Category: मुंबई

Mumbai news

‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार – २०२६’ ने प्रा. वसंतराव पाटील यांचा गौरव

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदरचे संस्थापक-मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व समाजसेवक प्रा. वसंतराव यशवंत पाटील यांना “दैनिक लोक युवा वृत्तपत्राच्या” वतीने लोकमान्य बाळगंगाधर…

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड व मोफत बस पास शिबिर उत्साहात संपन्न

औचित्य माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार  संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास काढून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक  सुनिल कुरकुटे,  नगरसेवक प्रभाग क्रमांक १९ यांच्या पुढाकारातून, भारत ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यंत आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हे शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई परिवहन समितीचे सदस्य राजेश राय, नगरसेवक सुनिल कुरकुटे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  मारुती विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच  संदीप नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. नगरसेवक  सुनिल कुरकुटे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मध्य रेल्वेच्या बोर्डावर सल्लागार सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांना नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल परिवहन समितीचे सदस्य  राजेश राय यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ०००००

अभिनेता ऋषिकेश कानडे काळाच्या पडद्याआड

अवघ्या ३८‌व्या वर्षी घेतली ‘एक्झिट’ मुंबई : पुण्यातील एक हरहुन्नरी आणि अतुलनीय अभिनेता ऋषिकेश कानडे याचे आज पहाटे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय अवघे ३८ वर्षांचे होते.  अजात शत्रु असलेला ऋषिकेश एक प्रगल्भ अभिनेता तर होताच पण देशप्रेमाने पूर्ण भारलेला होता. तो मुख्य भूमिका करत असलेल्या ‘मी भारतीय ‘ ह्या दिर्घांकाचे जवळपास ३०० प्रयोग करतांना  त्याच्या देशप्रेमाचे प्रत्यंतर यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यान देताना तो महाराजमय होऊन जायचा. त्याने केलेल्या प्रत्येक भूमिका तो जगला, त्यामुळे प्रेक्षकांच्या ह्रदया पर्यंत पोहोचला. त्याला राज्य नाट्य स्पर्धेत दोन वर्ष अभिनयाच्या रौप्य पदकाने गौरवले होते. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण आणि पत्नी असा परिवार आहे. ३ ऑगस्टला संध्याकाळी ऋषिकेशवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वत:चा ऑनलाईन फिटनेस क्लब चालवणाऱ्या ऋषिकेशच्या निधनाने पुण्याच्या रंगकर्मींमधे हळहळ व्यक्त होत आहे. ००००

 शिक्षक आमदार होण्यासाठी मंगेश चिवटे यांनी कंबर कसली

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : एकेकाळी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पत्रकारितेत ठसा उमटवून नंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उतरलेले मंगेश चिवटे यांनी विधानपरिषदेत प्रवेश करण्याची जय्यत तयारी केली असल्याचे दिसून येते. पुणे शिक्षक…

लोकमान्यांना वाहिली विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि.  (प्रतिनिधी) :  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आज  महाराष्ट्र विधानपरिषदेचे उप सभापती सचिन अहिर यांनी विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.  याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव…

उमा तेंडोलकर यांच्या निरुपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमान्य टिळक पुण्यतिथी सुविद्यालयात साजरी मुंबई : सुविद्या प्रसारक संघाचे सुविद्यालय, बोरीवली पश्चिम येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या ह. भ. प. उमा गजानन तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जीवन प्रवास, त्यांचे कार्य, त्यांचा दृढनिश्चय आणि स्वातंत्र्यलढा आपल्या मधुर वाणीत समजावून सांगितला. टिळकांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी रंगवून सांगताना त्यांनी आपल्या निरूपणाला संस्कृत श्लोक तसेच संतांच्या अभंगांची छान जोड दिली. या कार्यक्रमात सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे हे अध्यक्षस्थानी होते. तसेच विशेष निमंत्रित म्हणून इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा सरिता गुजराथी व सुविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्रतिमा राजवाडे सुविद्या प्रसारक संघाच्या कार्याध्यक्षा देवयानी सबनीस, सुविद्यालयाचे मुख्याध्यापक जयंतीलाल निकम आदी मान्यवर उपस्थित होते.  लोकमान्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पारकर, कार्यवाह संजय दळवी आणि सदस्य राजेंद्र मोहिते यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. लोकमान्य प्रतिष्ठान तर्फे सतीश पारकर व संजय दळवी यांनी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे यांना प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त केल्याचे पत्र सुपूर्द करून त्यांना सन्मानित केले. लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुविद्यालयाचा प्रथम पारितोषिक वितरण समारंभही संपन्न झाला. शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच शालेय अभ्यासक्रमामध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले. शाळेच्या नादब्रह्म समूहाने  संगीत शिक्षिका निशा शिंदे टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम गीते सादर केली. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.

लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वराज्यभूमीच्या कामांना गती देण्याचे संकेत मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी मुंबईतील टिळक स्मारक परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसह विविध…

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, दादर या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या  सुरेखा सुरेश पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे  असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात त्या पारंगत होत्या. त्यांच्या निधनाने दादर शिवाजी पार्क व माटुंगा परिसरांत शोककळा पसरली आहे.

शाम गावडे यांचे आकस्मिक निधन

मुंबई :  फोर्टचा राजा गणराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महादेव ऊर्फ शाम ( नाना) भिमाजी गावडे (वय ६५) यांचे अलिकडेच  ह्रदयविकाराने  आकस्मिक निधन झाले. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावडे यांचे…

मुलुंड विधानसभा मतदारसंघ

आज मुलुंड विधानसभा मतदारसंघातील SIR संदर्भात तसेच विविध संघटनात्मक आणि कार्य आढावा बैठकीस कुडाळ-मालवणचे चे आमदार तसेच ईशान्य मुंबईचे संपर्कप्रमुख सन्माननीय निलेश नारायणराव राणे यानी उपस्थित राहून मतदारसंघातील सुरू असलेल्या…