Category: मुंबई

Mumbai news

बदलापूर एन्काऊंटरचे श्रेय घेणाऱ्या फडणवीसांनी नालासोपाऱ्यातील महिला बलात्काराचीही जबाबदारी घ्यावी – वर्षा गायकवाड

मुंबई : बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर केल्याचे श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरु झाली आहे. शिंदेंचे कौतुक करणारी मोठी जाहिरात वर्तमानपत्रात झळकली तर फडणवीसांच्या नावाने मुंबईत ‘बदलापुरा’…

इलेक्ट्रॉनिक वेस्ट साठी ‘जनरेशन ग्रीन’ अभियान

रमेश औताडे   मुंबई /जुने मोबाईल, चार्जर, हेडफोन, पावर बँक, टी व्हि, पंखे, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जुनी झाल्यावर कचऱ्यात फेकली जातात. मात्र हाच कचरा आता पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करत आहे. यासाठी  “जनरेशन ग्रीन” अभियान खारीचा वाटा उचलून ग्लोबल वॉर्मिग साठी हातभार लावेल असा विश्वास धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य सचिव एसव्हीआर श्रीनिवास यांनी व्यक्त केला. ए आय सी टी ई आणि ओपो इंडिया तसेच  सेंट झेवियर्स कॉलेज यांनी मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या पत्रकार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य सचिव एसव्हीआर श्रीनिवास व ओपो इंडिया प्रमुख राकेश भारद्वाज , सेंट झेवियर्स कॉलेज चे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे उपस्थित होते. शाश्वत जगासाठी पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी तरुणांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी ग्रीन स्कील व इंटर्नशिपच्या माध्यमातून पाच हजार विद्यार्थी “जनरेशन ग्रीन” च्या पहिल्या टप्प्यात  सहभागी झाले आहेत. याचा मला अभिमान आहे असे प्रमुख पाहुणे म्हणून, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य सचिव एसव्हीआर श्रीनिवास यावेळी म्हणाले. ००००

