Category: मुंबई

Mumbai news

Heading – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली मॅरेथॉन स्पर्धा मार्गाची पाहणी

 स्पर्धा मार्गावरील आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनास सूचना ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २०२६ येत्या ३० ऑगस्टला उत्साहात पार पडणार असून या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण मॅरेथॉन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली व स्पर्धा मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरूस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. या पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, नगरसेविका एकता भोईर, संध्या मोरे, विजया लासे, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे तसेच स्पर्धा मार्गावरील कार्यकारी अभियंता] ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सहसचिव राजेंद्र मयेकर, एकनाथ पोवळे आदी उपस्थित होते. मॅरेथॉनची सुरुवात ठाणे महापालिका भवन येथून होणार असून, महापौरांनी या प्रारंभस्थळाचीही पाहणी केली. यानंतर महापालिका भवन, नितीन कंपनी सर्व्हिस रोड, रोड क्रमांक १६, रोड क्रमांक २२, इंदिरानगर, वर्तकनगर, उपवन मार्ग, पोखरण रोड क्रमांक २, टिकूजीनीवाडी, उथळसर आणि कळवा या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी करण्यात आली. प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सुविधा, वाहतूक नियंत्रण, रस्त्यांची गुणवत्ता आणि स्पर्धकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील बाबींची तपासणी करण्यात आली. महापौरांनी स्पर्धा मार्गावरील रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. नितिन कंपनी सर्व्हिस रोड येथे जी कामे सुरू आहेत ती स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा संपेपर्यत बंद ठेवण्याबाबत संबंधित प्राधिकरणाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या.  तसेच स्पर्धेच्या दिवशी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्याच्या कडेला  उभी असलेली वाहने हटवून मार्ग  पूर्णपणे मोकळा ठेवण्याच्या सूचना वाहतूक विभागाला देण्यात आल्या यावेळी स्पर्धा मार्गालगत झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटून मार्ग मोकळा ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. तसेच वाहतूक पोलिसांनी स्पर्धेच्या दिवशी प्रभावी वाहतूक नियोजन करून मॅरेथॉन मार्ग निर्बध ठेवावा, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिल्या. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

शहरातील ११७ अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्सवर महापालिकेची कारवाई

ठाणे (०३) : ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागामार्फत शहरात अनधिकृत पोस्टर्स व बॅनर्सविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत १ ते ३ ऑगस्ट २०२६ या तीन दिवसात विविध प्रभागसमिती हद्दीत…

मामाने मेहुणी सोबत लग्न लावून देण्यास नकार दिल्याने भाच्याने केले मामाच्याच मुलाचे अपहरण

 डोंबिवलीत बंद रिक्षात बाळाला सोडून भाचा फरार, कल्याण : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुंबई आणि डोंबिवलीत समोर आली आहे. मामाने लग्नाला विरोध करून सोयरिक मोडल्याच्या रागातून एका मूकबधिर…

कल्याण डोंबिवली नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात

शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्यांची चलती  मनपा प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव नसणारयांची खोगीर भरती    कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाचा नगररचना विभाग या ना त्या कारणाने वादाच्या भोवर्यात सापडत असल्याचा प्रत्यय पुनश्च आला आहे. तीन वर्ष सहाय्यक नगररचनाकार पदावर काम केलेल्या प्रतिनियुक्तीवर आलेला अधिकारी पुनश्च या महापालिकेत नगररचनाकार पदावर नेमणूक करण्यात आल्याने त्यांची सहाय्यक नगररचनाकार म्हणून ढिसाळ कामगिरी पाहता, नगररचनाकार पदावर नेमणूक कशी कोणाच्या अशिवार्दाने झाली. या मागचा सूत्रधार कोण, अशा आरोपाच्या चर्चा महापालिका वुर्तळात रंगल्या असल्याने नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पालिका वुर्तळात संचालक नगरचना संतोष डोईफोडे, सहाय्यक नगररचनाकार स्वप्नील दळवी यांची भ्रष्टाचाराची रात्रीस खेळ चाले ही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.  यांची खमंग चर्चा पालिका वुर्तळात धुमाकूळ घालत असताना स्वप्नील दळवी हे मागील तीन वर्ष सहाय्यक नगररचनाकार म्हणून केडीएमसीत कार्यरत होते. मागील तीन वर्षातील त्यांची सुमार कामगिरी पाहता, मनपाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी कोणतेही भरीव कामगिरी केली नाही, तरी देखील त्यांची बदली पुन्हा मनपात करण्यात आली आहे. यामध्ये  त्यांची मागणी मनपाने केलेली नसताना पुन्हा त्यांची वर्णी नगररचनाकार म्हणून नेमणूक होते.  यामागे संचालक नगररचना डोईफोडे यांचा अदृश्य हात आहे का असा गंभीर आरोप जाणकारांकडून होत आहे.  महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मनपा आयुक्त, सर्व साधरण सभेला असताना, मनपाच्या प्रशासकीय सेवेमध्ये दळवीसाठी  अशी मागणी संचालक नगररचना यांचेकडे कोणी केली   याबाबत संपूर्ण चौकशीपुर्ण होईपर्यंत दळवी यांना महापालिका सेवेमध्ये हजर करून घेण्यात येऊ नये अशी मागणी होत आहे. डोईफोडे यांनी जर दळवी यांच्यासाठी मागणी केली असेल तर डोईफोडे यांना परत शासनाकडे पाठविण्यात यावे,अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे. केडीएमसी  नगररचना विभाग संचालक नगररचना संतोष डोईफोडे अकार्यक्षम असल्याच्या चर्चा होत आहेत. डोईफोडे यांचे सुरू असलेल्या कार्यकाळात मनपाचे नगररचना विभागाचे अर्थिक उद्दिष्ट २०० कोटींनी घसरले. वास्तु शिल्पकार व विकासक यांचे प्रस्ताव विहित कालावधीत मंजूर न झालेबाबत तक्रारी, बाह्यवळण रस्ता अथवा आरक्षणाच्या,भुसंपादनात दुर्लक्ष केल्यामुळे शहाराचा विकास भकास, मनपाच्या पैशाची उधळपट्टी सुमारे २५ कोटीची कामे ठाण्याच्या एकाच संस्थेस दिली. त्यांच्या कार्यकाळात नगररचना विभागात सर्वात जास्त प्रतिनियुक्तीवरील अधिकारी भरणा, सहाय्यक संचालक नगररचना यांच्यासह सर्वच अधिकारी यांना नवीन मनपा प्रशासनाचा अनुभव नाही. क्लस्टर योजना कागदावरच असून याची  अमंलबजावणी मात्र शून्य ठाण्यातील संस्थेस कंत्राट दिले संस्थेचे काम मात्र शुन्य. मनुष्यबळ नाही, तरी देखील कोट्यवधीची बीले, यातच भर म्हणून कलस्टर योजना अमंलबजावणीसाठी नगररचनाकार कृष्णा शिंदे या प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकारी यांची वर्णी लावली. संचालक पुणे नगररचना यांचेकडून महापालिका प्रशासानाचे सहाय्यक नगररचनाकार दळवी यांना नगर रचनाकार पद्दोतीने नेमणूक दिली असून डोईफोडे व दळवी यांचे भ्रष्टाचार व्हिडीओक्लिप काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाली होती. या सर्व चर्चा पाहता केडीएमसीचा नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला असून यासर्व वादग्रस्त कर्मचाऱ्यांबाबत स्थायी समिती अथवा महासभेने दखल घ्यावी अशी मागणी यानिमित्ताने जाणकारांकडून होत  असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत संचालक नगररचना संतोष डोईफोडे यांच्याशी दळवी यांच्या नगररचनाकार नियुक्ती  संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, हा सामान्य प्रशासनाशी निगडित विषय असून माझा संबंध असण्याचा प्रश्नच नाही. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता दळवी यांची नेमणूक सामान्य प्रशासन विभागाने केली नसल्याचे सांगितले.”

 वाहतूक कोंडीचा नाट्यप्रयोगाला फटका

तर बंद उपहारगृहामुळे नाट्यरसिकांची गैरसोय कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाजवळ असलेल्या आचार्य अत्रे नाट्यगृहात रविवारी झालेल्या ‘ऑल द बेस्ट’ या हाऊसफुल नाट्यप्रयोगाला शहरातील वाहतूक कोंडीचा फटका बसला. सायंकाळी ४ वाजता सुरू होणारा प्रयोग कलाकार वाहतूक कोंडीत अडकल्याने सुमारे अर्धा तास उशिराने सुरू झाला. रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कलाकार वेळेत नाट्यगृहात पोहोचू शकले नाहीत. आयोजकांनी प्रेक्षकांना विलंबाची माहिती दिल्यानंतर रसिकांनी संयम राखत प्रतीक्षा केली. या प्रयोगाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. मात्र, नाट्यगृह परिसरात उपहारगृह व अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रेक्षकांची गैरसोय झाली. यामुळे वाहतूक नियोजनासह सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर हे कल्याण-डोंबिवलीसह बदलापूर, अंबरनाथ आणि परिसरातील नाट्यरसिकांसाठी प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या रंगमंदिरातील उपहारगृह गेल्या काही आठवड्यांपासून बंद आहे. यामुळे प्रेक्षकांची मोठी गैरसोय होत असून मध्यंतरात बाहेर जाऊन पाणी, खाद्यपदार्थ आणावे लागत आहे. विशेष म्हणजे, उपहारगृह चालविणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर नवीन ठेका अद्याप कोणालाही देण्यात आला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ००००००

