राजीव चंदने

मुरबाड : रिपब्लिकन कामगार युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी मुरबाड तालुक्याचे कर्तव्यदक्ष रिपाई (आ) तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश उघडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या आशीर्वादाने, मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनात आणि रिपाई नेते सुरेश बारसिंग यांच्या प्रमुख सल्ल्याने ही नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते यांच्या शुभहस्ते दिनेश उघडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

दिनेश उघडे यांनी सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांशी सुसंवाद ठेवून त्यांनी सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे जिल्ह्यात रिपब्लिकन कामगार युनियनचे संघटन अधिक मजबूत होईल. तसेच कामगार, वंचित, शोषित आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे आवाज उठवता येईल, असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. उघडे यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यानां पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

000000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *