Category: मुंबई

Mumbai news

जे.एम. बक्षी कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार

मुंबई : जे.एम. बक्षी कंपनीतील कामगारांना कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली सरासरी पगारवाढ ५४०१ रुपये भरघोस पगारवाढीचा करार करण्यात आला आहे. भारतातील प्रमुख बंदरांमधील सर्वात जुनी असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जे. एम बक्षी या कंपनीमध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२८  असा ४  वर्षाचा वेतन करार केला आहेम या वेतन  करारामुळे कामगारांना कमीत कमी ४४९६ रुपये तर जास्तीत जास्त ६९५३ रुपये पगार वाढ झाली आहे. सरासरी पगारवाढ ५४०१ रुपये आहे. या वेतन करारावर युनियनच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये, सेक्रेटरी विद्याधर राणे,  खजिनदार विकास नलावडे,  कामगार प्रतिनिधी म्हणून  अरुण खाडे आणि  प्रवीण जाधव तर व्यवस्थापनाच्या वतीने उपाध्यक्ष व एच. आर. ई. अरुमुगम आणि मॅनेजर व एच. आर. रितूराज ढाकणे यांनी सह्या केल्या आहेत, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. 0000

मुंबईत सुरू होणार पॅराडॉक्स संग्रहालय

मुंबई : भारतातील पहिले पॅराडॉक्स संग्रहालय लवकरच सुरू होणार आहे. कला, विज्ञानाबाबत मनोरंजनात्मक अनुभव या संग्रहालयात मिळणार आहे. २०२२ मध्ये मिलटोस कंबोरिड्स आणि साकिस तानिमानिडीस यांनी सुरू केलेले पॅराडॉक्स संग्रहालय…

‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी

नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत स्वच्छता ही दैनंदिन…

पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही

उद्धव ठाकरेंनी ठणकावले मुंबई : महाराष्ट्र दौऱ्यावर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा उल्लेख बाजारबुणगे असा केला असून, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रामधून कुणीच संपवू…

“मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पाच वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. त्यांच्या नावावर सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित…

मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस

भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप! मुंबईच्या पूर्व उपनगरात दुपारपासून तुफान पाऊस सुरू असून काही ठिकाणी रस्त्याला नदीचं रुप प्राप्त झालं आहे. भांडूप, मुलुंड परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. नागरिकांना साचलेल्या पाण्यातून प्रवास…

‘गोली मार भेजे में’ स्टाईलवर हायकोर्टाचे सवाल?

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी हायकोर्टाच्या पोलिसांवर प्रश्नांच्या फैरी मुंबई :  नॉर्मली, एन्काऊंटरला तुम्ही डोक्यात गोळी मारता का? असा थेट सवाल आज न्यायमुर्तींनी सरकारी वकीलांना विचारत बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी प्रश्नांच्या फैरीच झाडल्या… बदलापूर चिमुरडींवरील अत्याचार…

 नाहूरमध्ये पक्षीगृहाच्या प्रस्तावाला विरोध

 पक्षीगृहाऐवजी अत्यावश्यक सुविधांची मागणी   मुंबई : पूर्व उपनगरातील नाहूर गावात महापालिकेच्या भूखंडावर पक्षीगृह (बर्ड पार्क) उभारण्याच्या प्रस्तावाला वन्यजीव तज्ज्ञांनी विरोध केला आहे. येथे पक्षीगृह उभारण्याऐवजी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नाहूर गावातील भूखंडावर पक्षीगृह उभारण्याच्या पालिकेच्या योजनेबाबत ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी महापालिकेला सूचना आणि हरकती सादर केल्या आहेत. महापालिकेबरोबरच शर्मा यांनी या सूचना आणि हरकतींसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये पक्षीगृहाच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे. त्याऐवजी पक्षी-प्राण्यांबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी केली आहे. वन्यजीव बचाव केंद्र, प्राणी जन्म नियंत्रण केंद्र, प्राणी अनाथाश्रम, प्राणी स्मशानगृह ही काळाची गरज असून अशा सुविधांवर भर देणे गरजेचे आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्षीगृहापेक्षा प्राणी आणि पक्ष्यांची काळजी चांगल्या पद्धतीने कशी घेता येईल यावर भर देणे आवश्यक आहे. तस्करी तसेच शिकारीचे प्रमाणही बऱ्यापैकी वाढले आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. याचबरोबर पक्ष्यांसाठी पर्यावरणाचा समतोल कसा साधता येईल याकडे लक्ष द्यायला हवे, असे मत ‘रॉ’चे पवन शर्मा यांनी व्यक्त केले. नाहूर गावात महापालिकेच्या मालकीचे सुमारे १७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड असून त्यावर हे पक्षीगृह प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या सल्लागारावर सार्वजनिक सुविधांसह पक्षीगृहाचा आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आली होती. सल्लागाराला पक्षीगृहाचे चित्र, तपशीलवार प्रकल्प आरेखन आणि बांधकामादरम्यान देखरेख याबाबत अहवाल तयार करावा लागणार आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळविण्याबरोबरच पक्ष्यांच्या प्रजाती निवडणे आणि सार्वजनिक सुविधांचा आराखडा तयार करणे आदी बाबीदेखील अपेक्षित आहेत. उपनगरातील पहिले पक्षीगृह भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यानात (राणीची बाग) जुना पक्षी विभाग आहे. या विभागात देश-विदेशातील विविध पक्ष्यांचा विहार आहे. नाहूरमधील पक्षीगृह उपनगरातील हे पहिले पक्षीगृह ठरणार आहे. या पक्षीगृहात विविध देशांमधील पक्ष्यांचे स्वतंत्र विभाग असणार आहेत. संबंधित विभागात त्या त्या देशातील पक्षी पाहायला मिळणार आहेत.