 स्वच्छ केली नवी मुंबईतील 8 विभागातील धार्मिक प्रार्थनास्थळे

 1050 हून अधिक नागरिकांनी व स्वच्छताकर्मीनी नवी मुंबई : स्व्च्छता ही सेवा मोहीमे अंतर्गत 17 सप्टेंबर पासून दररोज स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविले जात असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार वर्दळीची ठिकाणे तसेच दुर्लक्षित स्थळांच्या सफाईकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे या मोहीमेचा प्रारंभही अनंत चतुर्दशीदिनी मोठया प्रमाणात होणा-या गणेश विसर्जन सोहळयानंतर लगेचच दुस-या दिवशी सकाळी सर्व विसर्जन स्थळांच्या सफाई मोहीमेने करण्यात आला. त्यानंतरही खाडी किना-यांवरील खारफुटी परिसर, रेल्वे स्टेशन, एपीएमसी मार्केट अशा विविध स्थळांवर सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. यामध्ये व्यापक लोकसहभागावर भर देण्यात आला व नागरिकांनीही सर्वच मोहीमांना उत्साही प्रतिसाद दिला. अशाचप्रकारे आज आठही विभाग कार्यालयांमार्फत त्या त्या कार्यक्षेत्रातील धार्मिक प्रार्थनास्थळांची स्वच्छता मोहीम प्रार्थनास्थळांचे पदाधिकारी, तेथील स्वयंसेवक व कर्मचारी तसेच प्रार्थनास्थळाशी संबधित भाविक नागरिक आणि एनएसएसचे विद्यार्थी आणि महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्र अशा 1050 हून अधिक नवी मुंबईकरांच्या एकत्रित सहयोगातून राबविण्यात आली. प्रार्थनास्थळांमध्ये अंतर्गत स्वच्छतेची काळजी घेतली जाते मात्र त्या सभोवतालच्या परिसर स्वच्छतेकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. ही बाब नजरेसमोर ठेवून स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये प्रार्थनास्थळांच्या स्वच्छतेची विशेष मोहीम अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व डॉ.संतोष वारूळे, परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील प्रार्थनास्थळांवर राबविण्यात आली. सर्व ठिकाणी स्वच्छता आणि प्लास्टिक प्रतिबंधाची सामुहिक शपथ घेण्यात आली. यामध्ये – बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात सहा.आयुक्त शशिकांत तांडेल व स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली सीबीडी किल्ले गावठाण येथील गोवर्धनी माता मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. नेरुळ विभाग कार्यक्षेत्रात सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे आणि स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांच्या माध्यमातून लोकसहभागातून इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिराची अंतर्गत व परिसर स्वच्छता करण्यात आली. वाशी विभागात से.9 येथील गुरुव्दारा व्यवस्थापनाच्या सहयोगातून सहा.आयुक्त सागर मोरे व स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली गुरुव्दारा परिसराची तसेच आतील भागाची सखोल स्वच्छता करण्यात आली. सफाईमध्ये जेटींग मशीनव्दारे प्रक्रीयाकृत पाणी फवारणीव्दारे स्वच्छता करण्यात आली. तुर्भे विभागामध्ये सानपाडा येथील पुरातन दत्त मंदिराची सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये भाविक नागरिक मोठया संख्येने सहभागी होते. सहा.आयुक्त श्री. भरत धांडे आणि स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या माध्यमातून या मोहीमेचे सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले. कोपरखैरणे विभागातही सहा.आयुक्त  सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी  राजुसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली पुरातन पावणेश्वर मंदिराची अंतर्गत व बाहय भागात सफाई करण्यात आली. घणसोली विभागात तळवली गाव येथील करजूआई गावदेवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. सहा.आयुक्त  संजय तायडे व स्वच्छता अधिकारी  विजय पडघन यांच्या पुढाकाराने ही मोहीम स्थानिक लोकसहभागातून यशस्वीरित्या राबविण्यात आली. ऐरोली विभागामध्ये सहा.आयुक्त  शंकर खाडे व उपमुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली से-17 येथील श्री दत्त मंदिर याठिकाणी परिसर स्वच्छता करण्यात आली. दिघा विभागामध्येही कन्हैय्यानगर येथील श्रीअष्टभुजा दुर्गामाता मंदिर परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि स्वच्छता अधिकारी प्रविण थोरात यांच्या नियंत्रणाखाली लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी झाली. स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्याठिकाणी भाविक नागरिक श्रध्देने जातात अशी विविध धर्मांची प्रार्थनास्थळे स्वच्छ असावीत या भूमिकेतून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व सर्व ठिकाणी नागरिकांचा उत्तम सहभाग लाभला.

एमजेएससी कॅरम स्पर्धेत अर्णव, पृथ्वी, श्रीशान, उमैरची विजयी सलामी 

मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माहीम ज्युवेनाईल चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत अर्णव गावडे, पृथ्वी बडेकर, श्रीशान पालवणकर, उमैर पठाण, रेहान शेख आदींनी सलामीचे…

मी सततेवर असेपर्यंत माथाडी कामगारांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांवर  गदा येऊ देणार नाही-देवेंद्र फडणवीस

राजेंद्र साळसकर   नवी मुंबई : एकेकाळी हमाल म्हणून गणल्या गेलेल्या माथाडी कामगारांवर कोणीही लक्ष देण्यास तयार नव्हते. या कामगारांचे भविष्य काय, त्यांच्या मुलांचे भविष्य काय, असे अनेक प्रश्न होते तर त्यांच्यासाठी कोणताही कायदा त्याकाळात नव्हता. त्यांची आर्थिक पिळवणूक व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना परिसीमा नव्हती. अशा या कामगारांसाठी स्व. अण्णासाहेबांनी अथक परिश्रमाने ऐतिहासिक माथाडी कामगार कायद्याची निर्मिती केली त्यांना आजच्या या जयंती निमित्त अभिवादन करतो, त्यांच्याकडे दैवत म्हणून आम्ही पाहतो. त्यांच्या कार्यापासून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते. असे ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे व मराठा आरक्षण मागणीचे जनक मराठा क्रांतीसुर्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त नवीमुंबईतील कांदा-बटाटा मार्केट मधील लिलावगृह येथे महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने अयोजित केलेल्य मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ऐसिहासिक कामगार कायद्याच्या निर्मितीमुळे आज माथाडी कामगारांचे अस्तित्व अबाधित आहे. हा कायदा बदलण्याचे प्रयत्न अनेक सरकारांनी केले आताही तीच परिस्थिती आहे. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकीर्दीत या माथाडी कायद्यातील त्रुटींमध्ये सुधारणा करून या कायद्याला कायमस्वरूपी सुरक्षा कवच निर्माण करून द्यावे. असे देवेंद्रजींनी केले तर अण्णासाहेबांच्या प्रत्येक जयंतीला माथाडी कामगार त्यांचा उल्लेख अदबीने करत राहील असे वक्तव्य युनियनचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यानी आपल्या स्वागतपर प्रास्ताविक भाषणातून केले. ते पुढे असेही म्हणाले की माथाडी कामगार हाही तसा अल्पभूधारक असून पंतप्रधान आवास योजनेतील घरे ही माथाडी कामगारांना मिळाली पाहिजे. नाशिकच्या माथाडी कामगारांचा लेव्हीचा प्रश्न त्वरीत सोडवावा अशीही मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तर वडाळा येथील सोळा एकरावर ३५०० माथाडी कामगारांच्या वसाहतीचा प्रश्न लवकरच सोडवावा व आमचा विश्वास सार्थ करावा असेही शशिकांत शिंदे म्हणाले.  याबरोबरच त्यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे व सर्व सुरक्षायंत्रणेचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत केले. माथाडी कामगारांचे कित्येक प्रलंबित प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाच्या कालावधीत सोडविले असून आताही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मी साहेबांना विनंती करेन की, हे प्रलंबित प्रश्न त्यांनी लवकरात लवकर सोडवावे. या प्रलंबित प्रश्नांमध्ये नाशिक येथील माथाडी कामगारांच्या लेव्हीचा प्रश्न. कायद्यानुसार आमच्या बाजूने निकाल लागूनसुध्दा त्याची अंमलबजावणी आडते,व्यापारी विरोध करीत असल्यामुळे होत नाही. तेव्हा देवेंद्रजींनी नाशिक येथील ५००० माथाडी कामगारांना न्याय द्यावा व सुरक्षित करावे. दुसरे म्हणजे नवीमुंबई येथे फ्रुट मार्केट मध्ये बांग्लादेशी कामगार कमी मजूरीमध्ये काम करीत असल्यामुळे माथाडी कामगारांवर अन्याय होत असून त्यांना कोणताही अधिकार अथवा ते देशाचे नागरिक नसूनही अनधिकृतपणे काम करीत आहेत. हा प्रकार त्वरीत थांबावावा, तसेच ट्रक टर्मिनल येथे सिडकोची वसाहत उभी राहत आहे. तेथे बाजार समितीच्या मार्केटमधील कामगारांना घरे देण्यास प्राधान्य द्यावे व पंतप्रधान आवास योजनेतही प्राधान्य द्यावे अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात केली. पुढे ते असेही म्हणाले की, माथाडी कायद्यात बदल करा पण तो बदल माथाडी कायद्याशी संबंधित सर्व घटकांना सुसह्य व न्याय देणारा असावा. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नामांतर मराठा क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ असे करण्याची आग्रही मागणीही नरेंद्र पाटील यांनी केली. नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यानी भाषणात केलेल्या मागण्यांसंदर्भात देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात बोलले की, मध्यंतरी अनेक स्थित्यंतरे झाली. हा आगळा-वेगळा माथाडी कायदा बदलण्यासाठी दबाव आले. पण आम्ही त्याला बळी पडलो नाही. माथाडी कामगारांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कावर मी सत्तेवर असेपर्यंत कधीही गदा येणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. हा कायदा बदलण्याचे अनेक ठराव झाले. पण ते नाकारण्याचं काम आम्ही केले. सरकारपेक्षा माथाडी कामगार हा मला महत्वाचा आहे. त्यांच्या अनेक अडचणी आम्ही दूर केल्या व यापुढेही दूर करीत राहू. नाशिकच्या कामगारांच्या लेव्हीचा प्रश्नासंदर्भात येत्या १५ दिवसात पणनमंत्री व कामगारमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन लवकरात लवकर कामगारांना न्याय देऊ. तसेच माथाडी कामगारांच्या वडाळा वसाहत उभारणीतील अडचणी दूर करून व पंतप्रधान आवास योजनेतही माथाडी कामगारांना घरे मिळवून देऊ असे अभिवचनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध माथाडी मंडळातील १८ गुणवंत माथाडी कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणाऱ्या माथाडी कामगारांमधील मराठा उद्योजकाचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये १,००,००० मराठा तरूण-तरूणींना उद्योजक केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप व सुत्रसंचालन संघटनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. पोपटराव देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नवीमुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सागर नाईक, नवीमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, भाजपचे रामचंद्र घरत, दत्ता घंगाळे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे, अधिकारी दिपक शिंदे, माजी पंचायत समिती सभापती वसंतराव मानकुमरे, जावली बँकेचे अध्यक्ष विजय भिलारे, बाजार समितीचे सभापती श्री. अशोक डक, सचिव पी.एल.खंडागळे आणि सर्व व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील, युनियनच्या कायदेशीर सल्लागार व माजी नगरसेविका भारतीताई पाटील, युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, आनंद पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड आणि तमाम माथाडी कामगार हजारोंच्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. 0000

