Category: मुंबई

Mumbai news

 पनवेलमध्ये ८ ऑगस्टला ‘महारोजगार मेळावा २०२६’

दहावीपासून पदव्युत्तर व कुशल उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल : रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या व विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या वतीने ‘महारोजगार मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट  सकाळी ९ वाजता चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे होणार आहे.या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविध कौशल्ये असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध नामांकित कंपन्या व उद्योग या मेळाव्यात सहभागी होणार असून, उमेदवारांना थेट रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबरच जॉब इंटरव्ह्यू, करिअरच्या संधी आणि उत्तम नेटवर्किंग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. रोजगाराच्या संधींच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असून, ‘रोजगार शोधणाऱ्यांना सुवर्णसंधी’ या उद्देशाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, जाहिरातीतील क्यूआर कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून उमेदवार नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी ७४९८०७४१०५ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन युवकांनी आपल्या भविष्याची दिशा निश्चित करावी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 0

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचा गौरव

अशोक गायकवाड कर्जत : महसूल दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व महसूल दिन’ कार्यक्रमात कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन २०२५-२६ या महसूली वर्षात शासनाच्या धोरणे व उद्दिष्टांनुसार अत्युत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तिपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेंद्र दळवी, विक्रांत पाटील तसेच सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि कृषी सभापती वैकुंठ पाटील उपस्थितीत होते . प्रशासनाच्या वतीने कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, महसूल अपर आयुक्त वैशाली उंटवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदुलकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००००००

रहिवाश्यांच्या पुनर्विकासाबाबत सचिन लोंढे आक्रमक

रमेश औताडे मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिव सुदर्शन गृहनिर्माण संस्थेच्या ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुनर्वसन प्रकल्पाबाबत अखेर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. ओमकार बिल्डर्सवर रहिवाशांचे तब्बल १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून, हे थकीत भाडे तात्काळ मिळावे आणि रहिवाशांचे पुनर्वसन व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोगेश्वरी तालुकाध्यक्ष सचिन लोंढे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा केला. या रखडलेल्या प्रकल्पाबाबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नगरसेवक अजितदादा रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर हेदेखील उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार बिल्डर्सकडे सुमारे १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून यावर आता कडक कारवाई केली जाणार आहे.

मोहनेमध्ये मुदत संपलेल्या औषधांचा ढीग

कल्याण : कल्याण नजीक आंबिवली मधील मोहने परिसरातील यादव नगर स्मशानभूमीजवळ उल्हास नदीकाठी  तारीख संपलेल्या औषधांचा ढीग आढळून आला आहे. त्यामुळे  नदी किनाऱ्याच्या आणि परिसराच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.…

 मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी

 एका बाजूला पाणीटंचाई, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शुद्ध पाणी वाया कल्याण: कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना, दुसरीकडे केडीएमसीच्या टिटवाळा येथील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात गळती, तांत्रिक बिघाड आणि देखभालीअभावी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे शहरातील अनेक भागांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे जलशुद्धीकरण केंद्रातूनच शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक नैसर्गिक संसाधनाची होणारी ही नासाडी तातडीने थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोहिली केंद्रातील गळती व तांत्रिक समस्या त्वरित दूर करून नियमित देखभाल आणि देखरेख व्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे. 0000

 उसाटणे गावात सराईत आरोपींची गुंडगिरी

 वाहनांचा ताफा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल कल्याण : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटणे परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. गंभीर…

स्वच्छता दूत फाउंडेशनतर्फे सफाई कामगारांना साहित्य वाटप

रमेश औताडे मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दूत फाउंडेशन व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कामगारांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मेंटॉर व डी आय सी सी आय च्या महिला विभागाच्या सदस्या सीमा कांबळे म्हणाल्या की, “स्वच्छता दूत फाउंडेशन गेल्या वीस वर्षांपासून सफाई कामगारांना न्याय मिळवून देत आहे.फाउंडेशनच्या समन्वयक मैत्रयी कांबळे यांनी सांगितले की, प्रशिक्षक पाखरे यांच्या फाउंडेशनने प्रशिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी दिल्या आहेत. काही खासगी कंपन्या सफाई कामगारांच्या प्रशिक्षणासाठी सुमारे ४० हजार रुपये शुल्क आकारतात. मात्र, स्वच्छता दूत फाउंडेशन हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत देत आहे. रत्नमाला राजगिरे, माया साबळे, रिबेका पाखरे, पल्लवी पाखरे, हबीब खान, लता गायकवाड, रामचंद्र गायकवाड यांच्यासह सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

 पीठासीन अधिकाऱ्यांचे अधिकारी वर्गाने मानले आभार मुंबई, दि.  (प्रतिनिधी) :महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ३ ऑगस्ट रोजी पदोन्नतीचे आदेश रवाना झाले असून अधिकारी वर्गाने त्याबद्दल पीठासीन अधिकारी तसेच सचिव यांच्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. पदोन्नती प्राप्त झालेल्या १८ अधिकाऱ्यांची नांवे आणि पदोन्नतीचे पद पुढील प्रमाणे आहे. पदोन्नतीनुसार उपसचिव पदाकरिता सीमा तांबे, पुष्पा दळवी आणि घननीळ देबडवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अवर सचिव पदाकरिता विनोद राठोड, कैलास पाझारे, जयश्री म्हात्रे, जीवन गावकर, पवन म्हात्रे आणि नेहा कोठारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अवर सचिव (समिती) पदासाठी नितीन अहेर, रविंद्र मेस्त्री आणि अलका पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय कक्ष अधिकारी पदावर जान्हवी गमरे, दिनेश तरे, संतोष सुद्रिक, ज्योती कामतेकर, शुभांगी जगे आणि शितल मोरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.काल संध्याकाळी याबाबतचे आदेश विधान मंडळ सचिवालय, आस्थापना विभाग यांच्या मार्फत जारी करण्यात आले. ०००००

मिरा -भाईंदर मेट्रोच्या अखेरच्या टप्प्याची चाचणी सुरू

मिरा -भाईंदर: मिरा – भाईंदरच्या जनतेसाठी आनंदाची बातमी आली असून काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान या अखेरच्या टप्प्याची मेट्रो चाचणी सुरू झाली आहे.  मिरा -भाईंदर शहरातून मुंबईच्या दिशेने लवकरच मेट्रोला सुरुवात…

नवनिर्वाचित महाराष्ट्र शासन महसूल, नोंदणी व मुद्रांक विभाग, सह दुय्यम निबंधक कर्जत-१, जिल्हा- रायगड, भरत सूर्यवंशी यांचे, दैनिक बित्तंबातमीचे मुंबई, कोकण प्रतिनिधी अशोक गायकवाड यांनी सोमवारी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत…