उल्हासनगर: वात्सल्य सेवाभावी संस्था (रजि.) यांच्या विद्यमाने १० जून, मिलिंद नगर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. ऍड.महेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात संस्थेच्या मागील वर्षभरातील सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांचा आढावा घेतला असून यावेळी आगामी वर्षासाठी विविध लोकहितकारी उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. तसेच समाजकारण, शिक्षण, आरोग्य आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी संस्था अध्यक्ष मयूर भालेराव ,राजेश पवार,राजेश जावीर सुवर्णा वाघचौरे,ज्योतीताई भालेराव निखिल पवार यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक, देणगीदार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
