Category: मुंबई

Mumbai news

राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात;

सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती   पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या…

धातुमिश्रित मांजाचा वापर टाळा, वीजतारांपासून दूर राहा

पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन   कल्याण : तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग…

श्री उद्यानगणेश कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलची विजयी सलामी

मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूल, बालमोहन विद्या मंदिर, उत्कर्ष मंदिर तर मुलींमध्ये बालमोहन विद्या मंदिर, एसआयईएस, चुनाभट्टी हायस्कूल आदी शालेय संघांनी…

अवजड वाहतूकदरांच्या समस्या सोडवणार अवजड वाहतूक सेना अध्यक्ष उदय दळवी

केतन खेडेकर मुंबई : शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी वाहतूकदारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी भाऊचा धक्का येथे सर्व पदाधिकारी आणि वाहतूक दणांसोबत आंदोलन केले. वाहतूकदारांना अटल शेतीवरून…

क्रिकेट प्रशिक्षक संजय गायतोंडेना वैद्य पुरस्कार

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या एमसीए शरद पवार इनडोअर क्रिकेट अकॅडमितील फलंदाजीचे माजी प्रशिक्षक, एमसीए प्रशिक्षण समितीचे माजी चेअरमन ६४ वर्षीय जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक संजय गजानन गायतोंडे यांची कुर्ला स्पोर्ट्स…

ममता दिना निमित्त मुलुंडमध्ये रुग्णांना फळांचे वाटप

मुंबई : शिवसेना ठाकरे गट तर्फे मुलुंड विधानसभेच्या वतीने माॅसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा झालेल्या ममता दिना निमित्त श्रीमती म. तु. अग्रवाल, श्रीमती श्यामकुवंरबाई जटाशंकर डोसा प्रसूतीगृह, स्वातंत्र्यवीर सावरकर…

शासकीय आरोग्यसेवेचा कार्यभार आशाताईंच्या खांद्यावर

शहापूर : शहापूर तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून येथील आरोग्यसेवा आशा कार्यकर्त्यांच्या खांद्यावर टाकून मदमस्त आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आपली जबाबदारी झटकत असल्याचे निदर्शनात आले…

 बदलापूर–खोपोली लोकल बंद

कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक   मुंबई : मध्य रेल्वेच्या कर्जत येथील यार्डमध्ये सुधारणा, कर्जत स्थानकावरील पायाभूत कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, १२ जानेवारीला विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत बदलापूर – खोपोली लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील पळसधरी आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप, डाऊन आणि मधली मार्गिकेवर रविवार, १२ जानेवारीला दुपारी १.५० ते ३.३५ या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत बदलापूर – खोपोली स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी १२.२० वाजता सुटणारी सीएसएमटी – खोपोली आणि दुपारी १.१९ वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येणार आहे. दुपारी १.४० वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येणार आहे. रविवारी दुपारी १.५५ वाजता सुटणारी कर्जत – सीएसएमटी लोकल, दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली – सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून चालवण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुपारी ३.२६ वाजता कर्जत – सीएसएमटी लोकल बदलापूर येथून सुटेल. गाडी क्रमांक २२१९४ ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस दुपारी २.५० ते ३.३५ दरम्यान चौक येथे थांबवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेद्वारे देण्यात आली. 00000

आरोपी संजय मोरेला जामीन नाहीच

कुर्ला बस दुर्घटना प्रकरण मुंबई : गेल्या महिन्यात कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे याने जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून मोरेने जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांनी शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर निर्णय देताना तो फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. मोरे याच्या जामीन अर्जावर शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, न्यायवैद्यक अहवाल आणि आरटीओचा अहवालाचा दाखला देऊन मोरे हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नव्हता. तसेच, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. त्यामुळे, मोरे याच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा दावा करून पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. मोरे हा चांगला चालक नसून त्याच्यापासून धोका आहे. त्यामुळेच, त्याला जामीन मंजूर करू नये. तसेच, जामिनावर सुटका झाल्यास तो पळून जाण्याची शक्यता असल्याचा दावाही पोलिसांनी मोरे याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करताना केला होता. दुसरीकडे, आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे आणि विद्युत बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. किंबहुना, या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिला जात असल्याचा दावा मोरे याच्या वतीने युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला होता. या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक करण्यात आलेली नाही किंवा आरोपी करण्यात आलेले नाही. आपल्याला कार्यालयात बसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि दिंडोशी बस आगारात विद्युत बस चालविण्यास सांगितले. त्यानंतर, आपल्याला कुर्ला येथे बस चालविण्यास परवानगी देण्यात आली. तसेच, या दुर्घटनेसाठी आपल्या एकट्याला जबाबदार धरता येणार नसल्याचा पुनरूच्चार करून आपल्याला जामीन मंजूर करण्याची मागणी मोरे याच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली होती.

मकर संक्रांतीला पतंग उडवताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नवी मुंबई : मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात, त्यामुळे याला ‘पतंगांचा सण’ असेही म्हटले जाते. मकर संक्रांती सणाच्या अगदी आधी,नायलॉन किंवा कोणत्याही सिंथेटिक पदार्थापासून बनविलेल्या आणि /…