Category: मुंबई

Mumbai news

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट भामाच्या प्रिती अय्यरचे नाबाद शतक

यजमान स्पोर्टिंग युनियन, भामा सी.सी. विजयी मुंबई : सलामीच्या प्रिती अय्यरचे फटकेबाज शतक आणि तिने आयुषी इंदुलकर (२६) आणि अंजू सिंग (नाबाद ६७) यांच्यासह केलेल्या अनुक्रमे १०० आणि ११५ धावांच्या भागिदाऱ्या यामुळे भामा क्रिकेट क्लबला ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये जे भाटिय़ा क्रिकेट क्लबवर १३२ धावांनी मोठा विजय प्राप्त करता आला. स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या अन्य एका साखळी लढतीमध्ये यजमान स्पोर्टिंग युनियनने देखील ५ विकेटसनी महाराष्ट्र यंगला पराभूत केले. त्यांच्या या विजयामध्ये सलामीच्या प्रांजल मयेकर (५५) हिची महत्वपूर्ण भूमिका होती. प्रितीच्या झंझावाता पुढे हतबल झालेल्या जे. भाटिया संघाला प्रतिस्पर्ध्यांच्या एक बाद २१५ या प्रचंड धावसंख्येला केवळ ९ बाद ८३ असे प्रतिउत्तर देता आले. प्रितीने ७२ चेंडूमध्ये नाबाद ११५ धावांच्या खेळीमध्ये १७ चौकार आणि ३ षटकार होते. अंजू सिंगने भाटियाच्या जखमांवर मीठ चोळताना केवळ २९ चेंडूत ६७ धावा फटकावताना ६ चौकार आणि ५ षटकारांची बरसात केली. अंजूने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना १२ धावात २ बळीही देखील घेतले. कर्णधार सानया जोशी नाबाद ५२ हिच्या खेळीमुळे महाराष्ट्र यंगला ७ बाद १२१ अशी माफक धावसंख्या रचता आली. स्पोर्टिंगला ध्रुवी पटेल (३०) प्रांजल यांनी ८६ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर १०५ धावांवर दुसरी विकेट गमावण्या पाठोपाठ त्यांनी आणखी तीन विकेट गमावत काहीश्या तणावाखाली आपले लक्ष १८व्या षटकात पार केले. आज माटुंगा जिमखाना येथे मुंबई क्रिकेटचे मानद सचिव अभय हड़प यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी अविसा आणि “एसजी”चे विजय कुमार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संक्षिप्त धावफलक महाराष्ट्र यंग २० षटकात ७ बाद १२१ धावा (जयनी शाह २३, सानया जोशी नाबाद ५२, गगना मुल्का १५ धावात ३ बळी, तन्वी चव्हाण २० धावात २ बळी) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग युनियन १७.५ षटकात १२२ धावा (ध्रुवी पटेल ३०, प्रांजल मयेकर ५५, अनन्या अय्यर २८ धावात २ बळी, जैनी शाह १९ धावात २ बळी) सर्वोत्तम प्रांजल मयेकर भामा सी. सी. २० षटकात १ बाद २१५ धावा (प्रीती अय्यर नाबाद ११५, आयुषी इंदुलकर २६, अंजू सिंग नाबाद ६७) विजयी विरुद्ध जे. भाटिया सी. सी. २० षटकात ९ बाद ८३ (इशा शाह २१, सौम्या पान्डे २३ धावात २ बळी, अंजू सिंग १२ धावात २ बळी, चांदनी कनुजिया १० धावात ३ बळी) सामन्यात सर्वोत्तम प्रिती अय्यर. 00000

ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने विजेतेपद राखले

मुंबई : ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने स्पोर्ट्स फिल्डचे ११८ धावांचे आव्हान तब्बल ६ गडी आणि १७ चेंडू राखून पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या बाळकृष्ण बापट स्मृती…

१६ वर्षाखालील गटात लोबो फेरडीनने मारली बाजी

चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा   मुंबई : ओढ हिरवळी आणि माझगाव येथील सर एली कदुरी शाळेतर्फ विविध वयोगटासाठी चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात १६ वर्षाखालील वयोगटात लोबो फेरडीनने ४.५…

नवी मुंबई सानपाडा येथे मराठा समाजाचा वधू वर मेळावा संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने ११ जानेवारी रोजी केमिस्ट भवन येथे १५ वा मराठा समाजाचा वधु- वर परिचय मेळावा संपन्न झाला, अशी माहिती मराठा…

संविधान अमृत महोत्सव साजरा 

 कल्याणमध्ये वकील संघटनांच्या वतीने कल्याण :  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा गजानन चव्हाण यांच्या प्रयत्नातून कल्याण येथे दिवाणी वकील संघटना, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना कल्याण, उल्हासनगर वकील संघटना, मुरबाड…

कल्याण, डोंबिवलीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या सहा दुकानदारांवर कारवाई

