प्रशांत – अंबिका- हेमंत विजयी
मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा प्रशांत – अंबिका- हेमंत विजयी मुंबई जिल्हा कॅरम संघटना आयोजित भारतीय आयुर्वीमा महामंडळ, ओ एन जी सी व हिंदुस्थान पेट्रोलियम पुरस्कृत ३३ व्या वरिष्ठ मुंबई…
Mumbai news
मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा प्रशांत – अंबिका- हेमंत विजयी मुंबई जिल्हा कॅरम संघटना आयोजित भारतीय आयुर्वीमा महामंडळ, ओ एन जी सी व हिंदुस्थान पेट्रोलियम पुरस्कृत ३३ व्या वरिष्ठ मुंबई…
मेट्रो- ४ च्या स्लॅब दुर्घटनेप्रकरणी अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रावर कारवाई कधी करणार? खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल मुंबई : मेट्रो ४ चा मुलुंड भागातील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला तर…
सानपाडा येथे भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथील सेक्टर ११ मध्ये भक्ती रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा जवळ भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच प्रभाग १९च्या नवनिर्वाचित नगरसेविका शैला पाटील, शिल्पा ठाकूर, नगरसेवक भाऊ भापकर, सुनील कुरकुटे, समाजसेवक अजय पवार, श्री तानाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, नगरसेविका कोमलताई वास्कर, प्रभाग क्रमांक २२चे नगरसेवक अभिजीत देसाई, समाजसेवक मिलिंद सूर्याराव, शुभांगी सूर्याराव, समाजसेवक गणेश पावगे, सानपाडा ७.५०गार्डन ग्रुपचे रणवीर पाटील, दत्तात्रय कुरळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, चिटणीस जगदीश एकावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे, संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, सह खजिनदार सुभाष बारवाल, उपाध्यक्षा डॉ. विजया गोसावी, हास्य क्लब गार्डन ग्रुप ६.३० चे भरत खरात, गार्डन ग्रुप ७.०५ चे जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा टोपी, रुमाल आणि तुलसीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. नगरसेवक भाऊ भापकर आणि समाजसेवक अजय पवार यांनी विश्वासराव कुटुंबियांच्या विजया इंटरप्राईजेस यांच्यातर्फे महाराष्ट्र सरकार आणि खाजगी सेवा एकाच ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या सेवाभावी कार्याला शुभेच्छा दिल्या.
दिव्यांग मुलीचे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण मुंबई / रमेश औताडे नागपूर येथील दिव्यांग मुलगी कु. मानवता ऊर्फ बेशिका रवीकांत डोंगरे हिला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवार १६ फेब्रुवारी पासून हे आंदोलन सुरू झाले असून विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. “निर्णय झाल्याशिवाय माघार नाही, जिंकलो नाही तर कधीच नाही,” असा निर्धार व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनस्थळी मानवता हिने हातात आपल्या नातेवाईकाचा फोटो धरून न्यायाची मागणी केली. प्रशासनाने संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे पाहावे, अशी मागणी केली. आझाद मैदानावरील या उपोषणामुळे पुन्हा एकदा दिव्यांगांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
घरांसाठी १४ कामगार संघटनांच्या वतीने येत्या १० मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा! मुंबई -घराच्या प्रश्नावर सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने निराश झालेल्या कामगारांमध्ये आता कमालीचा असंतोष उफाळून आला…
“एमएमआरडीए”चा अधिशेष अर्थसंकल्प स्लग- ४८,०७२.५७ कोटींचा आराखडा O आर्थिक परिवर्तन आणि पायाभूत सुविधांना गती O प्रकल्पांसाठी ८७% भरघोस तरतूद मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आज सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रुपये ४८,०७२.५७ कोटींचा अधिशेष अर्थसंकल्प सादर केला…
म्हाडाच्या मुंबईतील ११८ सदनिकेसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ११८ सदनिकांची विक्री जाहीर करण्यात आली आहे.…
सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा येत्या २६ फेब्रुवारीला होणार शिक्कामोर्तब राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय स्वाती घोसाळकर मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार आहे. आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…
माझी जीभ खुशाल कापा पण, भाजपाला एक्सपोज करणारच काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचे भाजपाला चँलेंज मुंबई : अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, भाजपाचा पर्दाफाश करतच राहणार असे चँलेंजच आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला २ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकर्यांचे अमेरिकेतून होणार्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल, चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा. सपकाळ पुढे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची किर्ती महान आहे, चंद्र जसा वाढत जातो तशीच महाराजांची किर्ती आणखी वाढत जावी, याबाबत दुमत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाने माझ्या विधानाचा “ध” चा “मा” करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, यामागचे कारस्थान समजून घेतले पाहिजे. एपस्टिन फाईल्समध्ये बरंच काही दडलेलं आहे, त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करणे हा एक भाग आहे तर अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्थ होणार आहे, महाराष्ट्रातही अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यावर भाजपा सरकारकडे उत्तर नाही म्हणून या प्रश्नांवर भाजपाला पडदा टाकायचा आहे, यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
अजित पवारांच्या अपघातग्र्स विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ? मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीतून दरदिवशी संशयास्पद घटना उघडकीस येत आहेत. आता अजित पवारांच्या अपघातग्र्स्त विमानातील ब्लॅकबॉक्स बंद होता अशी माहिती पुढे येत आहे. विमानातील तांत्रिक अडचणींची माहिती देणाऱ्या ब्लॅक बॉक्सबाबतही अनेक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असल्याचा दावा काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. तसंच, तपासणीसाठी हे ब्लॅक बॉक्स आता विदेशात पाठवला जाणार आहे, असंही म्हटलं जातंय. दरम्यान, यावर रोहित पवारांनीही आता शंका उपस्थित केलीय. ते म्हणाले, “ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. अतुल लोंढे म्हणतात त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स बंद केला असेल तर खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून आता एक कारण लोकांमध्ये पेरलं जात आहे. ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. पण ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे चौकशी करता येत नसेल तर मी म्हणतोय त्याप्रमाणे हा अपघात नव्हता, हा घातच होता हे क्लिअर होईल.”