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीचे आमरण उपोषण मागे

 नगरसेवक शैलेश पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता आरती परब दिवा : दिवा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा तसेच त्यासंदर्भातील ठराव ठाणे महापालिकेच्या महासभेत तातडीने मांडून मंजूर करावा, या मागणीसाठी समाजसेविका सुवर्णा कांबळे आणि समाजसेवक सौरव अढांगळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची अखेर दुसऱ्या दिवशी सांगता झाली. शिवसेना उपशहर प्रमुख तथा नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा विषय ठाणे महापालिकेच्या महासभेत मांडण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल तसेच पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे लेखी आश्वासन शैलेश पाटील यांनी दिले. लेखी आश्वासनानंतर नगरसेवक शैलेश पाटील यांनी सुवर्णा कांबळे आणि सौरव अडागळे यांना नारळपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. त्यामुळे पुतळा उभारणीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे दिवा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी आंबेडकरी चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ नेते एकनाथ भगत (बाबा) यांच्या सामाजिक आणि चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने दिव्यातील एका रस्त्याचे नामकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी तेव्हा ग्वाही देण्यात आली. या प्रसंगी अजित भगत, भालचंद्र भगत, विश्वास भालेराव, बालाजी कदम, गंगाधर गायकवाड, रवी कदम, सुनील कांबळे, भरत मोहिते, प्रवीण उतेकर, सरला गायकर, शिला बहिरूने यांच्यासह शिवसैनिक, आंबेडकरी चळवळीचे अनुयायी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषण मागे घेतल्यानंतर समाजसेवक सौरव अडागळे आणि सुवर्णा कांबळे यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, आंबेडकरी संघटना, महिला मंडळे, शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि दिवा शहरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

 ९ ऑगस्ट क्रांतीदिनी गिरणी कामगारांची मूक मिरवणूक!

 राष्ट्रीय मिल मजदूर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने राजेंद्र साळसकर मुंबई -येत्या ९ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने,गिरणी कामगारांची सालाबाद प्रमाणे,…

महावितरणाने गृह संकुलात दाखवले स्मार्ट मीटर प्रात्यक्षिक

कल्याण: स्मार्ट मीटर संदर्भात असलेले गैरसमज दूर करून त्याचे महत्त्व वीज ग्राहकांना पटवून देण्यासाठी महावितरण कडून गृहसंकुलात थेट वीज ग्राहकांच्या दारात त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली आहे. महावितरणच्या कल्याण पूर्व…

 शेतकरी कर्जमुक्ती- ठाणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्याला वेग

 जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन अशोक गायकवाड ठाणे : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कमाल रु.२.०० लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना या योजनेचा तात्काळ लाभ मिळावा यासाठी आधार प्रमाणीकरणाची (आधार ई-केवायसी ) प्रक्रिया सध्या गतिमान करण्यात आली आहे. ३१ जुलैला अखेर प्राप्त झालेल्या यादीतील जिल्ह्यातील एकूण १० हजार ९६२ पात्र खातेदार शेतकऱ्यापैकी ८ हजार ४४४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. तर उर्वरित २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १६ हजार ८३६ आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत १ हजार २३२ अशा एकूण १८ हजार ६८ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० हजार ५२५ आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या ४३७ अशा एकूण १० हजार ९६२ पात्र खातेदार शेतकऱ्यांची पहिली यादी प्राप्त झाली आहे. ३१ जुलै २०२६ अखेर प्राप्त झालेल्या यादीतील ८ हजार ४४४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. तर उर्वरित २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा अग्रणी व्यवस्थापकांना (एलएमडी) तात्काळ सर्व खात्यांचे (उर्वरित २ हजार ५१८) आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देशही डॉ. पांचाळ यांनी दिले आहेत. आधार प्रमाणीकरणाचे काम सर्व ‘आपले सरकार’ व ‘महा-ई-सेवा’ केंद्रांवर सुरू असून या कामासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी १५ ऑगस्टनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करताच थकीत कर्जाची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पुन्हा नवीन पीककर्ज मिळणे शक्य होणार आहे. पात्र सभासदांच्या याद्या संबंधित बँक शाखा, सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार’ किंवा ‘महा-ई-सेवा’ केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करून घ्यावे; यासाठी कोणतेही शुल्क द्यायचे नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच प्रमाणीकरणात अडचण आल्यास संबंधित सेवा सहकारी सोसायटीचे गटसचिव किंवा बँक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा उपनिबंधक डॉ.मांडे यांनी केले आहे.

दिशा वेल्फेअर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य शिबीर

मुंबई – विक्रोळी कन्नमवार नगर जनता मार्केट येथील गेटवेल सर्जिकल येथे दिशा वेल्फेअर ग्रुप, सामाजिक संस्था मुंबई(रजि.)आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर रविवार २ ऑगस्टला सकाळी १०…