कल्याण : मकरसंक्रातीनिमित्त बाजारात पतंग आणि मांजा विक्रीची झुंबड आहे. शासनाने हा आनंद घेत असताना नायलॉन मांजा, चिनी, प्लास्टिक कृत्रिम मांजा यांचा वापर पतंग उडविण्यासाठी करू नये असे आदेश दिले…

 माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त

 दोन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ कल्याण : ऑल इंडिया केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त २ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कल्याण पूर्व विजयनगर परिसरात करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेले तीन वर्षे प्रशासकीय राजवट सुरू असून नगरसेवकांना जनतेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने, शिवसेना नगरसेविका माधुरी प्रशांत, शिवसेना संपर्कप्रमुख, निरीक्षक कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख  प्रशांत काळे  यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनात परिस्थिती आणून जनतेच्या विकास कामासाठी 2 कोटी  निधी उपलब्ध करून आणला.  त्यातील बहुतांशी कामे पूर्ण होऊन त्याचे रविवारी स्थानिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रशांत काळे आणि माधुरी काळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. पोहच रस्ता, पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रीट रस्ते, पाणी योजना अश्या अनेक केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. याबाबत प्रशांत काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानून, आपल्या पाठीशी उभे राहणारे नागरिक यांच्यासाठी आपण सदैव विकास कामांसाठी बांधील असल्याचे सांगितले. यावेळेस शिवसेनेचे विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर, संतोष साळवी, अनंत आंब्रे, विभाग संघटक प्रशांत मांजरेकर, दिलीप कोल्हे, विशाल विरा, विभाग समन्वयक महेंद एटमे, उपविभाग प्रमुख संभाजी माने, भगवान सोंडकर, शाखाप्रमुख विशाल वाघमारे, प्रदीप तांबे, उपशाखाप्रमुख विकास गुरव, अतुल वाघमारे, सुरेंद्र मोरे, प्रमोद लाड, अमर मलाह, नंदकिशोर सुरकुतवार, राजाराम पठारे, साहेबराव आहिरे आणि मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. 00000

 ठाणे व डोंबिवली परिक्षेत्रामध्ये 22 ठिकाणी भक्तीपर्व समागम संपन्न

परमात्म्याशी एकरुपता हाच खऱ्या भक्तीचा आधार – निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज कल्याण : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात रविवारी भक्ती पर्वाचे आयोजन करण्यात आले. भक्ती पर्व संत समागमाचा मुख्य कार्यक्रम सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे संपन्न झाला. भक्तीपर्वाच्या निमित्ताने ठाणे शहर आणि कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापुर परिसरामध्ये एकंदर 22 ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने स्थानिक भक्तगणांनी भाग घेतला. समालखा येथील भक्तीपर्व संत समागमामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना प्रतिपादन केले, की “भक्ती अशी अवस्था आहे जी जीवनाला दिव्यत्व आणि आनंदाने ओतप्रोत करते. हा इच्छापुर्तीचा सौदा नाही किंवा स्वार्थाचे माध्यमही नाही. खऱ्या भक्तीचा अर्थ आहे परमात्म्याशी गहिरे नाते आणि निःस्वार्थ प्रेम।” याप्रसंगी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात श्रद्धा व भक्तिची अनुपम छटा पहायला मिळाली. दिल्ली, एन.सी.आर.सहित देश-विदेशातील हजारों भाविक-भक्तगणांनी या दिव्य समागमामध्ये भाग घेऊन आध्यात्मिक आनंदाची  दिव्य अनुभूती प्राप्त केली. इस पावन प्रसंगी महान संत सन्तोखसिंहजी यांच्यासह अनेक संतांच्या तप, त्याग आणि ब्रह्मज्ञानाच्या प्रचार-प्रसारामधील त्यांच्या अमूल्य योगदानांचे स्मरण केले गेले आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यात आली. समागमा दरम्यान अनेक वक्ते, कवी व गीतकारांनी विभिन्न माध्यमातून गुरुचा महिमा आणि भक्तीभावनेचे सारगर्भित वर्ण केले आणि संतांच्या प्रेरणादायी शिकवणूकीतून भाविकांच्या जीवनातील आध्यात्मिक दृष्टीकोन समृद्ध केला. सतगुरु माताजींनी माता सविंदरजी आणि निरंकारी राजमाताजी यांचे जीवन भक्ती आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे सांगून या दिव्य विभूतींचे जीवन हे भक्ती आणि सेवा यांचे श्रेष्ठ उदाहरण असल्याचे सांगितले. निरंकारी मिशनचा मूळ सिद्धांत हाच आहे, की भक्ती ही परमात्म तत्वाला जाणूनच सार्थक रूप घेऊ शकते. निःसंदेह सतगुरु माताजींच्या अमूल्य प्रवचनांनी भाविक भक्तगणांना जीवनात ब्रह्मज्ञानाद्वारे भक्तीचे वास्तविक महत्व समजण्याची आणि अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.

महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा कऱण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या नाविन्यपूर्ण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल महावितरण आणि एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीला शनिवारी बेळगाव येथे आयपीपीएआय…

 ज्योती म्हापसेकर यांना ‘एकता जीवन गौरव’ पुरस्कार’

डॉ. श्यामल गरुड, जादीश भोवड यांचाही होणार सन्मान मुंबई : मुंबई एकता कल्चर संस्थेतर्फे देण्यात येणारे 2024 –  25 च्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात नाटककार तसेच स्त्री मुक्ती चळवळीच्या सक्षम योगदानाबद्दल ज्योती म्हापसेकर यांना या वर्षीचा एकता जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखिका डॉ. शामल गरुड, कवयित्री डॉ. योगिता राजकर, नंदलाल रेळे, कवी गीतेश शिंदे, पत्रकार जगदीश भोवड तसेच दिनेश राणे, आनंद खरात यांचाही पुरस्कार प्राप्त नामवंतांमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ कवी अजय कांडर,  स्त्री मुक्ती चळवळीतील कार्यकर्त्या, कवयित्री योगिनी राऊळ आणि पत्रकार – कवी भगवान निळे यांच्या निवड समितीने यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची एकमताने निवड केली आहे. 18 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव येथील साहित्य संघात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सर्व पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली. एकता कल्चर पुरस्कार सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे – ‘स्त्री मुक्ती चळवळीतील’ मान्यवर नेत्या ज्योती म्हापसेकर – (एकता जीवन गौरव पुरस्कार), नंदलाल रेळे – ध्वनी संकलन- उज्जय आंबेकर पुरस्कृत मधु आंबेकर स्मरणार्थ नटवर्य (भालचंद्र पेंढारकर स्मृती पुरस्कार), योगिता राजकर – साहित्य- कवी प्रकाश गणपत जाधव पुरस्कृत गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ (नारायण सुर्वे स्मृति पुरस्कार कविता संग्रह – बाईपण ),  डॉ. शामल गरुड – साहित्य- (रजनी परुळेकर स्मृती विशेष पुरस्कार), नारायण गिरप – साहित्य – राजेश जाधव पुरस्कृत (काशिनाथ गणपत बेनकर स्मरणार्थ नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्कार) ॲड. प्रियांका संदीप संगारे – विधि- मनोज संसारे स्मरणार्थ (संत जनाबाई स्मृती पुरस्कार), मनोज मस्के – नृत्य नीलांबरी उज्जय आंबेकर पुरस्कृत सहदेव बाबाजी लोखंडे स्मरणार्थ (सुबल सरकार स्मृती पुरस्कार), अनुजा कासारे -शैक्षणिक – पल्लवी शिंदे माने पुरस्कृत कांचन रघुनाथ शिंदे स्मरणार्थ (सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार), सुधाकर कदम – संगीत (पंडित कुमार गंधर्व स्मृति पुरस्कार), गीतेश शिंदे -प्रकाशक- रजनी संदीप बेनकर पुरस्कृत (यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार), जगदीश भोवड – पत्रकारिता – वैशाली बाळाराम कासारे स्मणार्थ (जयंत पवार स्मृती पुरस्कार), डॉ. रश्मीन केनिया-वैद्यकीय (डॉ. नितू मांडके स्मृती पुरस्कार) आदींना पुरस्कार घोषित करण्यात आले असून समाजसेवेचे पुरस्कार सर्वश्री आनंद खरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, दिनेश राणे -प्रकाश पाटील पुरस्कृत महात्मा (ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार), विजय भगते –  रमेश गणपत जाधव स्मरणार्थ (बाबा आमटे स्मृती पुरस्कार), विद्या दयानंद काट्रे – प्रियंका प्रकाश जाधव पुरस्कृत सुनंदा गणपत जाधव स्मरणार्थ (रमाबाई आंबेडकर स्मृती पुरस्कार), प्रकाश सोनावणे-नितीन कांबळे पुरस्कृत चंद्रमणी भिकाजी कांबळे स्मरणार्थ (संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार), किसन पेडणेकर – (सिंधुताई सपकाळ स्मृती पुरस्कार), अरुण सबनीस- गंगाधर म्हात्रे पुरस्कृत  जनार्धन म्हात्रे स्मरणार्थ (बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार), शरद जाधव- (भंन्ते महाथेरो स्मृती पुरस्कार), डॉ. अरुण भगत- (स्वामी विवेकानंद स्मुर्ती पुरस्कार) यांना जाहीर करण्यात आले. ‘एकता महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’चे सल्लागार व ‘ऑस्कर अकादमीच्या निवड समितीतील ज्युरी उज्वल निरगुडकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण शनिवार ,१८ जानेवारी सायंकाळी ४:०० वाजता गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात एकता महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार व पारितोषिके वितरण समारंभ संपन्न होणार आहे अशीही माहिती एकताचे उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, एकताचे सचिव प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.