Category: मुंबई

Mumbai news

राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू  करण्याची मागणी

मुंबई : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सीजेपी  च्या आंदोलनाविरोधात महाराष्ट्र करणी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनामुळे सामाजिक शांतता भंग झाल्याचा आरोप करत राज्यात तातडीने राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करावा,…

मातंग समाजाची ‘लहू बंधन’ मोहिमेतून क्रांतीची सुरुवात

रमेश औताडे मुंबई : महामानव लहुजी उस्ताद साळवे आणि पिवळा रंग हे समीकरण म्हणजे या महामानवाची निशाणी आहे. तोच धागा पकडत लहुजी वस्ताद यांची निशाणी म्हणून “ लहू बंधन “ सर्व समाज बांधवांच्या हातात बांधण्याचा संकल्प साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने झाल्याने  एका नवीन पर्वाची सुरवात झाली आहे. असे मत सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक बाबुराव मुखेडकर यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात व्यक्त केले. अनेक लोक वेगवेगळ्या देवा धर्माच्या नावाने  वेगवेगळ्या रंगाचे बंधन बांधतात. पिवळे बंधन हे मातंग समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरेल असा संकल्प करत समाज बांधव संदीप नामवाड, संतोष थोरात, बाबुराव मुखेडकर यांनी राज्यभर समाज बांधवांच्या हातात हे पिवळे बंधन बांधून समाजाला एकत्र आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या बंधनांमुळे  समाज बांधवांमध्ये एक नवीन ऊर्जा चैतन्य निर्माण होईल. सकल मातंग समाज च्या वतीने पुढील महिन्यात २९ सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. अंदोलनात सहभागी होण्यासाठी हे लहू बंधन बांधून समाजाच्या मागण्यांचे रणशिंग फुंकले जाणार आहे असे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक बाबुराव मुखेडकर यांनी सांगितले. ००००

मुस्लिम वंचित समाज, युवक व महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचा संकल्प

मुंबई : मुस्लिमांतील वंचित समाज, युवक व महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक दिल्ली येथे संपन्न झाल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी मुंबईत…

 हितेश आणि चेतना मेहता यांनी साकारले विठोबा रखुमाई!

गुणवंतांच्या गौरवाने साजरी झाली लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी मुंबई : दहिसर मधील एन. एल संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात ‘उडान परिवार’ आणि  ‘रोटरी क्लब ऑफ दहिसर’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपुरुष लोकमान्य  बाळ गंगाधर टिळक यांचे पुण्यस्मरण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. सुरूवातीला ‘उडान परिवार ज्येष्ठ नागरिक कट्ट्या’चे मार्गदर्शक प्रवीण लाडे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील लोकमान्यांचे महत्त्व कथन केले. रोटरी क्लब ऑफ दहिसरचे अध्यक्ष प्रकाश कामठे, रोटेरीयन सुप्रसिद्ध लेखक श्रीरंग प्रभू, दिलीप नाबर, हितेश मेहता, विक्रम दवावाला, महेश वर्तक यांची भाषणे झाली. त्यातूनच ‘हातात हात, मनात विश्वास, सेवेने जोडू या, समाजाचा श्वास’ एकतेची ही ज्योत अशीच तेवत राहो. मानवतेचा दीप प्रज्वलित राहो’ ही सद्भावना  व्यक्त करण्यात आली.    रोटरी क्लब ऑफ दहिसरचे अध्यक्ष रोटेरीयन प्रकाश कामठे यांनी याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरील उपस्थित आणि ‘विराज पर्व अकादमी’ भारतीय सैनिक, पोलीस दल भरती प्रशिक्षक विराज विजय नारकर यांना  गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. उडान परिवार प्रमुख शिरीष बच्चुभाई पारीख आणि भारतीय दलित साहित्य अकादमी, बृहन्मुंबई अध्यक्ष दत्ताराम पुंजाजी घुगे यांना रोटरी क्लब ऑफ दहिसर मुंबईचे  सन्माननीय सदस्यत्व प्रदान करण्यात आले. सत्कारमूर्तींचे परिचय वाचन  रोटेरीयन हर्षा दवावाला, प्रिया कामठे यांनी केले. चेतना मेहता यांनी सूत्रसंचालन केले.  या कार्यक्रमातच आषाढी एकादशीला  निघालेल्या दिंडीत भगवान विठ्ठलाचे रूप घेतलेले हितेश मेहता आणि रुक्मिणीच्या रूपात चेतना मेहता हे दांपत्य अथकपणे १२ तास अन्नपाणी न घेता दिंडीत रथावर उभे होते. दहिसरकरांना त्यांनी साक्षात पंढरीच्या माऊलीचे दर्शन घडविले. त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ दहिसरचे अध्यक्ष प्रकाश कामठे यांच्यावतीने शेकडो ज्येष्ठ नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आभार प्रदर्शन दीपक खेर यांनी केले. 0000

 नाना नानी पार्कसाठी ५० लाख रुपये देण्याची मंदाताई म्हात्रे यांची ग्वाही                                                              

मुंबई :नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखकर, सुसह्य होण्यासाठी आणि सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी  सिताराम मास्तर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना नाना नानी पार्क बनविण्यासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये निधी…

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचा, सांस्कृतिक कार्य विभागाला विसर?

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर आणि थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या आज १०६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांना अभिवादन करण्यात…

ठाण्यात उभारणार अत्याधुनिक ‘शूटिंग रेंज’ इमारत

शूटिंग रेंजसह प्रशिक्षण, प्रशासन आणि मनोरंजनाच्या सुविधा एकाच छताखाली!  राज्य शासनाकडून ₹२६ कोटींच्या निधीला मंजुरी – प्रताप सरनाईक ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मौजे वाघबीळ येथे ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर अत्याधुनिक शूटिंग रेंजसह बहुउद्देशीय सुविधा भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने ₹२६ कोटींच्या निधीला तत्त्वतः मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले ‘ठाणे शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करताना केवळ पायाभूत सुविधांचा विस्तार पुरेसा नाही, तर युवकांना प्रशिक्षण, खेळाडूंना दर्जेदार सुविधा आणि नागरिकांना विविध उपक्रमांसाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिरानंदानी इस्टेट जवळील मौजे वाघबीळ येथे उभारण्यात येणारे हे सुविधा भवन त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल,’ प्रस्तावित प्रकल्पासाठी २०२०.४८ चौ.मी. क्षेत्रफळाचा सुविधा भूखंड असून, सुमारे ४५२२.०५ चौ.मी. बांधकाम क्षेत्रात बहुमजली इमारत उभारण्यात येणार आहे. बेसमेंटमध्ये ३० चारचाकी आणि ५० स्कूटरसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळमजल्यावर ट्रेनिंग हॉल, कॅफे, किचन, प्रसाधनगृह, शस्त्र-साहित्य वाटप कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालय प्रस्तावित आहे. पहिल्या मजल्यावर १० मीटर शूटिंग रेंजची ११ लेन, ६५ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, ट्रेनिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल आणि प्लेअर लाऊंज असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर २५ मीटर शूटिंग रेंजच्या १० लेन, ५५ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, नियंत्रण कक्ष, स्टोअर रूम आणि प्रसाधनगृह; तर तिसऱ्या मजल्यावर ५० मीटर शूटिंग रेंजच्या ८ लेन, ४० प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, नियंत्रण कक्ष व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘ठाण्यातील नेमबाजीपटूंना दर्जेदार सराव आणि प्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यासाठी सक्षम पायाभूत व्यवस्था निर्माण व्हावी, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. ठाण्याच्या क्रीडा विकासाला नवी ओळख देणारे केंद्र म्हणून हे सुविधा भवन विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जनसंपर्क विभाग

ऐरोलीतील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

000 नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या जी-विभाग, ऐरोली कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने तोडक कारवाई करत बांधकामाचा काही भाग निष्कासित केला. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त व उपआयुक्त (अतिक्रमण)…

डोंबिवली एम्स कॉलेज ऑफ फार्मसीला ‘एमएसबीटीई’ संस्थेकडून ‘उत्कृष्ट’ श्रेणी

कल्याण : फार्मसी शिक्षणातील गुणवत्ता, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांच्या जोरावर डोंबिवली मधील एम्स कॉलेज ऑफ फार्मसीला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) कडून शैक्षणिक गुणवत्ता मूल्यमापनात उत्कृष्ट श्रेणी प्रदान…

 कल्याणच्या काळा तलावात तरुणीचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ

 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  कल्याण : कल्याण पश्चिमेतील काळा तलावात मंगळवारी एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीने आत्महत्या केली की, तिला तलावात ढकलून हत्या केली हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे तलाव परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याविषयी महापौर हर्षाली चौधरी आणि मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी संताप व्यक्त केला आहे. हि तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला, मात्र मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास मृतदेह काळा तलावात आढळून आला. तिचा मृतदेह तलावातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला असून  या तरुणीने तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय प्रथमदर्शनी व्यक्त केला जात असला तरी तिला कोणी ढकलून दिले का  त्यामुळे तिचा तलावात बुडून मृत्यू झाला या बाजूनेही बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या तलावाचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे. या तलावाच्या विकासासाठी १९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या तलाव परिसरात ३२ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. सायंकाळी तरुणीचा मृतदेह तलावात मिळून आल्याने नक्की घटना कशी घडली हे सीसीटीव्हीत पाहता येईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. तेव्हा तलाव परिसरातील ३२ सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याची  धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी मनसे नगरसेवक गणेश लांडगे आणि विभाग प्रमुख कपिल पवार यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेतली. यावेळी विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत आणि मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव  यांच्याकडे याबाबत विचारणा करुन संताप व्यक्त केला. सीसीटीव्ही लावले असले तरी त्यांची देखभाल दुरुस्तीच केली जात नसल्याची बाब याघटनेच्या निमित्ताने उघड झाली आहे. महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकार्यांसमवेत काळा तलाव येथे धाव घेऊन तलाव परिसराची पाहणी केली. तसेच तलावाच्या सुरक्षेसंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.