जोगेश्वरी पूर्व विधानसभेसाठी भाजपचे धर्मेंद्रनाथ ठाकूर

रमेश औताडे   मुंबई : जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जनतेची मी एक दशकाहून अधिक काळ सेवा करत आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने मला तिकीट दिले तर माझा या जागेवर विजय पक्का आहे. पक्षाने तिकीट दिले नाही तरी जनतेच्या आग्रहासाठी निवडणूक लढवणार. अशी माहिती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्रनाथ ठाकूर यावेळच्या विधानसभा निवडणुकीत तयारीला लागले आहेत. पक्षाने मला तिकीट दिले तर माझा या जागेवर विजय पक्का आहे, असा विश्वास व्यक्त करत ते यावेळी म्हणाले, जोगेश्वरी पूर्व विधानसभेत १५ वर्षांपासून  कावड यात्रा, राम कथा, रुद्राभिषेक, गरजूंना मदत करण्यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रम केले आहेत. आरोग्य शिक्षण रोजगार मेळावे आदी विविध समाज उपयोगी कार्यक्रम केले आहेत. 000

माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित नवीमुंबई वाशी येथील कांदा-बटाटा मार्केट मधील माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये त्यांना अभिवादन करताना. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री…

सिताराम येचूरींना मविआतर्फे श्रद्धांजली

नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात कॉम्रेड सिताराम येचूरी यांना महाविकास आघाडीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करताना शरद पवार. मुंबई: भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस कॉम्रेड सिताराम येचूरी यांना यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज महाविकास आघाडीच्या वतीने…

मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोचा मुहुर्त ठरला

मुंबई : मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोचा मुहुर्त ठरलाय. लवकरच मुंबईकरांना अंडरग्राऊंड मेट्रोतून गारेगार प्रवास करता येणार आहे. मुंबईची पहिली वहिली अंडरग्राऊंड मेट्रो सेवा, अर्थात मेट्रो तीनचा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार आहे. बीकेसी ते आरे…

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीसाठी शांततेत मतदान

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीसाठी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी वांद्रे येथील चेतना कॉलेजमधिल मतदान केंद्रावर मतदान केले. मुंबई : मुंबई विद्यापीठाची सिनेटची वादग्रस्त ठरलेली निवडणूकीसाठी अखेर आज मंगळवारी…