नवी मुंबईकर रंगले हास्य संध्येत
नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणाला रंग चढू लागला असताना केजागर्ती अर्थात कोण जागे आहे? असे विचारून जागे करण्याची वेळ आली आहे. हाच धागा पकडून…
Mumbai news
नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणाला रंग चढू लागला असताना केजागर्ती अर्थात कोण जागे आहे? असे विचारून जागे करण्याची वेळ आली आहे. हाच धागा पकडून…
गणेश नाईकांच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक नवी मुंबई : नवी मुंबईत आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यात गणेश नाईक यांना आजवर यश आले होते. मात्र आता त्यांच्या राजकारणाला शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून आव्हान देण्यात येत आहे. भाजपाने गणेश नाईक यांना नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभेतून उमेदवारी दिली असली तरी शिवसेना शिंदे गटाने मात्र उमेदवारीला विरोध केल आहे. नवी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत गणेश नाईक नको असा धोशा लावत त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विरोधकांची ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठी कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे गणेश नाईक यांनीही आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना उत्तर देताना माझे सर्व विरोधक स्वर्गस्थ झाले, असे म्हटले. आता त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाला आहे. गणेश नाईक काय म्हणाले? “मागच्या वेळेला मी गाफील होतो. १९९९ ला मला फसवून हरवलं गेलं, हे सर्वांना माहीत आहे. पहिल्या फेरीत मला ७५०० मतांचे लीड मिळाले होते. माझ्या विरोधात कट रचणारे सर्व लोक स्वर्गस्थ झाले, एकही जिवंत उरला नाही. मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नसतं. परमेश्वराला सांगतो की, त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळण्यासाठी तुझ्याबरोबर त्यांना ठेव”, असे विधान भाजपाचे नेते गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केले. शिवसेना शिंदे गटाकडून विरोध गणेश नाईक यांच्या विधानानंतर नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विजय चौगुले यांनी म्हटले की, गणेश नाईक यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल सदर विधान काढले आहेत. तसेच वसंत डावखरे यांचाही उल्लेख गणेश नाईकांच्या त्या विधानात आहे. आनंद दिघे साहेबांचे फोटो लावून आम्ही मत मागतो. आनंद दिघे हे आमच्यासाठी दैवतासमान आहेत. जर गणेश नाईक यांना इतका माज आला असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही ऐरोलीमधील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याशेजारी जाहीर निषेध आंदोलन करू. नवी मुंबईत राजकीय संघर्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ऐरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना जेमतेम नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. बेलापूरच्या तुलनेत ऐरोली हा झोपडपट्टी, सिडकोची लहान घरे, माथाडी वसाहती, दाटीवाटीने वसलेल्या गावांचा मिळून बनलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दलीत, मुस्लिम, मराठी असा मतदारांचे प्रमाण बेलापूरच्या तुलनेत अधिक आहे. गणेश नाईक यांनी या मतदारसंघातून पाच वर्षांपुर्वी ८२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला खरा मात्र त्यावेळी त्यांना बऱ्यापैकी एकसंघ शिवसेनेची साथ मिळाली होती. नाईकांनीही त्यावेळी प्रचारात शिवसेनेचे स्थानिक नेत्यांना सोबत घेतले होते. मागील पाच वर्षात मात्र नाईक आणि त्यांच्या विरोधकांमधील दरी वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि नाईक यांच्यात विस्तवही जात नाही. याचे परिणाम येत्या निवडणुकीत काय दिसतात? याची आता चर्चा होत आहे. ००००
अशोक गायकवाड मुंबई : देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त वमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दोघांच्याही प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या दक्षता जागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला.
आठवले गटात मोठी अस्वस्थता स्वाती घोसाळकर मुंबई : भाजपाने आठवले गटाला तिकीट जरी दिले असले तरी पक्षाचे अस्तित्व मान्य न करता भाजपाच्या कमळावर निवडणूक लढविण्यास सांगितल्यामुळे आरपीआय आठवले गटात अस्वस्थता आहे. त्यात…
मुंबई : ऐन निवडणुकीच्या काळात मुंबई पोलीस दलातील २४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सलग आठ वर्षापेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायदा…
राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला मुंबई: माहीम मतदार संघातून अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनीही अर्ज भरलाय. त्यानंतर या दोन्ही पक्षात शाब्दीक चकमकी…
सुप्रसिद्ध रांगोळीकार पंकज पाटील, शैलेंद्र पाटील, करण, अभिनय यांनी दीपावलीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांची रांगोळी हुबेहुब चितारीत केली. आपलेच प्रतिबिंब रांगोळीत पाहून हरखून गेलेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन येथील कार्यालयामध्ये महाराष्ट्र काँग्रेस तर्फे आज “भ्रष्टयुती महाराष्ट्राची दुर्गती” हे बुकलेट आणि “यंदा पंजा” हे प्रचारगीत महाराष्ट्राचे प्रभारी आ. श्री. रमेश चेन्निथला यांच्या…
सरवणकारांचा राज ठाकरेंवर ‘व्टिटर वार’ मंबई : बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर – माहिम मधे राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते, त्यांचे स्मरण करा अशी थेट व्टिटरवरून विनंती करत सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंवर व्टिटर वार केला आहे. एकनाथ शिंदे साहबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैकनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या, असं सदा सरवणकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( व्टिटर) वर एक पोस्ट करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करत सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंना विनंती केली आहे. सदा सरवणकर यांनी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखला देत सरवणकर यांनी हे आवाहन केलं. सदा सरवणकर म्हणाले, मी चाळीस वर्षापासून शिवसेनचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहीमचा आमदार झालो. या मतदारसंघासाठी 30 वर्ष काम करतोय, या मतदारांशी जिव्हाळ्याचं नातं बनलं आहे. इथल्या मतदारांशी आईचं नातं आहे, ते तोडू नये, अशी विनंती आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी तीन वेळा निवडून आलेल्या खासदार मुलाला मंत्री न करता निष्ठावंत शिवसैनिकाला संधी दिली. तशीच भूमिका राज ठाकरेंनी घ्यावी, असं सदा सरवणकर म्हणाले. सर्वसामान्य शिवसैनिकाला आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती करतो,असं सरवणकर म्हणाले. मतदारांच्या आग्रहामुळं या ठिकाणाहून…
सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धा मुंबई : सेनहोरा डिसूझा आणि शुभम आंब्रेने सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत महिला आणि पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. पार्थ मगर हा १७ आणि १९ वर्षांखालील गटात अजिंक्य राहिला. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) टेबलटेनिस हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सेनहोराने मानसी चिपळूणकरवर सरळ गेममध्ये १३-११, ११-६, ११-८ अशी मात केली. पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये शुभम आंब्रेने पार्थ मगरचे आव्हान पिछाडीवरून ५-११, ११-२, ११-७, ११-५ असे मोडीत काढले. पार्थ मगरने १७ आणि १९ वर्षांखालील मुले गटामध्ये बाजी मारली. दोन्ही गटात आदित्य दलाल हाच त्याचा प्रतिस्पर्धी होता. १७ वर्षांखालील मुले गटाच्या अंतिम फेरीत पहिला गेम हरूनही 9-11, 11-7, 12-10, 13-11 असा विजय मिळवला. १९ वर्षांखालील गटात पार्थला ११-७, ११-४, ११-७ असे सहज पराभूत केले. १७ आणि १९ वर्षांखालील मुली गटामध्ये मुग्धा देसाई आणि अंशिता ताम्हणकर आमनेसामने होत्या. त्यात १७ वर्षांखालील मुली गटात मुग्धाने अंशिता ताम्हणकरवर पिछाडीवरून 9-11, 11-8, 11-7, 11-6 अशी मात केली. १९ वर्षांखालील मुली गटामध्ये अंशिता ताम्हणकरने मुग्धा देसाईला चुरशीच्या लढतीत 11-6, 9-11, 10-12, 12-10, 11-8 असे हरवत पराभवाचा बदला घेतला. निकाल: (अंतिम फेरी) – १७ वर्षांखालील मुली: मुग्धा देसाई विजयी वि. अंशिता ताम्हणकर 9-11, 11-8, 11-7, 11-6; मुले: पार्थ मगर विजयी वि. आदित्य दलाल 9-11, 11-7, 12-10, 13-11. १९ वर्षांखालील मुली: अंशिता ताम्हणकर विजयी वि. मुग्धा देसाई 11-6, 9-11, 10-12, 12-10, 11-8. मुले: पार्थ मगर विजयी वि. आदित्य दलाल ११-७, ११-४, ११-७.…