मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 85 वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलने शंभर टक्के यश संपादन करुन ऐतिहासिक विजयाची नोंद केली. अध्यक्ष संदीप चव्हाण यांना ४८४ पैकी ३६६ मते मिळाली. त्या निमित्ताने अध्यक्ष संदीप चव्हाण आणि  उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या स्वाती घोसाळकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मनोहर विचारे प्रतिष्ठान, मुंबईचे संस्थापक  अध्यक्ष अजय विचारे यांनी सत्कार केला. डावीकडून दुसऱ्या  प्रतिष्ठानाच्या मानद सचिव पूर्णिमा कोटीयन सुद्धा उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *