101 वी जयंती रक्तदान शिबिराने उत्साहात साजरी;

कांदिवली येथील ‘रक्तदान शिबीरास’ भरघोस प्रतिसाद मुंबई दि (प्रतिनिधी)  :  जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या 101 व्या जयंती निमित्त मीनाताई ठाकरे रक्तकेंद्र यांच्या सहकार्याने महिला आधार भवन, कांदिवली…

चेंबूरची जनता वंचित बहुजन आघाडीच्या आनंद जाधव यांच्यासोबत

मुंबई : राज्यात राजकिय अस्थिरता निर्माण होऊन खिचडी सरकार सत्तेत बसले. मात्र राज्याची  जनता आता सावध झाली आहे.  जनतेला आता बदल हवा आहे.  याच सर्वात मोठ उदाहरण आहे चेंबूरची जनता. चेंबूरच राजकीय गणित बदललं आहे. पुरोगामी मतांची विभागणी होऊन मनुवादी सत्तेत निवडून गेल्याचा आजवरचा इतिहास चेंबूरकरांनी पाहिलाय, परंतु २०२४ ची निवडणूक पुरोगामी विचारांचा आमदार निवडून देणार अशीच चित्र विभागात दिसून येत आहे, दोन शिवसेना यांच्यातील मत विभागणी आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांचा पारंपरिक मतदार वंचितच्या पारड्यात झुकते माप देताना दिसून येतेय, शिंदे सेना यांची भाजपसोबत असणारी जवळीक आणि ठाकरे सेना यांचा मोदींबाबत असणारा सॉफ्ट जिव्हाळा निवडणुकी नंतर गणिते बदलून दोन्ही सेना भाजपवासी होतील ही भीती मतदारांना वाटत असून मतदार महाआघाडी सेना पेक्षा वंचित बहुजन आघाडी उमेदवार यांच्याकडे झुकू लागला आहे.

उद्योग व्यवसायवाढीसाठी जागतिक परिषद

रमेश औताडे मुंबई : जागतिक स्तरावर उद्योगासाठी सहयोग, व्यावसायिक ज्ञानाची देवाणघेवाण आणि आर्थिक विकास वाढविण्यासाठी तसेच उद्योजक घडविण्यासाठी लोहाना इंटरनॅशनल बिझनेस फोरम ( LIBF) ने एक व्यासपीठ उपलब्ध केले असल्याची माहिती रविन ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय कारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. गल्फ देशांमध्ये (कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती) व्यवसायाचा विस्तार करणे हे LIBF फोरमचे लक्ष आहे. २०२५ मध्ये दुबई येथे होणाऱ्या आगामी युरो एक्झिम बँक LIBF जी सी सी कॉलिंग २०२५ शिखर परिषदेची उद्दिष्टे आणि दृष्टीकोन याबाबत सतीश भाई विठलानी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कृपा चॅटन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी माहिती दिली. युगांडातील फोरम च्या एका उद्घाटन कार्यक्रमात ३४ देशांतील ९५० हून अधिक प्रतिनिधी आले होते. परिणामी ३६ एम ओ यू आणि महत्त्वपूर्ण क्रॉस-बॉर्डर व्यवसाय झाले. गांधीनगरमधील आमच्या दुसऱ्या कार्यक्रमाने १२ हजाराहून अधिक उपस्थितांना आकर्षित केले, ज्यामुळे जागतिक व्यावसायिक संपर्क वाढला अशी माहिती सतीश भाई विठलानी यांनी दिली.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी पाच जणांना पोलीस कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी गोळीबार करणारा मुख्य आरोपी शिवकुमार गौतमसह पाच जणांना सोमवारी न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुंबई गुन्हे शाखा आणि उत्तरप्रदेश विशेष कृती दलाने रविवारी शिवकुमार आणि इतर चार जणांना उत्तर प्रदेशमधील बहराईच जिल्ह्यातील नानपारा येथून अटक केली. शिवकुमार याला आश्रय दिल्याप्रकरणी तसेच नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग या चौघांना अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेने आरोपीला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद पाटील यांच्यासमोर उपस्थित केले. या प्रकरणातील आर्थिक बाबी तसेच गुन्ह्यादरम्यान वापरण्यात आलेले शस्त्र कसे मिळवले, याची चौकशी करायची असून शिवकुमारला देण्यात आलेल्या पैशांचा स्रोतही तपासण्याची गरज आहे, असे सांगून पोलिसांनी न्यायालयाकडे त्याला पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी केली. आरोपीचे वकील अमित मिश्रा यांनी, शिवकुमार तपासात सहकार्य करत असल्याचा दावा केला. तसेच, अन्य चौघांवर केवळ शिवकुमारला आश्रय दिल्याचा आणि पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे, असा युक्तिवाद मिश्रा यांनी न्यायालयात केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या छातीवर दोन गोळ्या लागल्याने उपचारासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, दाखल करण्यापूर्वीच सिद्दिकी यांचा मृत्यू झाला होता.

मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत,

‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका मुंबई : मुंबईच्या विकासासाठी सर्वात आधी मुंबई महापालिकेची निवडणूक घ्यायला हवी. सर्वोच्च न्यायालय गेली दोन वर्षे फक्त तारखांवर तारखा देत आहे. प्रभागांची संख्या कितीही असू द्या आधी निवडणूक घ्या, कोणीही जिंकेल, पण निवडणूक झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली. आमचे सरकार आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला प्राधान्य असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबई महापालिकेला आणि महापौरांना अधिक अधिकार द्यायला हवेत. मुंबई महापालिकेवर नुसत्याच जबाबदाऱ्या नकोत, तर अधिकारही हवेत, असेही मत ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच एमएमआरडीएसारख्या जबाबदारी नसलेल्या प्राधिकरणांची मुंबईला आवश्यकता नसल्याचे मतही त्यांनी मांडले. ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल टाऊन हॉल’ अंतर्गत एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चगेटच्या इंडियन मर्चंट चेंबरमध्ये झालेल्या या चर्चासत्रात वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार खासदार मिलिंद देवरा सहभागी झाले होते. देवरा आणि ठाकरे यांच्यात लढत होणार असून हे दोघेही या चर्चासत्रात सहभागी झाले होते. पण उभय उमेदवार एकत्र आले नाहीत. देवरा यांनी आधी भूमिका मांडली. ते निघून गेल्यावर आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. मुंबईमध्ये महापालिकेव्यतिरिक्त १८ विविध प्राधिकरणे आहेत. मात्र नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महापालिकेलाच आणि महापौरांना अधिकार दिले पाहिजेत, असे मत यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईतील कोणत्याही गोष्टीची जबाबदारी महापालिकेवर टाकली जाते, पण त्या तुलनेत महापालिकेला अधिकार नाहीत, असे ते म्हणाले. धारावी प्रकल्पाला विरोध नाही धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतही ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. या प्रकल्पासाठी संबंधित कंपनीला धारावीची ५४० एकर जागा दिली आणि मुंबईतील विविध ठिकाणच्या जमिनीही दिल्या आहेत. तसेच अधिमूल्यातून सवलतीही दिल्या आहेत. जास्तीचे चटई क्षेत्रफळ निर्देशांक दिले आहे. त्यामुळे धारावीतील रहिवाशांची संख्या दुप्पट, तिप्पट वाढणार आहे. एवढ्या लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता मुंबईत आहे का, असाही सवाल त्यांनी केला.

शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक;

५० लाखांची मागितली होती खंडणी मुंबई : गेल्या महिन्यात माजी मंत्री बाब सिद्दिकी यांची हत्या झाल्यापासून अभिनेता सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशात काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खानलादेखील जीवे मारण्याची धमकी आली होती. आता या प्रकरणात कारवाई करत मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. गेल्या आठवड्यात वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करत शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी आरोपीने ५० लाखांची खंडणीही मागितली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुंबई पोलीसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी रायपूरला रवाना झाले होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीबाबतीची अधिकची कोणतीही माहिती उघड केलेली नाही. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी येण्यापूर्वी अभिनेता सलमान खानलदेखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशात २४ ऑक्टोबर रोजी बिश्नोई टोळीच्या नावाखाली सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी जमशेदपूरमधून अटक केली होती. या आरोपीने सलमानकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सलमान-शाहरुखची सुरुक्षा वाढवली या सर्व घडामोडींनंतर मुंबई पोलिसांनी दोन्ही अभिनेत्यांची सुरक्षा वाढवली आहे. एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सलमानच्या गॅलेक्सी या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले होते की, “ही सर्व योजना लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने आखली होती. १५ मार्च २०२४ रोजी पनवेलयेथे हत्यारं आल्यानंतर अनमोलने हल्लेखोरांना सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यास सांगितले होते. त्यानंतर अनमोलच्या सांगितल्याप्रमाणे सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या घटनेच्या कालावधीत हल्लेखोरांना तीन लाख रुपये देण्यात आले होते.”