Category: मुंबई

Mumbai news

हॉटेलमध्ये चोरी करत २८ हजारांची रोकड व ग्राहकाचा मोबाईल लंपास

कल्याण : कल्याण पूर्वेतील नेतिवली चौक परिसरातील कोकण किनारा हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरफोडी करून २८ हजारांची रोकड आणि एका ग्राहकाचा मोबाईल फोन लंपास केला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात…

– गुरुपौर्णिमेनिमित्त मलंगगडावर भारतीय जनता पार्टीचा भक्तिमय सोहळा

डोंबिवली, दि. २९ जुलै (आरती परब) : गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख…

 जे. एम. एफ. शिक्षण संस्थेत अवतरली संतांची मांदियाळी… अवघी दुमदुमली पंढरी…

दिवा, दि. 29 जुलै – देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी, पंढरपूर मध्ये लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले असतानाच जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर, कोपर मध्ये देखील…

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात वारकऱ्यांची मांदियाळी

कल्याण : ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात विठ्ठल रुक्मिणी मंदिर आयोजित आषाढी वारीने या वर्षी तिसऱ्या वर्षात पदार्पण केले. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरा मधील रोजनबर्गमध्ये सकाळी सुरुवात झाली.…

माथेरान मध्ये एसआयआर अंतर्गत मतदार नोंदणीला उत्तम प्रतिसाद

मुकुंद रांजाणे माथेरान : भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात एसआयआर अंतर्गत मतदार नाव नोंदणीची मोहीम सुरु आहे. माथेरान येथील बाजार पेठ, शिवाजी महाराज नगर, संत गाडगे महाराज विभाग, रेल्वे स्टेशन व पंचवटी नगर या विभागातील मतदारांनी गुरुवारी आयोजित केलेल्या विशेष मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सध्या माथेरान येथे मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मराठा भवन या समाज हॉल मध्ये मतदार उपस्थित राहिले होते. त्यामुळे (बिएलओ) शिक्षक विनोद जाधव यांना नाव नोंदणी करण्यास मोठया प्रमाणात मदत झाली सामाजिक कार्यकर्ते निखिल शिंदे, आदित्य भिलारे यांनी या मोहिमेसाठी विशेष प्रयत्न केले. 00000

माजी सैनिकांसाठी अद्ययावत संकुल उभारण्याच्या एकात्मिक विकास प्रकल्पाला गती – शंभूराज देसाई

मुंबई : राज्यपाल महोदयांच्या निर्देशानुसार सातारा आणि पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागांचा एकात्मिक विकास प्रकल्प गतिमान करण्यात येणार असून, या ठिकाणी माजी सैनिक…

ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांच्या ३८ वर्षांच्या निरंतर सेवेला नागरिकांचा सलाम

कल्याण : डोंबिवली शहरात गेल्या ३८ वर्षांपासून अत्यल्प शुल्कात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाची…

– अंगठा मुक्त समाज घडविण्यासाठी चर्मकार समाजाचा स्तुत्य उपक्रम

 गुरुपौर्णिमेनिमित्त स्वाक्षरीचे प्रशिक्षण प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना रुपये एक हजार प्रोत्साहन भत्ता कल्याण: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत साक्षरतेचा प्रकाश पोहोचविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. समाजातील अंगठा लावणाऱ्या निरक्षर महिला व पुरुषांना स्वाक्षरीचे प्रशिक्षण देऊन ‘अंगठामुक्त समाज’ घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या उपक्रमात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना स्वाक्षरी करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानून साक्षरतेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे, जिल्हा सरचिटणीस गजेंद्र राऊत, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत पोळ, मनोज वाघमारे, धुराजी इंगळे, सोमनाथ राऊत, भिकाजी कांबळे, संदीप वाळंज, अंकुश राऊत, राजकुमार राऊत, बाळासाहेब वाघमारे, दिलीप वाघमारे यांच्यासह प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या अस्मिता गायकवाड, कविता रुपवते, तसेच कलावती शेवाळे, मंगल बनसोडे, मंदाबाई बनसोडे, अंजना बनसोडे, मुक्ताबाई गायकवाड आणि अनेक लाभार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणात यशस्वीरीत्या स्वाक्षरीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मातोश्री गुंजाई फाउंडेशन, महेश गायकवाड आणि शिवसेना चर्मकार संघटना यांच्या माध्यमातून प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार असून, प्रत्येक लाभार्थ्यास रुपये एक हजार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक  राम बनसोडे यांनी दिली. सामाजिक सक्षमीकरण आणि साक्षरतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

महसूल शिबिरात समाजविकास योजनांचे मार्गदर्शन

अशोक गायकवाड नवी मुंबई : शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना, उपक्रम यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यादृष्टीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत २२ जुलै ते २ ऑगस्ट  या कालावधीत कोणत्याही एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शिबीर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागानेही स्टॉल प्रदर्शित करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ५० हून अधिक लोककल्याणकारी योजनांची माहिती या शिबिरांना मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना दिली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील परिमंडळ २ क्षेत्रातील नागरिकांकरीता घणसोली समाजमंदिर हॉल येथे २२ जुलैला व नेरुळ मातृमिलन चर्च सभागृह, सेक्टर ४२-ए, सीवूड या ठिकाणी २६ जुलैला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये समाजविकास विभागाच्या स्वतंत्र स्टॉलव्दारे महानगरपालिकेच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यात आली व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी असे आवाहन करण्यात आले. घणसोली येथील शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, नवी मुंबईच्या महापौर सुजाता सूरज पाटील, उपमहापौर दशरथ भगत व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नेरुळ येथील शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य मंदाताई म्हात्रे आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या शिबिरामध्ये जिल्हाधिकारी, ठाणे व महसूल विभाग यांच्यामार्फत कार्यक्षेत्रातील गरजू व गरीब नागरिकांना उत्पन्न दाखला, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विवाह नोंदणी दाखला अशा शासनाच्या विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

– ठाण्यात जिल्हास्तरीय विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गत ठाणे : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत (MY Bharat) – ठाणे तथा नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) यांच्या संयुक्त…