Category: मुंबई

Mumbai news

सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवासेनेने १० पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे. परंतु, आता सिनेट निवडणुकीच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.  मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया (मतदार नोंदणीपासून अंतिम मतदार यादीपर्यंत) असंविधानिक आणि…

नाभिक समाजाला काँग्रेसच न्याय दईले- नाना पटोले

मुंबई : नाभिक समाजाला काँग्रेसच न्याय देईल. आमचे सरकार आल्यास तुमच्या मागण्या पुर्ण करु असा विश्वास काँग्रेसचे प्रदशाध्यक्ष नाना पटोले यांना मुंबईतील आझाद मैदानात आयोजीत सकल नाभिक समाजाच्या महाआंदोलनास भेट देऊन दिला. समाजातील वंचित घटकांना…

आम्हीच गतीमान शक्तिमान या भ्रमातून बाहेर पडा – वडेट्टीवार

मुंबई  :  आम्हीच शक्तिमान आणि आमचं सरकार गतिमान‘ या भ्रमातून महायुती सरकारने आता बाहेर पडावं. असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला दिला आहे. आपल्या ट्विट मधून वडेट्टचीवार म्हणतात की, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवणे तर महायुती सरकारला जमलेच, वरून जी गुंतवणूक, उद्योग आधीपासून होते ते सुद्धा यांना टिकवून ठेवता आले नाही.पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहत हे वाहन निर्मिती उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. परंतु येथील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे येथील उद्योगांना इतर राज्यांमध्ये स्थलांतरित व्हावे लागत आहे. महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे मेक ईन महाराष्ट्र ऐवजी क्वाईट महाराष्ट्र सुरू झाले. असे स्पष्ट करून वडेट्टीवार म्हणतात की भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः मान्य करतात की महाराष्ट्र गुंतवणूक येत नाही, महाराष्ट्रातील नागपूर सारखे शहर स्मार्ट होवू शकत नाही.पक्षातील मंत्री, उद्योग समूह, संघटना, जनता सर्व मिळून महायुती सरकारचे लक्ष या स्थितीकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे मुजोर सत्ताधारी काही एकायला तयार नाही. इंजिन एक असो की ट्रीपल महायुती सरकारने भ्रमातून आता बाहेर यावे. अशी घणाघाती टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.

गाई आता ‘राज्यमाता’

मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी  मुंबई : गाईंना आता राज्यमातेचा दर्जा महाराष्ट्रात देण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये गाईंना राज्यमातेचा दर्जा देण्यासह विविध खात्यांसह एकूण ३८ निर्णय घेण्यात आले…

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजाराचे अनुदान जमा

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

मराठा आरक्षणबाबातचा ‘शिंदे समिती’चा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला

 मराठा-कुणबीचे ५४ लाख पुरावे अहवालामध्ये १६ शिफारशी शासनास सादर मराठा समाज मागास असल्याचा दावा करता येणे शक्य शैलेश तवटे मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचा तिसरा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला आहे. सार्वजनिक…

निओ शास्त्रीय संगीत फ्यूजनचे २ ऑक्टोबरला सादरीकरण

  मुंबई : डॉ. रतीश तागडे यांनी “VIBGYOR” – ही एक निओ शास्त्रीय संगीत फ्यूजन कॉन्सर्टची संकल्पना मांडली आहे. यात ७ चक्रे, ७ म्युझिकल नोट्स, ७ संगीतकार, ७ संगीत शैली…

‘एक पेड माँ के नाम’ आणि ‘स्वच्छता दौड’ या उपक्रमांतही

नवी मुंबईतील हजारो विद्यार्थी उत्साहाने सहभागी   नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करणारी असून स्वच्छता व पर्यावरण…

राज्यात २३ जिल्ह्यांमध्ये सुरू होणार कॅथलॅब

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील २३ रुग्णालयांमध्ये कॅथलॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

उपवर्गीकरणावर मुंबईत गुरुवारी प्रबोधन सभा

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचा ६८ वा स्थापना दिन आणि त्याचे एक संस्थापक – नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुरुवारी ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर एक प्रबोधन सभा पार…