पायताणाची काळजी घेणारा चर्मकार समाज आक्रमक

रमेश औताडे मुंबई : फूटपाथवर बसून जनतेच्या पायताणाची काळजी घेणारा चर्मकार समाज आज अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार फसव्या घोषणा  व आश्वासन देण्यात गुंग झाले आहे. त्यामुळे आता हा समाज आझाद मैदानात सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. चर्मोद्योग हा परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय आहे. मात्र या व्यवसायाकडे सरकारचे लक्ष नाही. चर्मकार समाजाचे महामंडळ आहे. त्याला अध्यक्ष नाही. पुरेसे कर्मचारी महामंडळात नाहीत. असे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांनी सांगितले. फंड नसल्याने अनेक चर्मकार बांधव अनुदान व कर्ज यापासून वंचित आहेत. तरुण बेरोजगार झाले आहेत, असे  मुंबई अध्यक्ष राजू नेटके यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहिण व लाडका भाऊ या योजना मतांच्या जोगव्यासाठी आहेत हे सरकारलाही माहीत आहे. तरीही सरकार मनमानी कारभार करत आपलेच खरे करत आहे. त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत मैदान सोडायचे नाही असा इशारा समाजाचे युवा नेते जगदीश लाड यांनी दिला आहे. 000

 पात्र अर्जदारांची प्रारूप यादीची प्रतीक्षा संपणार

 म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४ मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली असून मुंबई मंडळाने अर्ज विक्री – स्वीकृतीसाठी दिलेल्या विहित मुदतीत अनामत रकमेसह एक लाख १३ हजार इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. प्राप्त अर्जांची मुंबई मंडळाकडून छाननी पूर्ण करण्यात आली असून गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदारांची प्रारूप यादी मुंबई मंडळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करणार आहे. मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, जुहू, पवई, विक्रोळी, ताडदेव, दादर, वरळी, वडाळा आदी ठिकाणच्या २०३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून सोडत पूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरदरम्यान ही प्रक्रिया सुरू होती. या कालावधीत मुंबई मंडळाकडे अनामत रकमेसह एक लाख १३ हजार अर्ज सादर झाले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात आली असून छाननीत पात्र – अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांची यादी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांना सूचना – हरकती नोंदविण्यासाठी काही कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत आपल्या अर्जातील त्रुटी दूर करणाऱ्या आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांची नव्याने पात्रता तपासत एकूण पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अंतिमतः पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत जे अर्जदार समाविष्ट असतील तेच सोडतीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या यादीत एकूण किती अर्जदार पात्र ठरतात आणि किती अर्जदार सोडतील सहभागी होतात हे ३ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना देकार पत्र वितरित करून त्यांच्याकडून घराची विक्री किंमत भरून घेतली जाईल. निश्चित कालावधीत जे यशस्वी अर्जदार घराची संपूर्ण रक्कम मुद्रांक, शुल्क नोंदणी शुल्क आणि देखभाल शुल्क अदा करतील त्यांना घरांचा ताबा दिला जाईल. दरम्यान, यंदा सोडतील निर्माणाधीन प्रकल्पातील घरांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अशा घरांसाठी यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना घराचे काम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळाल्यानंतर घरांचा ताबा दिला जाणार आहे.