Category: मुंबई

Mumbai news

लाडक्या बहिणी, सुना,लेकीवर बाबासाहेबांचे उपकार आहेत-राहुल हंडोरे

कल्याण : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल लिहून महिलांना सामानतेचा अधिकार देऊन संविधानात तशी तरतूद करून समस्त महिला वर्गावर, लाडक्या बहिणीवर, लाडक्या सुना लेकीवर उपकार…

 शौचालय उद्घाटनाने साजरा झाला जागतिक शौचालय दिन

 घोलाईनगरमध्ये १०० शौचालयांचे लक्ष्य पूर्ण, ठामपा आणि शेल्टर असोसिएट्स यांचा संयुक्त उपक्रम   अनिल ठाणेकर अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देऊन स्वच्छतेसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उद्देशाने ठाणे महापालिका आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘एक घर एक शौचालय’ हा प्रकल्प राबवला जात आहे. घोलाई नगर, कळवा येथे या प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन करून जागतिक शौचालय दिन (१९ नोव्हेंबर) साजरा करण्यात आला. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्या मार्गदर्शनात कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या घोलाई नगर या ठिकाणी मागील काही दिवसांपासून या प्रकलपाची अमलबजावणी सुरू होती. या प्रकल्पांतर्गत लोकांनी घरात शौचालय बांधावे यासाठी संस्थेमार्फत मोफत शौचालय साहित्य पुरवले जाते. या प्रकल्पात १०० शौचालये बांधून पूर्ण झाली. जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने घोलाईनगर येथे छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. त्यानिमित्ताने, सजावट स्पर्धा, निबंध स्पर्धा यांच्यासह स्वच्छतेशी निगडित खेळही घेण्यात आले. त्यावेळी, कळवा प्रभाग समितीच्या मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया यांच्यासह शेल्टर संस्थेचे वैभव काळे, ज्ञानेश्वर आडे, योगिता शिंदे, पूजा भालेराव, कोमल इंगळे, समीक्षा राबाडे आदी उपस्थित होते. 0000

बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर दोघांनाही ९०, ९३५ एवढीच मते – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर बाळासाहेब पाटील यांना  ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय?असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाराष्ट्रात घोटाळे करताना इलेक्शन कमिशनने तारतम्यही बाळगले नाही. साताऱ्यात त्यांनी काय केले बघा, कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना  ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय? हास्यास्पद आहे; पण,  हीच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सत्यता आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 000

 ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ फत्ते!

 रेल्वे संरक्षण दलामुळे हरवलेल्या ४१४ मुलांची झाली घरवापसी मुंबई: मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर…

पंतप्रधानांना धमकी देणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. चौकशीत ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर…

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ?

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदी भाजपाचा उमेदवार नक्की झाल्याने सुरवातीला उपमुख्यमंत्रीपदाला नाकार देणारे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार असल्याचे सुत्रांचे…

निवडणूक आयोगाचा रात्रीस ‘खेळ’ चाले नाना पटोलें, परकला प्रभाकरांच्या आरोपाने खळबळ

स्वाती घोसाळकर मुंबई  : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत भारताच्या निवडणूक आयोगाने मतांवर दरोडा घातल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या रात्रीस चाललेल्या या खेळाचा नाना पटोले यांनी तर पर्दापाश…

संभाजी मैदानाची दुर्दशा, पालिका अधिका-यांचे दुर्लक्ष

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) – मुलुंड पूर्वेला असलेल्या छत्रपती संभाजी महाराज मैदानाची दुर्दशा झाली असून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी बाहेरून माती आणून धावपट्टी तयार केल्याने मैदानाची दुर्दशा झाली आहे. शिवाय धावपट्टी…

मुंबई विद्यापीठातर्फे पुनर्मूल्यांकनासाठी दरवर्षी लाखोंचा खर्च

मुंबई : पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या मूल्यमापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१ ते २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या कला, वाणिज्य, विधि, विज्ञान, तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विविध परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनासाठी किती रुपये खर्च करण्यात आले, यासंदर्भातील सत्र आणि वर्षनिहाय सांख्यिकी माहिती पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितली होती. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देयक विभागाकडून संबंधित खर्चाची एकत्रित सांख्यिकी माहिती उपलब्ध करण्यात आली. या माहितीनुसार पुनर्मूल्यांकनासाठी २०२१ मध्ये १ लाख १५ हजार १२५ रुपये खर्च करण्यात आले. करोनाकाळामुळे इतर वर्षांच्या तुलनेत २०२१ या वर्षात पुनर्मूल्यांकनासाठी कमी पैसे खर्च करण्यात आले. त्यानंतर २०२२ या वर्षात ३ लाख ३१ हजार ४७५, २०२३ या वर्षात ३ लाख ६१ हजार ८५५ रुपये खर्च करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठातर्फे एका विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून २५० रुपये आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून १२५ रुपये शुल्क घेण्यात येते. तर, एका विषयाच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५० रुपये आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २५ रुपये मोजून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र एका उत्तरपत्रिकेची पुर्नतपासणी करण्यासाठी शिक्षकाला अवघे २५ रुपये दिले जातात आणि गरज असल्यास काही शिक्षकांना प्रवासी भत्ताही दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून एवढे पैसे का घेतले जातात ? पुनर्मूल्यांकनानंतर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होत असतील, तर ही विद्यापीठाच्या मूल्यमापनातील चूक असून विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड का ? असे प्रश्नही विहार दुर्वे यांनी उपस्थित केले आहेत. ‘बहुसंख्य विद्यार्थी हे पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण होतात, परिणामी विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी शिक्षकांना कमी मानधन दिले जाते. पण त्याच वेळी विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी जास्त पैसे घेतले जातात. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी विद्यार्थ्यांकडून कमी पैसे घ्यावेत. तसेच जेव्हा विद्यार्थी पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना निम्मे पैसे परत द्यावेत’, असे मत विहार दुर्वे यांनी व्यक्त केले. एका विषयासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून २५० रुपये व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून १२५ रुपये शुल्क आहे. उत्तरपत्रिका छायाप्रतींसाठी ५० रुपये शुल्क आहे. ‘अत्यंत काळजीपूर्वक तपासणी’ पुनर्मूल्यांकनानंतर संबंधित विद्यार्थ्याची निकाल प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी लागते. तसेच सदर विद्यार्थ्याची गुणपत्रिका ही नव्याने तयार करून त्याला देण्यात येते. निकाल प्रक्रिया करणारा विभाग हा विनाअनुदानित स्वरूपातील असून कर्मचाऱ्यांच्या मानधनासह इतर खर्चही असतो. पुनर्मूल्यांकनासाठी आकारण्यात येणाऱ्या रक्कमेत केवळ उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांचे मानधन नसते. तर एकूण प्रशासकीय व संपूर्ण प्रक्रियेचा खर्च पाहून ती रक्कम आकारली जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची अत्यंत व्यवस्थितपणे तपासणी केली जाते. त्यामध्ये त्रुटी राहू नयेत, याची विशेष काळजी घेतली जाते, असे विद्यापीठ प्रशासनानाने स्पष्ट केले.  

ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ फत्ते!

रेल्वे संरक्षण दलामुळे हरवलेल्या ४१४ मुलांची झाली घरवापसी मुंबई: मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरपीएफने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमे’ अंतर्गत एकूण ४१४ मुलांनं त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले आहे. या मुलांमध्ये ३०६ मुले आणि १०८ मुलींचा समावेश आहे. देशभरातील अनेक मुला- मुलींना शहराचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. यंदा ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ४१४ मुलांची सुटका करून त्यांची घरवापसी केली. या मुलांना सुरक्षित घरी पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी आणि चाइल्डलाइन केंद्र समन्वयक एकत्रितपणे काम करत असून हरवलेल्या मुलांचे संगोपन, त्यांच्या आई-वडिलांचा शोध, त्यांचे समुपदेशन, त्यांचे जेवण सर्व गोष्टींची काळजी संस्थेकडून आणि प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. ००००